Submitted by बेफ़िकीर on 12 December, 2018 - 08:32
गझल - गझला बऱ्याच झाल्या
=====
तू नाही म्हटल्यानंतर मग युक्त्या बऱ्याच झाल्या
एक ओळही सुचली नाही, गझला बऱ्याच झाल्या
एकटाच हा उरला आता जेव्हा त्यांना कळले
नाही नाही म्हणत प्रेयस्या माझ्या बऱ्याच झाल्या
फक्त एकदा दिलेस औषध, मागे वळून पाहत
ज्या आजारी नव्हत्या त्याही इच्छा बऱ्याच झाल्या
टीका सोसत सगळ्यांची मी नव्या ठिकाणी रुजलो
आता बघतो तर माझ्याही शाखा बऱ्याच झाल्या
प्रेम लग्न संसार नोकरी गाठ एक रक्ताची
एका साध्या आयुष्याच्या गोच्या बऱ्याच झाल्या
एक टाकणे टाकल्यापरी दोन काढल्या संस्था
बेडरिडन होतील वाटले, साल्या बऱ्याच झाल्या
माझी पापे फेडण्यास मी तयार आहे दैवा
शिक्षा कमीच झाल्या, माझ्या खोड्या बऱ्याच झाल्या
'बेफिकीर' ह्या जगात अपुल्या मनास किंमत नसते
तरी कशा मग ह्याच मनाच्या चोऱ्या बऱ्याच झाल्या
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच!
मस्तच!
आवडली
आवडली
मस्त
मस्त
मस्त
मस्त
सुरेख
सुरेख
ही भारीये !
ही भारीये !
भारीच!
भारीच!
एक टाकणे टाकल्यापरी दोन
एक टाकणे टाकल्यापरी दोन काढल्या संस्था
बेडरिडन होतील वाटले, साल्या बऱ्याच झाल्या >>>>> ड्युआयडी ??
आवडली !
आवडली !
आवडली !
आवडली !