Submitted by सुप्रिया जाधव. on 30 December, 2018 - 11:44
उगाचच आणतो आहेस का जेरीस तू
बिलगल्या छाटतो आहेस का वेलीस तू
प्रवाहू लागली आहे नदी ही गोठली
किना-या कोणती जादू अशी केलीस तू ?
तुलाही काढले जाईल बघ मोडीमधे
घराच्या अडगळीमधले जुने शो-पीस तू
मला समजायला माझी लिपी समजून घे
कथा वाचून ही होशील कासावीस तू
कसा विझणार हा वणवा तुझ्या जगण्यातला
भिजाया पावसामध्ये कुठे गेलीस तू
तिची श्रध्दा, तिचा विश्वास, ही निष्ठा तिची
समजण्याची कधी केलीस का कोशीस तू ?
जरासे प्रेम होते पाहिजे बदल्यामधे
कुबेरा केवढी करशील घासाघीस तू ?
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान
खूप छान
सुरेख!
सुरेख!