मित्रांनो तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचार सरणिचे असा पण कधिही त्या पक्षाचे कार्यकर्ते मात्र बनु नका .पक्षनिष्टां वैगरे आता फक्त थापा आहेत पक्षनिष्टांच्या नशिबी फक्त सतरंज्या उचलून नेत्यांच्या भाषणात टाळया वाजवणे एवढेच ऊरले आहे. पक्षनिष्टांची कदर करण्याचा त्याच्यांसाठी पक्षाने काही करावे असे मानणारा एक काळ होता पण तो काळ केव्हांच संपलाय. आतापक्ष तो कुठलाका असेना त्या पक्षाला फक्त सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते फक्त लागतात पण आमदार खासदारकी तर सोडाच साधी नगरसेवक पदासाठीही पक्ष उमेदवारी देत नाही .पक्षाचे तिकिट मिळते ते नेत्यांच्या मुलांना .आता एक नवीनच फंडा आला आहे आणि तो म्हणजे इतर पक्षातील निवडून येऊ शकणारे नेते येन केण प्रकारे आपल्या पक्षात आयात करायचे आणि त्यांना पक्षाचे उमेदवार म्हणून उभे करायचे.आणि ज्यांनी पक्ष उभारण्यात हयात घालवली त्यांना तुमच्यात निवडून येण्याची क्षमता नाही असे सांगत वळचणीला टाकायचे .हे फक्त काँग्रेसमधेच घडते असे नाही तर स्वताला पार्टी आँफ डिफरंट म्हणवणाऱ्या भाजपमध्ये ही हेच घडत आहे उलट काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात काँग्रेस मुक्त भारत तर झालाच नाही पण काँग्रेस युक्त भारतीय जनता पक्ष मात्र झाला. आता काय तर म्हणे काही नेतेस्वग्रुही परतण्याच्या विचारात आहेत आणि त्यांचे त्यांंच्या जुन्या घरी म्हणजे जुण्यापक्षात त्यांच्या साठी पक्ष पायघड्या टाकून बसला आहे. अरे पण अडचणीच्या काळातही ज्यांनी पक्षनिष्टांदाखवून दिली त्यांचे काय. मित्रांनो पक्ष कुठलाही असो त्यांना कार्यकर्ते लागतात ते फक्त सतरंज्या उचलण्यासाठी पद देण्यासाठी नाही म्हणून मित्रांनो तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा पण कार्यकर्ते मात्र बणु नंका.
मित्रांनो तुम्ही कार्यकर्ते बनु नका?
Submitted by ashokkabade67@g... on 17 December, 2018 - 12:48
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अगदी अगदी बरोब्बर बोललात
अगदी अगदी बरोब्बर बोललात
कार्यकर्ते बनू नका.... उघड आणि छुपेही
झालच तर उगा राजकारणावर धागे विणत बसू नका
ट्रोलगिरी करु नका
अंधभक्ती, अंधद्वेष करु नका.... अगदीच बरोबर!
पण इथे ऐकतय कोण?
रोजची बिर्याणी सुटण्यासाठी
रोजची बिर्याणी सुटण्यासाठी कार्यकर्ते बनतात. कोणी दिली हे पाहात नाहीत.
रोजची बिर्याणी सुटण्यासाठी
रोजची बिर्याणी सुटण्यासाठी कार्यकर्ते बनतात. कोणी दिली हे पाहात नाहीत.
मी राजकारणाच्या धाग्यावर भाषण
मी राजकारणाच्या धाग्यावर भाषण करणं कटाक्षाने टाळतो, पण या लेखातील शब्द आणि शब्द खरा आहे!
या कार्यकर्ते बनण्याच्या नादात खूप लोकांचं आयुष्य जळताना बघितलंय. अनेक लोक गुन्हेगारी मार्गाला लागले. शिक्षण अर्धवट राहील. व्यवसाय करायची दानत नाही, असेल तर भांडवल नाही. अर्धवट शिक्षणाने नोकरी नाही. मग टवाळखोरी, छेडछाड, चोऱ्यामाऱ्या. मग काही झालं तर भाऊ किंवा दादा किंवा साहेब किंवा श्रद्धास्थान आहेच सोडवायला. मग हिम्मत वाढते, मुजोरी वाढते, आणि मग एखाद्या प्रकरणात भाऊ काही करू शकत नाही, मग आहेच आयुष्याची राखरांगोळी.
कोणत्याही नेत्याला काहीही घेणं देणं नसत कार्यकर्त्यांशी. त्यांना गर्दी हवी असते, त्यांना मागे घोषणा देणारे हवे असतात. तुमची किंमत माहितीये काय असते? ५०० रु दिवस, एक बाटली आणि दोन टाइम मटण. कार्यकर्त्यांना वाटत आमचे साहेब फक्त आमचेच. एकदा निवडणूक संपू दे, साहेबाच्या दारात कुत्रा विचारत नाही. मग काय, निराशा नाहीतर चोऱ्यामार्या.
सांगा मला, कोणत्या नेत्याने कार्यकर्त्याला वर आणलंय?आणि आणलं जरी असेल केव्हा आणलंय माहितीये? मतदारसंघ राखीव झाल्यावर...
स्वतः कायम गुर्मीत वावरायच, आणि स्वतःच्या बहिणीला लग्नासाठी मुलगा हवा नोकरीवाला. वेल इस्टेबलिश...मात्र यांचे उद्योग बघून कुणी मुलगा धजत नाही, मग आहेच यांच्याचपैकी कुणी फूस लावायला.
हे सगळं मी स्वतः जवळून बघितलंय. कार्यकर्ते बनत असाल, तर घराची राख करण्याची तयारी ठेवा. नाहीतर मग बेरकी बना. डोकं वापरून बना. कुणाच्याही चरणी निष्ठा वाहू नका. वाऱ्याची दिशा ओळखा, साहेबाच्या ओळखी वापरून पार्ट टाइम बिजनेस चालू करा, तो वाढवा, आणि नंतर साहेबाला सांगा, साहेब तुमच्या आशीर्वादाने बिजनेस जोरात चालू आहे, वेळच नाही मिळत हो...
असो, अजून खूप आहे लिहिण्यासारखं... पण तूर्तास एवढंच
मित्रांनो तुम्ही कार्यकर्ते
मित्रांनो तुम्ही कार्यकर्ते बनु नका?
<<
मागे आसामच्या एका नेत्यांने कॉंग्रेस मधून भाजपा मधे आल्यावर राहूल गांधीचा एक किस्सा सांगितला होता की राहुल गांधी त्याला भेटायला येणार्या प्रत्येक कॉंग्रेसी नेत्याला त्याच्या पाळीव कुत्र्यांने चाटलेले बिस्किट, चहाबरोबर खायला देत असे. हे करण्यामागचा राहुल गांधीचा तर्क असा होता की असे बिस्किट खाल्ल्याने कॉंग्रेसी नेते/समर्थक त्या पाळीव कुत्र्यांप्रमाणे वफादार होतात.
मला वाटते धागा लेखकांने सुद्धा वरिल किस्सा ऐकून/वाचून, कोणत्या ही पक्षाचा कार्यकर्ता न होण्याचा निर्णय घेतला असावा. मात्र भारतीय जनता पार्टीत रागा सारखा अर्धवट नेता नसल्याने आम्हाला तरी कार्यकर्ता होण्यात कसलाच धोका वाटत नाही.
मागे आसामच्या एका नेत्यांने
मागे आसामच्या एका नेत्यांने कॉंग्रेस मधून भाजपा मधे आल्यावर राहूल गांधीचा एक किस्सा सांगितला होता की राहुल गांधी त्याला भेटायला येणार्या प्रत्येक कॉंग्रेसी नेत्याला त्याच्या पाळीव कुत्र्यांने चाटलेले बिस्किट, चहाबरोबर खायला देत असे. हे करण्यामागचा राहुल गांधीचा तर्क असा होता की असे बिस्किट खाल्ल्याने कॉंग्रेसी नेते/समर्थक त्या पाळीव कुत्र्यांप्रमाणे वफादार होतात.
<<
अरे खोट बोलताना काही लाज लज्जा ठेवा.
अरे खोट बोलताना काही लाज
अरे खोट बोलताना काही लाज लज्जा ठेवा.
Submitted by आ.रा.रा. on 18 December, 2018 - 14:01
<<
https://youtu.be/rtfmaZcZlYM?t=83
अनिरुद्ध भाऊ रागावु नका पण
अनिरुद्ध भाऊ रागावु नका पण आपला राजकीय अनुभव कुठे तरी कमी पडतो.अहो काँग्रेस आसो वा बिजेपी ऊडदा मधे काळे गोरे काय निवडावे.तुम्हाला सांगायची गरज नाही महाराष्ट्रात किती आमदार आयात करुन बिजेपीने आयात केले आणि त्यांच्या बळावर सरकार बनवले त्यांनी किती पक्षनिष्ट नेत्यांचा विचार केला .भावा धुळे मनपात तर फक्त पाच किंवा आठ नगरसेवक भाजपचे आहेत बाकीचे सारे राष्ट्रवादी वा काँग्रेस मधून आयात केले म्हणजे च किती पक्षनिष्टांच्या पदरात निराशा पडली. संसदेत किति पक्षनिष्टखासदार भाजपचे आहेत पक्ष कुठलाका असेना कार्यकर्ता हासतरंज्या ऊचलण्यासाठीच यांना हवा असतो.?अंधभक्त बनु नका.
अनिरुद्ध भाऊ रागावु नका पण
अनिरुद्ध भाऊ रागावु नका पण आपला राजकीय अनुभव कुठे तरी कमी पडतो.
नवीन Submitted by ashokkabade67@g... on 18 December, 2018 - 14:35
<<
आयाराम-गयाराम संस्कृती भारतीय राजकारणात कुणी सुरु केली याचा जरा इतिहास वाचा आणि मग भाजपाला नावे ठेवा. "मित्रांनो तुम्ही कार्यकर्ते बनु नका?" असा प्रश्न इतर सभासदांना विचारताना, स्वत: तुम्ही मात्र कॉंग्रेसची तळी उचलताय हे तुमच्या लक्षात येत नाही का ?
आणि कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलण्यासाठी असतात ते फक्त कॉंग्रेस सारख्या प्रायव्हेट लिमिटेड पक्षात, भाजपात असे असते तर श्री नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान कधी झालेच नसते.
.. हे सध्या माबो वरचे भाजप
.. हे सध्या माबो वरचे भाजप निष्ठावान कार्यकर्ते एकच आहेत
बाकी सगळ्या लोकांनी धागाकर्त्यांचा सल्ला प्रमाण मानून आपल्या पोटापाण्याच्या उद्योगाकडे लक्ष वळवले आहे, मात्र उद्योगाला अजून तशी उर्जितावस्था आली नाहीये,
तुरळक एखादी पोस्ट दिसते.
मित्रांनो मी कुठल्याही
मित्रांनो मी कुठल्याही पक्षाचा सभासद तर सोडा पण सहानुभूतीदारही नाही पण मित्रा तु भाजप समर्थक मात्र आहेस पण भाजप बाबत मी सांगितले ते खोट मात्र नाही .आणि त्याच उत्तर मात्र तु सफाईने टाळलस. किती निष्टावंताना तिकीटे मिळाली याच उत्तर तुच काय पण बिजेपी अध्यक्षही देणार नाहीत. जाउदे मित्रा तुला वाटेल तस तु वाग आमच काही म्हणणे नाही आणि काही आमच नुकसान नाहीं.
किती निष्टावंताना तिकीटे
किती निष्टावंताना तिकीटे मिळाली याच उत्तर तुच काय पण बिजेपी अध्यक्षही देणार नाहीत.
<<
कश्याला बिजेपी अध्यक्ष उत्तरे देतील ? बाकिच्या पक्षांचे अध्यक्ष असली उत्तरे कधी देतात काय ?
आणि ज्याला तिकिट दिले तो निष्ठावान नाही हे कोण आणि कसे ठरवणार ? कि राहुल गांधीनी 'एक तरफसे नेता घुसाव और दुसरे साईड से निष्ठावान नेता निकालो' अशी कोणती मशीन बनविलेय ? निष्ठा तपासायची.
शिवाय सत्तेच्या लालसेने जे आयाराम भाजपात २०१४ मध्ये आले होते त्यातले बरेचशे आयाराम पुन्हा घरवापसी करणार आहेत असे अजित पवारांनी जाहिर सभेत सांगितले. मग त्यांना तिकिट देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांची निष्ठा पाहणार की निवडुन यायची ताकद ?
---
तुम्हाला रिकामटेकड्या जिलेब्या इथे पाडू नका हे सांगण्याचा मला अधिकार नाही. किमान जे प्रश्न भाजपाबाबत विचारता तेच प्रश्न इतर पक्षांबाबत हि विचारा म्हणजे तुम्ही संतुलित(?) असल्याचे इतरांना कळेल तरी.
<< मागे आसामच्या एका
<< मागे आसामच्या एका नेत्यांने कॉंग्रेस मधून भाजपा मधे आल्यावर राहूल गांधीचा एक किस्सा सांगितला होता की राहुल गांधी त्याला भेटायला येणार्या प्रत्येक कॉंग्रेसी नेत्याला त्याच्या पाळीव कुत्र्यांने चाटलेले बिस्किट, चहाबरोबर खायला देत असे. हे करण्यामागचा राहुल गांधीचा तर्क असा होता की असे बिस्किट खाल्ल्याने कॉंग्रेसी नेते/समर्थक त्या पाळीव कुत्र्यांप्रमाणे वफादार होतात.
<<
अरे खोट बोलताना काही लाज लज्जा ठेवा. >>
------- आरारा, निव्वळ कल्पना विलास आहे. खोटे बोलणे, बिनदिक्कत खोटे बोलणे आहे. अशा खोट्या रचलेल्या गोष्टी पसरवताना जराही विचार करायचा नाही. आज तुम्ही खोटेपणाचे शस्त्र वापरत आहात तेच तुमच्या मागावर उद्या येणार आहे.... अजुन कुणी आसामच्या जागी गुजराथ, राहुलच्या जागी मोदी, शहा टाकतील आणि फिरवतील WA वर.
पप्पू पप्पू म्हणुन हिणवायला छान वाटते... मग फेकू आणि जुमलेबाज एकण्याची पण तयारी ठेवा. ३ वर्षांपुर्वी पप्पू म्हणायला मी तिव्र आक्षेप अनेकवेळा घेतला होता (त्याचे विपरित परिणामही लिहीले होते)... मला मोदी यांचे काही निर्णय आवडत नसतील, त्यांनी निवडणूकांत दिलेली काही आश्वासने पाळली नसतील, ठिक आहे पण म्हणुन त्यांना फेकू आणि जुमलेबाज असे बोलणे पण मान्य होत नाही. ते प्रधान आहेत आणि पदाचा सन्मान करणे गरजेचे आहे. चर्चेची पातळी आपणच ठरवायची आहे.
राहुल गांधी यांच्या धोरणावर/ निर्णयांवर टिका करा. त्यांच्या धोरणांवर टिका करता येतच नाही, येणारच नाही एव्हढे त्यांची धोरणे अभेद्द्य आहेत का? जानवे, गोत्र, त्यांचे आई-वडिलांचे धर्म या व अशा अनेक निरर्थक गोष्टी पराभुताची मानसिकता दर्शवतात.
पदाचा सन्मान करणे गरजेचे आहे.
पदाचा सन्मान करणे गरजेचे आहे.
>>
तुमच्या आमच्या सारख्यांना कळतं हो हे, परंतु खुद्द मोदींना पदाचा अपमान करताना बघितलंय. खोटं बोल पण रेटून बोल, उगाच काहीतरी गल्ली छाप भाषा, देख लुंगा वगैरे वगैरे.
<<<एव्हढे त्यांची धोरणे
<<<एव्हढे त्यांची धोरणे अभेद्द्य आहेत का?>>>
कोणती धोरणे? निवडून यावे म्हणून सांगितलेली?
राहुल गांधी यांच्या धोरणावर/
राहुल गांधी यांच्या धोरणावर/ निर्णयांवर टिका करा.

<<
माफ करा कार्यकर्ते होणे इतके
माफ करा कार्यकर्ते होणे इतके वाइट नसते. कित्येक कार्यकर्ट्यांना सहकारी बंकामधे शिपाइ ते व्यवस्थापक अशा नोकर्या मिळतात.दुकान परवाने मिळतात.
बरेच कार्यकर्ते घरचा व्यव्साय सांभाळुन कार्यकर्ते असतात.
राजकिय लागेबांध्याम्चा व्यवसाय्व्रुध्दीसाथी उपयोग होतो.
हे खरे आहे पण आणी नाही पण,
हे खरे आहे पण आणी नाही पण, शेवटी ज्याची त्याची मर्जी. माझ्या क्लासमेटचे वडील काँग्रेसचे माजी आमदार होते. बरीच कामे केली नंतर आजारपणात गेले. पण क्लासमेट अजूनही काँग्रेसशी तसेच राजकारणाशी संबंधीत आहे त्यामुळे माझे माहेरी जाणे झाले की सगळ्या बातम्या कळायच्या. एकदा तो आला म्हणाला की दुसरे आमदार ( जे आधी २ दा निवडुन आले ते ) यावेळी उभे राहीलेत. तर कार्यकर्ते त्यांना जाम लुटतायत. म्हणजे आपल्याला मते हवीत ना भाऊ, मग जरा १०-५ हजार द्या, वस्तीवर साड्या वाटुन येतो, गरीबांना मदत करतो. असे सांगुन ही पोरं आमदार साहेबांकडुन दरवेळेस पैसे घेत होते. आता गरीबांना ही पोरे देत होती की नाही काय माहीत? पण मधल्या मध्ये स्वतःचा खर्चापाणी काढत होते. शेवटी हे पाहुन माझ्या क्लासमेटने आमदार साहेबांना सगळे सांगीतले आणी मग पोरांचे चा-पाणी बंद झाले.
सगळेच कार्यकर्ते असे नसतात. काही खरच जीवाचे रान करुन नेत्याला पुढे नेतात. पण यांच्या पदरात काय पडते देव जाणे !
<<< हे खरे आहे पण आणी नाही
<<< हे खरे आहे पण आणी नाही पण, शेवटी ज्याची त्याची मर्जी. माझ्या क्लासमेटचे वडील काँग्रेसचे माजी आमदार होते. बरीच कामे केली नंतर आजारपणात गेले. पण क्लासमेट अजूनही काँग्रेसशी तसेच राजकारणाशी संबंधीत आहे त्यामुळे माझे माहेरी जाणे झाले की सगळ्या बातम्या कळायच्या. एकदा तो आला म्हणाला की दुसरे आमदार ( जे आधी २ दा निवडुन आले ते ) यावेळी उभे राहीलेत. तर कार्यकर्ते त्यांना जाम लुटतायत. म्हणजे आपल्याला मते हवीत ना भाऊ, मग जरा १०-५ हजार द्या, वस्तीवर साड्या वाटुन येतो, गरीबांना मदत करतो. असे सांगुन ही पोरं आमदार साहेबांकडुन दरवेळेस पैसे घेत होते. आता गरीबांना ही पोरे देत होती की नाही काय माहीत? पण मधल्या मध्ये स्वतःचा खर्चापाणी काढत होते. शेवटी हे पाहुन माझ्या क्लासमेटने आमदार साहेबांना सगळे सांगीतले आणी मग पोरांचे चा-पाणी बंद झाले.
सगळेच कार्यकर्ते असे नसतात. काही खरच जीवाचे रान करुन नेत्याला पुढे नेतात. पण यांच्या पदरात काय पडते देव जाणे ! >>>
-------- बापरे १० - ५ हजाराची मागणी... यांच्या कडे पैसे येतात कुठून ? ओsss काय म्हणता आमदार महाशय कॉंग्रेस पक्षाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस का भारतीय राष्ट्रिय काँग्रेस ? मग अगदीच बरोबर आहे, संदेश पोहोचला.
काल बिस्किटाची रचलेली, अर्थात बोगस, कथा वाचली होती. काही कार्यकर्ते सतरंज्या उचलतात, काही कार्यकर्ते (अर्थात दोन बुके शिकलेले) बोगस कथा लिहीतात, मग संगणक युगातले आधुनिक कार्यकर्ते अशी रचित कथा पुढे (WA/ FB/ मायबोली) ढकलतात.... पण हाय रे तुमचा वाचक वर्ग इयत्ता ३ मधे नाही आहे.
आज काँग्रेस आमदाराची अनुभव/ कथा... बोगस असेलच असे म्हणता येणार नाही. विश्वास ठेवतो. पक्षाचा उल्लेख न करताही अनुभव लिहीला असता.
खोट्या जाहिराती करुन, खोट्या कथा (वर बिस्किटाची रचलेली कथा आहेच उदाहरण म्हणुन), धादांत खोटी आकडेवारी सादर करुन, खोट्या आकडेवारीचे छान सुंदर रंगिबेरंगी आलेख काढुन, किंवा एखाद्याच्या तोंडात त्याने न म्हटलेले विधान कोंबुन केलेली फसवणूक पण भ्रष्टाचारच आहे.
निवडणूकीच्या वेळेला खोटी आष्वासने देणे हा पण भ्रष्टाचारच आहे. भ्रष्टाचार होत असतोच. कुठला पक्ष धुतल्या तांदळासारखा आहे ? असे विचारण्यापेक्षा कुठला पक्ष कमी भ्रष्टाचारी आहे हे विचारणे जास्त संयुक्तिक ठरेल.
प्रत्येक कार्यकर्त्याने ही
प्रत्येक कार्यकर्त्याने ही कविता एकदा वाचावीच
https://www.maayboli.com/node/6745
एककल्ली स्टिरीओटाईप विचार
एककल्ली स्टिरीओटाईप विचार आहेत. कार्यकर्ता म्ह्टले की झेंडा पिक्चर प्रमाणे येड्यासारखे नेत्याची थुण्की झेलणारेच असा डोक्यात विचार पक्का करून लोकं लिहीत आहेत. ज्यालात्याला अक्कल असते स्वत:ची. ज्याला आयुष्यात फार कष्ट करायचे नसतात वा फार काही मोठे करायची पात्रता नसते अशी पोरं कुठल्यातरी पक्षासोबत चिकटून आपला गुजारा करतात, रमतात, चार ओळखीही बनवतात ज्या पुढे मागे कामाला येतात.
निवडणूकीच्या काळात पाचशे हजार दारू मटणला येणारे हंगामी कार्यकर्ते झाले. त्यांची कधीही निष्ठा नसतेच. ते बेरोजगार असतात. घरी बसून पत्ते कुटण्याऐवजी अश्या उपक्रमात सहभागी होतात. मग मिळेल तो पक्ष.
प्रत्येकाचा आपला आपला स्वार्थ असतो.
शंभरात चार कार्यकर्ते येडे असतीलही. वा चार लोकांना उशीरा अक्कल येत असेल. पण हे चार येडे तसे सगळीकडेच असतात. तर आपण त्या चार येड्यात नाही याची खात्री असेल तर बिनधास्त कार्यकर्ते बना. बिनभांडवली धंदा आहे हा. तसेच लोकं जोडायचे टॅलेंट असेल तर नक्की पुढेही जाल.
अरे वा उदय ! उतावळेपणाने
अरे वा उदय ! उतावळेपणाने पटकन निष्कर्ष कढुन मोकळे झालात. काल वेळ नव्हता म्हणून एकच किस्सा लिहीला, पण काँग्रेसचे नाव घेतले म्हणून एवढे झोंबले का? घाबरु नका, बाकी पक्षाचे पण हिरो तसलेच आहेत. आमच्या इथलाच शिवसेनेचा एक पूर्ण वेळ कार्यकर्ता, नगरसेवक झाल्या बरोबर ३ वर्षात गावाबाहेर दुमजली बंगला बांधुन मोकळा झाला, जो आतापर्यंत भावाच्या घरी आपल्या बायको मुलासमवेत सरकारी क्वार्टर्स मध्ये रहात होता. कुठुन आले याच्याकडे एवढे पैसे? दुसरा कार्यकर्ता ( शिवसेनेचाच हो, कारण माझ्या माहेरी भाजपची चलती कमी आहे, तिकडे भाजपचे काहीच चालत नाही ) आमदार झाला, पाणी प्रश्न सोडवतो म्हणाला. पण गाड्या उडवायला रस होता, प्रश्न सोडवायला नव्हे. दुसर्या निवडणूकीत मार खाल्ला.
बापरे १० - ५ हजाराची मागणी... यांच्या कडे पैसे येतात कुठून ? ओsss काय म्हणता आमदार महाशय कॉंग्रेस पक्षाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस का भारतीय राष्ट्रिय काँग्रेस ? मग अगदीच बरोबर आहे, संदेश पोहोचला.>>>>>>>> मी पुढची पोस्ट लिहायच्या आधी तुम्ही प्रतीसाद दिलात. हो, आमच्या इथे काँग्रेस आणी शिवसेना जोरात असतात. आणी हे ही खरे आहे की शिवसेनेपेक्षा काँग्रेसच्याच लोकांनी भरपूर कामे केलीत. आणी हे ही तितकेच खरे आहे की या दोन्ही पक्षाच्या लोकांनी पैसाही तितकाच खाल्ला आहे.
इथे माबोवर तिन्ही पक्षाचे लोक एकमेकांना काहीही बोलतात, पण यांचे नेते मात्र आतुन एकमेकांशी मिळालेले असतात. आणी कार्यकर्ते मात्र भांडत बसतात. मला राजकारणात रस आहे, पण कुणावरच विश्वास नाही, सगळे एकाच माळेचे मणी.
पक्षाचा उल्लेख न करताही अनुभव लिहीला असता.>>>>>> का नाही लिहायचे पक्षाचे नाव? कळु द्या की लोकांना की काँग्रेस-भाजपा आणी शिवसेना या पक्षातही काही दगड असतात. जे कामे करतात, जनतेसाठी राबतात, ते चमकतात् हिर्यासारखे. पण नाव घेऊन लिहु नये असा कायदा आहे का?
<<काँग्रेसचे नाव घेतले म्हणून
<<काँग्रेसचे नाव घेतले म्हणून एवढे झोंबले का? >>
------- झोंबले नाही कारण काँग्रेस माझा पक्ष नाही. पण खटकले जरुर किंवा फक्त काँग्रेस नाव वाचल्याने गैरसमज करवुन घेतला.
पैसे/ दारु/ जेवण सर्वच वाटतात हे मान्य आहेच. कॉंग्रेसच आघाडीवर आहे असे नाही. सेना, भाजपा, स पा., रा कॉ... सर्व एका माळेचे मणी आहेत. २००४ मागे टंडन यांच्या वाढदिवसाला (साठी सत्तरी) गरिब महिलांना साडीवाटपाचा कार्यक्रम झाला. गर्दी, चेंगराचेंगरित २० महिला + १ बालक दगावले. मोठी घटना घडली तरच बाहेर गोष्टी येतात.
झोंबले नाही कारण काँग्रेस
झोंबले नाही कारण काँग्रेस माझा पक्ष नाही.

<<
आयटी सेल कार्यकर्ता बनला तर
आयटी सेल कार्यकर्ता बनला तर किती पैसे मिळतात?
२००४ मागे टंडन यांच्या
२००४ मागे टंडन यांच्या वाढदिवसाला (साठी सत्तरी) गरिब महिलांना साडीवाटपाचा कार्यक्रम झाला. गर्दी, चेंगराचेंगरित २० महिला + १ बालक दगावले>>>>>
इतके मागे कशाला जायचे,
2014-15 मध्ये म्हणजे अमेथी मधून हरल्या हरल्या लगेच , स्मृती बाईंनी मतदार संघात दिवाळीला साड्या वाटल्या होत्या,
हर मतदारांना लाच देणे नाही आहे का?
2014-15 मध्ये म्हणजे अमेथी
2014-15 मध्ये म्हणजे अमेथी मधून हरल्या हरल्या लगेच , स्मृती बाईंनी मतदार संघात दिवाळीला साड्या वाटल्या होत्या
<<
२०१४ मधे दिवाळी जून-जूलै महिन्यात होती काय ?
---------
हर मतदारांना लाच देणे नाही आहे का?
नवीन Submitted by सिम्बा on 21 December, 2018 - 16:05
<<
लाच कश्याबद्दल ?
मतदारांनी हरवल्याबद्दल .
--
-
उगाच कोणता ही विषय, कोठेही आणून जोडायचा.
--
त्या निवडणुकी निकाला दरम्यान एकवेळ अशी होती की इराणी बाईंनी कॉंग्रेसी पप्पूच्या तोंडाला फेस आणला होता. (408651 मते) आता इराणी बाईंनी त्यांना भरभरुन मतदान करणार्या (300748 मते) मतदारांना दिवाळी निमित्त काही भेटवस्तू दिल्या असतील तर त्याला लाच कसे म्हणता येईल.
जिंकल्या का मग इराणीबाई?
जिंकल्या का मग इराणीबाई?
हे पा, कारयकरता जनमजात असतो,
हे पा, कारयकरता जनमजात असतो, कोनचाही पक्ष, कार्यकर्ता "घडवु वा बिघडवू " शकत नाहि.
कार्यकरता असणे ही जनमाची खोड असते. सुम्ब जळला तरी पीळ जलत नाई तसे तुमच्या अस्या सांगाव्याने जनमजात कारयकरते काम करयचे थांबविणार नाईत.
सगळे पक्श अशाच कार्यकरत्यांमुळे जिवंत आहेत. अशा कार्यकरत्यांचे सगल्याच पक्शांवर उपकार हायेत.
lokshahi deshat rajkarna
lokshahi deshat rajkarna pasun alipt rahne yogya aahe ka