स्वयंपाक करणं हा आवडीचा विषय होऊ शकतो का? की कामाचा विषय आहे?
स्वयंपाक म्हणजे स्वत: शिजवलेले अन्न च ना? की घरातल्या बाईने (स्त्री) बनवलेले ? की स्वयंपाक्याने तयार केलेले? की आणखीन काही असते?
स्वयंपाक नक्की कोण आवडीने करीत असेल? अन् कोण काम म्हणून करीत असेल?
स्वयंपाक नेमका कोणी करावा?
अणि का?
आवड म्हणून? नाइलाज म्हणून? काम म्हणून? पर्याय नाही म्हणून? की भूक लागली म्हणून?
स्वयंपाक मुळात का करावा लागतो?
भूकेमुळे?
करावासा वाटला म्हणून? की
करायला सांगितला म्हणून?
स्वयंपाक करायला कोण सांगत?
घरातले?बाहेरचे?पाहुणे?लहानगे?वडीलधारे?संस्कार? की आणखीन कुणी?
स्वयंपाक करायला कुणाला सांगितलं जातं? आणि त्यालाच का सांगावेसे वाटते किंवा सांगितले जाते?
काम म्हणून की आवड म्हणून?
अन् स्वयंपाक करायचा म्हणजे नेमके काय करायचे?
कधीकाळी चूल मांडली जायची---
नंतर स्टोव्ह पेटवावा लागायचा-----
अलीकडे ग्यास ( सिलेंडर) चा बोलबाला जाणवतो!!!!!!
मग भांडीकुंडी आली----
चार भांडी तरी आलीच!!!!
ताट,वाटी,पळी, चमचा, पातेले (लहान/मोठे)------
बर एवढं सारं असलं म्हणजे स्वयंपाक होत नाही.मीठ,मिरची,मसाला,भाज्या, तांदूळ,पीठ,तिखट---- असं बरंच मटेरियल जवळ,घरात, किंवा स्वयंपाकघरात,डब्यात असले पाहिजे!!!!!
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक आला पाहिजे.
निदान स्वयंपाकात निपुण नसलं तरी बय्रापैकी स्वयंपाकाची जाण असली पाहिजे.
"आधी हाताला चटके,तवा मिळते भाकर"
घरचं जेवण कसं तयार होतं? ते माहीत नसणारे, स्वयंपाक करणाय्रा घरातील त्या व्यक्तीला नेहमी तुच्छ नसलं तरी बावळट समजतात.अलिकडे 'माझ्या नवय्राची बायको'मधिल राधिका हे एक उदाहरण आहे.
अर्थात घरातला स्वयंपाक करणाय्रा व्यक्तीला स्वत:ला शहाणे समजणारे कितीही बावळट समजत असले तरी भूक लागली की तेही बावळटासारखेच वाटतात.मग लक्षात येते की वेळच्यावेळी गरमागरम,ताजे जेवण बाहेर अव्वाच्यासव्वा पैसा खर्चूनही मिळत नाही,मिळणारही नाही.
तसे आजकाल बाहेर ही होटेल,मेस मध्ये घरगुती पद्धतीचे जेवण पुरवले (विकले) जाते,म्हणा!
बय्राचकारणामुळे घरचे जेवण करता येत नाही, वेळेअभावी. मग बाहेरचे जेवण त्यातही घरगुती पद्धतीचे मिळाले तर नशिबच!
आता घरचे बाहेरचे यातली सिमारेषा पुसत चालली आहे खरी.....
आर्डर देवून जेवणं मागवून घरात जेवण होत हल्ली बरेचदा! नाहीतर वरचेवर होटेलींग चालतच--पार्टी, फंक्शन, कार्यक्रम, लग्नकार्य,एखादे समारंभ,बारसे, डोहाळजेवण, वास्तुशांती असे परंपरागत जेवणाच्या पंगती बसतात (पूर्वी बसायच्या) हल्ली उठतात (बफे)!!!! आता उठून ( उभे राहून) जेवा,नाहीतर डायनिंग टेबल- खुर्ची मांडून जेवा पण स्वयंपाक बनवावाच लागतो.मग तो बाहेर बनवा किंवा घरात!!! त्याशिवाय गत्यंतर नाही.
कारण भूक ही लागतेच, बावळट असला तरी,अन् स्वत:ला शहाणे समजत असाल तरी,खिसा रिकामा असला तरी---अन् खिशातला (पाकेट/पर्स) पैसा उड्या मारू लागला तरी!!!!!
तर मुद्दा काय आहे की स्वयंपाक करणं ( घरातला/ बाहेरचा) हे बावळटाचे काम नाही,"तिथे असावे जातीचे!" असे म्हणण्याइतपत ते काम (आवडीचे/नाइलाज/व्यवसाय म्हणून) महत्त्वपूर्ण आहे.
त्यामुळे स्वयंपाक येणाय्रा/करणाय्रा व्यक्तीला कुणी कमी लेखू नये व हे त्याचेच काम म्हणून आपण फक्त खायचे काम न करता पुढे होवून स्वयंपाक थोडाफार का होईना शिकून घ्यावा व येत असेल तर करावा, कमीतकमी स्वत:च्या घरासाठी,घरात तरी!
त्यामुळे होईल काय स्वावलंबन अंगी भिनेल, दुसरे म्हणजे वर्षानुवर्षे (आपल्या पणज्या,आज्या, मावश्या,काक्या,आया----ही लांबलचक रांग फक्त स्त्रियांचीच का?) स्वयंपाकघरात आयुष्य संपवलेल्या व्यक्ती किती बुद्धिमान होत्या,हे हळुहळू लक्षात येत जाईल.अन् आपल्या आसपास स्वयंपाक करणाय्रा व्यक्तीला आदराने पाहण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज भासणार नाही.
तर मग काय विचार आहे,आपला?
आणि तसे पाहता स्वयंपाक ही ६४ कलांमधील एक (१४वी) कला आहे, हे लक्षात असू द्यावे.म्हणजे कलानिपुन व्यक्ती वरकरणी सामान्य वाटत असली तरी ती असामान्य व्यक्तिमत्त्व असते.मग ती कला कोणतीही असो!!!!!!
मग काय म्हणता तुम्ही????
अर्थात कुणी काय म्हणावे,लिहावे ही ज्याची-त्याची मानसिकता शेवटी!!!!! कुणाला हे माझं लिहीनेच फुटकळ, लाऊड थिंकींग,वा जिलेबी टाकण्यासारखे वाटू शकते/किंवा वाटते ---- जवळची मोजपट्टी वारसाहक्काने मिळाल्यासारखे दुसय्रांचे धागे सटासट मोजत, भारंभार काम आटोपल्याच्या आविर्भावात कुणी किंमत मोजू पाहत असेल तर त्याला आपण तरी काय करणार?
बापरेs
Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 05:11
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बापरे!!!
बापरे!!!
गावाकडे पाटील करतात सर्वांचा
गावाकडे पाटील करतात सर्वांचा स्वयंपाक. पा म्हणजे पाकक्रिया तील मुखिया असे पातील हे उपमान पुढे उच्चारदोषाने पाटील असे झाले.
आपण आठवड्यात १४ वेळा जेवतो.
आपण आठवड्यात १४ वेळा जेवतो.
त्यापैकी ५ वेळा मी ऑफिस कॅन्टीनचे जेवतो.
आणि ५ ते ६ वेळा स्विगी झिंदाबाद, नाहीतर विकेंड हॉटेलातच..
त्यामुळे स्वयंपाक फार तर २-३ वेळाच असा करावा लागतो.
यापेक्षा जास्त वेळा लोकं दाढी करतात.
मी स्वत: दाढी दोन तीन महिन्यातून एकदा करतो ती गोष्ट वेगळी.
पण मी आंघोळ रोज करतो हेच माझ्या घरच्यांसाठी खूप आहे.
अर्थात डोक्यावरून रोज नाही करत.
पण ते चालते. कित्येक लांब केसांच्या बायका तरी कुठे रोज डोक्यावरून करतात.
आणि तसाही मी स्त्री पुरुष भेद मानत नाही.
त्यामुळे आमच्या घरात स्वयंपाक बायकांनीच करावा पुरुषांनी नुसती भांडीच घासावीत असा काही नियम नाही. दोन्ही कामे स्त्रीपुरुष आलटून पालटून करतात.
लहान मुलांना मात्र स्वयंपाकाला जुंपत नाही. बालकामगार कायदा आधी स्वत:च्या घरापासून पाळावा. मुलं आपली गुलाम नसतात.
आपली प्रजननक्षमता सिद्ध करायला त्यांना जन्म दिलाय तर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी आपलीच असते.
फक्त त्यांना अन्नाची नासाडी न करता आपल्याच हाताने खायची सवय लावावी
नाहीतर स्वयंपाक राहिला बाजूला आणि यांनाच वाढा भरवा उष्टी काढा ....
मी स्वत: दाढी दोन तीन
मी स्वत: दाढी दोन तीन महिन्यातून एकदा करतो ती गोष्ट वेगळी.
>>> जामखीळ प्रॉब्लेम का?
नाही. दोन कारणे
नाही. दोन कारणे
आळस - मला दाढी घरी करायला बोअर होते. मग बाहेरच केस कापायला जातो त्यासोबतच करतो.
स्टाईल - मला वाढलेली दाढी छान दिसते. आणि ज्या पुरुषाला दाढी छान दिसते त्याने जरूर ठेवावी. कारण ती नैसर्गिक आहे. निसर्गाने ती महिलांना न देता पुरुषांनाच दिलीय. त्यामुळे निसर्गाच्या कारभारात फार ढवळाढवळ करू नये. उत्तम दाढी हा पुरुषांचा दागिना आहे.
उत्तम दाढी हा पुरुषांचा
उत्तम दाढी हा पुरुषांचा दागिना आहे.+१
म्हणजे आता स्वयंपाकावरून
म्हणजे आता स्वयंपाकावरून दाढीकडे वळला विषय!
बाकी कुठल्याहि धाग्यावर स्वतःबद्दल लिहून स्वतःकडे लक्ष वळवण्याचा धंदा बर्याच लोकांना छान जमतो.
तरी अजून शाहरुख खानचे गुणगान कसे सुरु झाले नाही?
शिवाय त्यांचे मित्र हायझेनबर्ग अजून आले नाहीत.
हे दोघे आले की विषय काय, मुद्दा काय कश्शाचा काही धरबंद नाही नि भरकटत धागा सहज शंभरी गाठतो.
मज्जा आहे न् काय मायबोली म्हणजे.
आता ऋन्मेSSष ने विषय बदललाच आहे, तर मी म्हणतो, मायबोलीकरांनी प्रत्येक पानावर जाहिरात का देऊ नये?
म्हणजे भरपूर पैसे मिळतील मायबोली ला. मग दर महिन्यात जो जास्तीत जास्त पाने खर्च करेल, त्याला एक बक्षीस!
बापरे !!
बापरे !!
लाउड थिंकिंग आहे का हे?
तरी अजून शाहरुख खानचे गुणगान
तरी अजून शाहरुख खानचे गुणगान कसे सुरु झाले नाही?
>>>>
बघा करमत नाही ना तुम्हालाही
हे सुद्धा बदलून अजून छान वाटत
हे सुद्धा बदलून अजून छान वाटत आहे.
बदल केल्याबद्दल धन्यवाद.