Submitted by एस.जी. on 28 October, 2018 - 23:56
गुंतलो मोहात मी मग मोकळा झालोच नाही
गवसले सारे तराणे मी मला दिसलोच नाही
उत्तरे मी फक्त झालो अन् खुलासे देत गेलो
काळजाला छेदणारा प्रश्न मी झालोच नाही
चांदण्यांचा ह्या तुझ्या मी व्देष केला सांग केव्हा
कमनशीबी मीच आहे मी तुला कळलोच नाही
भेदभावाला न थारा या व्यथांच्या पंगतीला
वाटणी माझी मिळाली मी असा चुकलोच नाही
सोडले तव नाव अंती सोडले तव गाव अंती
गुंतल्या पाशास पण मी सोडवू शकलोच नाही
रीत ही सोपीच होती द्यायचे मग घ्यायचेही
जिंदगी उधळून आलो घ्यायला उरलोच नाही
एस. जी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा