नवरात्र : आदिशक्तीचा जागर
माळ सहावी
नवरात्रात जगतजननीचे रोज एक वेगळेच रूप असते. आजचा मान सरस्वतीपूजनाचा. माणसाला आयुष्यात जर देवी सरस्वती प्रसन्न झाली तर लक्ष्मीचा पण सहवास लाभणारच हे एक समीकरण असते.
एक स्त्री शिकली तर तो पूर्ण परिवार शिक्षित असतो. यासाठी मानवी रूपातील सरस्वती सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे यांची थोरवी अपरंपार आहे.
देवी सरस्वतीचा आवडता रंग पांढरा. सर्व रंगांमध्ये आपसूक मिसळून जाणारा पण आपले वेगळेपण कायम दाखवूनच. त्याचप्रमाणे आजच्या आपल्या माळेचे नाते म्हणजे “नणंद”. पूर्वी लहान वयात लग्न होऊन मुली सासरी जायच्या, तेंव्हा तिच्याच वयाची तिची हक्काची सखी ही तिची नणंदच असायची.
पुढील काळात लग्नाचे वय वाढले तरी हे नाते मात्र तसेच हक्काचे , लटक्या रागाचे, अडिअडचणीत मदत करणार्या लाडक्या मैत्रिणीसारखे राहिले.
हे नाते म्हणजे जणू आपल्या आजच्या पांढर्या रंगाचे, शांतीचे प्रतिकच आहे. शुद्ध , विश्वासू व मनाला स्थैर्य देणारेच जणू.
“सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्रम्ब्यके गौरी
नारायणी नमोस्तुते”