Submitted by शिवाजी उमाजी on 10 December, 2018 - 22:43
ताटातलं भांडण
कालच चकलीचं भांडण, झालं ताटातल्या लाडूशी,
म्हणते फणकारुन त्याला, बसला का रे माझ्यापाशी !
आधीच लाडू गोल मोल, पुरता गोरामोराच झाला,
सुचेना त्या काय बोलावं, आजूबाजूस बघू लागला !
गोड असुन स्वतः सुद्धा, गालामधे करंजी हसली,
काहीच न बोलता फक्त, नुसती पहातच न् बसली !
गाल फुगवून शंकरपाळे, अनारशा सोबतच बसले,
शेव चिवड्यास एकिकडे, भितीने कापरे कि भरले !
रूसवा फुगवा ताटातला, पाहुण्यांनी घेतला पाहून,
चकली, शेव, चिवड्यावर, घेतला छान हात मारून !
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अच्छाs !!! तर दिवाळीचा फराळ
अच्छाs !!! तर दिवाळीचा फराळ एकदाचा संपवून टाकला तर!!!!
खुप आभार पाटीलजी फराळ तर
खुप आभार पाटीलजी फराळ तर संपवावाच लागतो.