Submitted by सुप्रिया जाधव. on 22 December, 2018 - 23:12
विकोपाला भयंकर वाद गेले, कौल द्या ह्याचा
इमारत बांधल्यावर मागतो तो प्लॉट का त्याचा ?
नको पिटवूस डन्का मी तुझी कोणीच नसल्याचा
पुरावा मानते हा मी तुझे सर्वस्व असल्याचा
तुझी आजी तुझी आई तुझ्या बहिणी तुझ्या वहिन्या
बदलले ओतले मिश्रण, युगान्चा तोच तो साचा !
गळत नाही इथे पूर्वीप्रमाणे, ओल ही कसली ?
बुजवले तू जरी भगदाड बाकी राहिल्या खाचा
दरोडा घालणारा चोर जर नव्हता घरामधला ;
घराबाहेर खिडकीच्या कशा पडल्यात ह्या काचा ?
थिरकते जिंदगानी ढोलकीवरती प्रसंगांच्या
बसंतीला जणू देतो हुकुम गब्बर 'चला नाचा !'
कधीची वाजवत आहे कडी ती...आत घे आता
मनाच्या उंबऱ्यावरती तुझ्या झिजल्या तिच्या टाचा
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तेवढं गब्बरचा शेर सोडल्यास,
तेवढं गब्बरचा शेर सोडल्यास, बाकी मस्त!
तेवढं गब्बरचा शेर सोडल्यास,
तेवढं गब्बरचा शेर सोडल्यास, बाकी मस्त!
>>> +१
एकंदरीत आवडली गझल.
धन्यवाद मन्डळी, विचार करते
धन्यवाद मन्डळी, विचार करते शेरावर