Submitted by आकाशानंद on 17 November, 2018 - 01:22
प्राईम व्हीडीओ वर काल-परवा रिलीज झालेली मिर्झापूर हि नवी वेबसिरीज बघायला सुरुवात केली आहे! पहिल्या सिझन मधल्या ९ भागांपैकी आत्ता पर्यंत ३ भाग बघून झाले आहेत! भाषा आणि दृश्यांमध्ये नेटफ्लिक्स वरच्या सॅक्रेड गेम्सशी खूप साधर्म्य जाणवतंय! दिग्दर्शन पण प्रभावी वाटतंय!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झाली संपूर्ण बघून! सादरीकरण
झाली संपूर्ण बघून! सादरीकरण आणि पंकज त्रिपाठी, कुलभूषण खरबंदा यांच्या सशक्त अभिनयाला इतर कलाकारांची योग्य साथ मिळाल्याने मालिका चांगली वाटली!
हिंसा, शिवराळ भाषा आणि प्रणय दृश्ये गँग्ज ऑफ वासेपूर आणि सॅक्रेड गेम्सची आठवण करून देतात! श्रिया पिळगावकरचा अभिनय ठीकठाक आहे पण चेहऱ्यात आई सुप्रिया सारखा गोडवा नाही!