Submitted by सुप्रिया जाधव. on 7 January, 2019 - 11:04
नकोस देवू जखम भळभळू साकळून ये
समोर त्याच्या येताना तू सावरून ये
सताड उघडे ठेवत आहे दार मनाचे
ये सौख्या पण फक्त जरासे खाकरून ये
उंचावरून कोसळल्यावर कसे वाटते ?
पाण्याच्या थेंबा-थेंबाला विचारून ये
प्रश्न विचारू नकोस पडतिल शंभर शकले
आयुष्याला पाठीवरती वागवून ये
आपुलकीने वागवू नये प्रत्येकाला
दु:खाला दु:खाची जागा दाखवून ये
कपाळमोक्षातली व्यथा ही तुला कळावी
लाट होउनी किनाऱ्यावरी आदळून ये
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा