Submitted by सुप्रिया जाधव. on 3 November, 2018 - 13:47
तहाचे बोलणे करते कधीचे
मना रे झाड तू बहुधा शमीचे
ऋतूपालट जगाचा नियम आहे
दिवस नसतात ना सगळे सुगीचे
निखारे तुडवण्यातच जन्म गेला
नको अप्रूप सांगू ह्या धगीचे
जिव्हारी बाण रुतलेला असावा
तसे रक्ताळले अश्रू कवीचे
भिजत जाते, गिळत परदु:ख सारे
तुझ्या मी खोळ ओलेत्या उशीचे
भविष्याचा कुठे अंदाज येतो ?
बरोबर वाटते निघते चुकीचे
जवळ घेऊन थोपट वेदनेला
'प्रिया' होईल बघ सोने कुशीचे
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
A1
A1
छान कविता
छान कविता
खूप छान!
खूप छान!
भिजत जाते, गिळत परदु:ख सारे
तुझ्या मी खोळ ओलेत्या उशीचे.....हे विशेष भिडले.
नेहमीप्रमाणेच छान !
नेहमीप्रमाणेच छान !
कडक...लय भारी
कडक...लय भारी