Submitted by बेफ़िकीर on 27 November, 2018 - 11:43
गझल - मात्र यशस्वी पुरुषामागे स्त्री असते
=====
काहीदा ही, तर काहीदा ती असते
मात्र यशस्वी पुरुषामागे स्त्री असते
ही कोणीही नसते जेव्हा मी नसतो
मी कोणीही नसतो जेव्हा ही असते
मनात माझ्या कुणी कधीही नसते पण...
प्रत्येकीला वाटत असते, 'मी असते'
करुणाप्रधान होणे जमले तर पाहू
माझ्या मनात येण्यासाठी फी असते
बरेचदा म्हणणे आपण मांडत बसतो
बरेचदा ते ओढत बसणे री असते
किती माणसाहून वेगळी झाली ही
काही फळाबिळांना हल्ली बी असते
वेळ अवस्था मनस्थिती वा परिस्थिती
तिचाच असतो, माझी तेव्हा जी असते
'बेफिकीर'चे मन कुणास कळले नाही
अन्यथा इथे 'मी' जागी आम्ही असते
-'बेफिकीर'!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कडक
कडक