६४ कला,१४ विद्या नेमक्या कोणत्या आहेत?

Submitted by Mi Patil aahe. on 1 December, 2018 - 23:53

६४ कला असतात म्हणे अन् १४ विद्या!
पण त्या कोणत्या?
नृत्य, गीत, संगीत-----या ६४ कलांमध्ये मोडतात,असे वाटते.
तर
वाक्चातुर्य, ज्योतिष, संमोहन--- अशा काही विद्या वाचनात आहेत.
पण पूर्ण माहिती नाही.तर ही माहिती कोण देईल मला?
कुणी दिली माहिती तर उत्तमच तेव्हढीच ज्ञानात भर!!
अन् नाहीच दिली तरी फारसे काही बिघडणार नाही,निदान रोजच्या रहाटगाडग्यात!!!!!
तसेही रोजच्या रहाटगाडग्यातील बरीचशी कामे ही एक कलाच असते,म्हणा! फक्त ती करणाय्रांना त्याची जाणीव/माहिती नसते इतकेच!!!!!! आता हेच बघा ना, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण काही ना काही करतोच---- ती सर्व कामे बारकाईने आठवून पाहिली तर लक्षात सहज येईल की आपण ही एक कलाकारच आहोत.अन् कुठलीही कला विद्येविना जन्मत नाही.म्हणजे १४ विद्यातील एकातरी ज्ञानाचा अंश आपल्यात नक्कीच असणार! फक्त ते आपल्यालाच ठाऊक नसते. जसे की कस्तुरीमृगालाच आपल्या बेंबीत असलेले कस्तुरीचे ज्ञान नसते म्हणतात, अगदी तसेच आहे हे-----

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मूळ प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे, आता येऊ द्यात इतर लोक, नि होऊन जाऊ दे धिंगाणा. दर धाग्याला शेकडो प्रतिसाद मिळेस्तवर बावळटासारखे लिहीत रहायचे, म्हणजे त्याहून जास्त बावळट लोक येऊन आणखी काहीतरी लिहीतात!

हाय पाटीलबर्ग !
भेटा वडापावच्या गाडीवर. जिलब्या टाकायचे बंद करायला किती घेणार ? मीटींग करू.