थेंबही पुसला

Submitted by Tejakar on 19 November, 2018 - 15:23

डोळ्यात तेल घालूनी, कण कण आम्ही निसला,
शोध लागला प्रकाशाचा ही, परी अंधार कसा दिसला,
असा कसा रे रुसून बसला,
काळ्या पाषाणावरील इथला थेंबही पुसला.

आभाळाच्या कोर्‍या पाटीची, रेघही कुठे दडून गेली,
मातीलासुद्धा विसरून आता आम्हालाही पोरकी झाली,
सुगंध दरवळणारा तो मातीचा, कुठे तीच हरवून गेली,
अंधार्‍या दुनियेतल्या त्या राजानं, इथं कशी रे घरटी केली..

आतुरलेले डोळे हे, खरच दिसेना का तुला?
नको कधीतर अमावस्येला, दर्शन देशील मला?
पाणावलेले नेत्रं घेऊन, आठवतो रोजच तुला
धरणीवरचे थेंब विचारती, भेटशील का रे मला?....
~राहुल गुंजाळ

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults