नवरात्र : आदिशक्तीचा जागर
माळ आठवी
“अंबे तुळजापूरवासीनी माते भंडासुर मर्दिनी
दुर्गे निशुंभनिर्दालनी भवानी महिषासुरमर्दिनी”
आजचे पूजन हे दुर्गेचे. दुर्गाष्टमीला या जगतजननीचे पूजन करण्यासारखे दुसरे सुख नाही. तिच्या सान्निध्यात राहून सदैव तिच्या सेवेत रहाण्याचे आंतरिक समाधान शब्दातीत असते.
आपल्या आजच्या माळेचे नाते हे असेच मनस्वी आहे. ती म्हणजे जीवाला जीव देणारी आपली जिवलग सखी. आपले रूसवे फुगवे सहन करणारी व वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या चांगल्या गोष्टींचे सदैव कौतुक करणारी. आपल्या यशात स्वताचे यश मानणारी. गोड गुपिते जपून मैत्री जोपासणारी अशी. या सखीचे आपल्या आयुष्यातले स्थान अढळ असते. पाहिजे तेंव्हा सडेतोड पण खरे सल्ले देऊन भल्या-बुर्यार गोष्टींची जाणीव करून देणारी ही आपली मैत्रीण आपल्याला प्राणापेक्षा प्रिय असते.
आजच्या आपल्या मोरपंखी रंगाप्रमाणेच त्रीव्रता, उत्साह व प्रचंड सकारात्मक ऊर्जा असलेल्या माझ्या सर्व सख्यांना शतश: नमन. यापुढे देखील सदैव आयुष्यात अशाच कायम माझ्या पाठीशी कणखरपणे उभ्या रहालच हीच दुर्गामातेला मनापासून केलेली प्रार्थना आहे..