Submitted by द्वैत on 7 January, 2019 - 12:06
सध्या हेच करतो की काहीच करत नाही
माझ्यावाचून कुणाचे काही अडत नाही
एकाच घरात राहून जी दोघांमध्ये उभी
रोज पाडूया म्हणतो पण भिंत पडत नाही
जेव्हापासून नजर तिची अनोळखी झाली
आसपास कोणीच ओळखीचा दिसत नाही
बाणांहून तीक्ष्ण शब्द हृदयावर जी करतो
अशी जखम सहजासहजी लवकर भरत नाही
काळोख्या रात्रीनंतर नवी पहाट येते
पूर्वी घडत होते तसे.. आता घडत नाही
घराकडे जाणारे रस्ते बरेच आहेत
कुठल्या रस्त्याने परतावे हे कळत नाही
"द्वैता" तुझ्यामते येथे जे जे चूक आहे
डोळ्यांदेखत घडते पण आम्ही बघत नाही
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रत्येक शेर भारी. मस्तच.
प्रत्येक शेर भारी. मस्तच.
धन्यवाद शाली
धन्यवाद शाली