Submitted by इस्रो on 21 October, 2018 - 10:14
माझे कसे चुकले किती, सांगून जा केव्हातरी
तिकडून जाण्याऐवजी, इकडून जा केव्हातरी
सांगायचे आहे तुला, बोलू न शकले जे कधी
डोळ्यात माझ्या तेच तू, वाचून जा केव्हातरी
कपडे कसे नेसायचे, देवास कुठल्या जायचे
मी काय केव्हा खायचे, ठरवून जा केव्हातरी
विसरायचे कैसे कुणा, ते शिक जरा कोठेतरी
नंतर कला ती तू मला, शिकवून जा केव्हातरी
नुसत्याच काय व्हाव्या, नजरेतुनी खाणाखुणा
श्वासात माझ्या श्वास तू, मिसळून जा केव्हातरी
प्रत्येक क्षण कर साजरा, गा नाच आनंदात तू
वय आपुले 'इस्रो' जरा, विसरून जा केव्हातरी
- नाहिद नालबन्द 'इस्रो'
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! आवडली गझल.
वा! आवडली गझल.
छान
छान
विसरायचे कैसे कुणा, ते शिक जरा कोठेतरी
नंतर कला ती तू मला, शिकवून जा केव्हातरी">>> जास्त आवडले
साहेब,
साहेब,
ही तरही गझल आहे आणि तरही मिसरा माझा आहे
उल्लेख केला असतात तर बरे वाटले असते
कारण पुढे दोन चार वर्षांनी काही भलतेच लोक आरोप करू लागतात की ह्याची गझल त्याच्या गझलेवरून घेतली आहे
आधीच कादंबऱ्या चालल्यायत चोरीला
गझलेत घोळ नकोत व्हायला
66988
66988
इस्त्रो, बेफिजी काही म्हणत
इस्त्रो, बेफिजी काही म्हणत आहेत, त्यात तथ्य असेल तर संपादन करुन श्रेय द्या.
चूक सुधारणे योग्यच!
तरही गझल छान आहे!
बेफिकीरजी, तरही मिस-याच्या
बेफिकीरजी, तरही मिस-याच्या उल्लेखाविषयी पुढच्या वेळेपासून नक्की काळजी घेईन. तरी तुमच्या भावना मी दुखावल्या त्याबद्दल क्षमस्व.
प्रतिसादासाठी आपणा सर्वांना धन्यवाद!