Submitted by माउ on 27 December, 2018 - 20:00
आतातरी मनाला सांगावयास ये ना
धावून फार झाले, रोखावयास ये ना..
जिंकून द्यायला मी आहे तयार हल्ली
तूही जरा स्वतःला हरवावयास ये ना..
जखमा हजार केल्या लांबून श्वापदांनी
काळीज पाकळीचे सांभाळण्यास ये ना..
गेले दुरून सारे..दु:खास जोजवूनी
आसक्त वेदनेला बिलगावयास ये ना...
चोरून भेटताना चोरी दिसे जगाला..
काळोख ओढुनी तू झाकावयास ये ना..
काही लुटून नेले.. काही निघून गेले...
श्वासास शेवटाच्या अडवावयास ये ना...
-रसिका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
धन्यवाद!
धन्यवाद!
छान लिहिल आहे.
छान लिहिल आहे.
गेले दुरून सारे..दु:खास
गेले दुरून सारे..दु:खास जोजवूनी
आसक्त वेदनेला बिलगावयास ये ना...
>>>>
किती सुरेख
dhanyawad!
dhanyawad!
चोरून भेटताना चोरी दिसे जगाला
चोरून भेटताना चोरी दिसे जगाला..
काळोख ओढुनी तू झाकावयास ये ना..!!
खुप सुन्दर!
धन्यवाद!
धन्यवाद!
>>>आतातरी मनाला सांगावयास ये
>>>आतातरी मनाला सांगावयास ये ना
धावून फार झाले, रोखावयास ये ना..>>>छान मतला!
>>>गेले दुरून सारे..दु:खास जोजवूनी
आसक्त वेदनेला बिलगावयास ये ना...>>>क्या बात है!
>>>चोरून भेटताना चोरी दिसे जगाला..
काळोख ओढुनी तू झाकावयास ये ना..!!>>>सुंदर शेर!
वृत्तात एखादवेळी सूट घेणे ठीक,काफियात सूट नाही!
'सांभाळण्यास' येथे काफिया,आणि म्हणून रदीफही,बिघडले!
छान लिहित आहात,लिहित रहा. अनेक शुभेच्छा!!