Submitted by Mi Patil aahe. on 28 November, 2018 - 06:19
अंधाराची मला बाबा फारच वाटे भीती !
असतो म्हणे,बागुलबुवा दबा धरून बसलेला----
अंधाराचा शर्ट घालून येतो म्हणे, हळूच रात्री!
लहान मुलांना पाहताच----
घालतो म्हणे ; हळूच आपल्या खिशात!
अन् घेऊन जातो म्हणे; आपल्या दूर अंधार देशात!!!!!!
एकदा मात्र मी ठरवूनच टाकल----
अंधारबाबाला हाकलून लावायच!
कोपरातली काठी घेऊन,
मी त्याच्या मागेच लागलो!
तोच, " कुठे धडपडू लागलास, सकाळच्या पारी?"
आवाज आला कानी!!!!!!
वळून पाहिले मागे तर ;आई होती दारात उभी!
"अंधारबाबाला मी हाकलून लावले"छाती फुगवून मी सांगू लागलो----
माझा कान पकडून ,आईने पूर्वेकडे बोट केले---
सहस्त्ररश्मीने आगमन होते केले!
अंधारबाबाचे निघून जाण्याचे ,कारण मला कळून चुकले!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूप गोड आणि निरागस.
खूप गोड आणि निरागस.
हायझेनबर्ग मी आपली आभारी आहे.
हायझेनबर्ग मी आपली आभारी आहे.
छान आहे कविता,
छान आहे कविता,
<<खूप गोड आणि निरागस.>>
<<खूप गोड आणि निरागस.>>
हो ना.
Thanks नन्द्या & वेडोबा
Thanks नन्द्या & वेडोबा
खुप छान कविता...
खुप छान कविता...
शिवाजी उमाजी आपणं 'छान'
शिवाजी उमाजी आपणं 'छान' म्हणालात माझ्या कवितेला यातच मी भरून पावले,thanks!
छान कविता.
छान कविता.