परतपाटी

Submitted by नववधू on 13 October, 2018 - 05:28

नमस्कार मायबोलीकर सभासदांनो,
परवा माझ्या सासूबाईंना माझी आई त्यांच्याकडच्या लग्नाच्या प्रथांबद्दल विचारत होती तर सासूबाई म्हणाल्यात त्यांच्याकडे लग्नानंतर पहिल्यांदा जेंव्हा माहेरची मंडळी मुलीला घ्यायला येतात तेंव्हा 'परतपाटी' घेऊन येतात सोबत. आईला 'परतपाटी'बद्दल फक्त ऐकीव स्वरुपाची माहिती आहे. पण त्यात काय काय असत हे माहिती नाही. माझ्या एका कलीगने मायबोलीवर विचारुन बघ तुला नक्की मदत मिळेल असे आवर्जुन सांगितले.

आम्हाला 'परतपाटी'बद्दल माहिती द्यायला आणि त्यात लागणारे सामान पुण्यात कुठे मिळेल हे सांगायला हा धागा मदत करेल ही अपेक्षा .
तुमच्या प्रतिसादांची आतुरतेनी वाट बघत आहे. धन्यवाद.

प्रिया

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

घरात अजून कोणी मोठे स्त्री नातेवाइक असतील तर त्यांना विचारून घ्या. उगीच साबांचा पापड मोडायला नको.
अश्या कारणेनच मला कोरीअन जावई हवा आहे. परत नाही अन पाटी नाही.

अमा, असं म्हणालात तर जॅपनीज, चायनीज, आणि इतर अभारतीय लग्नाळू मुलांना किती वाईट वाटेल ह्याचा काही विचार? Wink

सासूबाईंनाच विचारा सरळ. ऐकीव माहिती जिथून मिळेल त्यांच्यात अमुक द्यायचे व तमुक नको असे असेल आणि साबुना नेमके तेच हवे असेल तर पंचाईत होईल. वरच्या लिन्कमध्ये 'काही कमी दिले गेले तर तिथेच मापे काढली जातात' हे वाचल्यावर सरळ त्यांनाच विचारून दिलेले बरे असे वाटून गेले.

अश्या कारणेनच मला कोरीअन जावई हवा आहे. परत नाही अन पाटी नाही.>>>>

आशियाई जावयाच्या भानगडीत मुळात पडूच नका. इथून तिथून सगळे आशियाई सारखेच. कोरियन मेकअप किट द्यायची पद्धत असली तर डोळ्यांचा मेकअप किट कुठे शोधणार.

नावातच जिथे 'पे बॅक' आहे तिथे काय अपेक्षा Happy Happy
https://en.m.wikipedia.org/wiki/Pyebaek

प्रत्येक घरातल्या पद्धती वेग वेगळ्या असतात त्यामुळे इथे जरी माहिती मिळाली तरी तिचा तुम्हाला उपयोग होईलच असे नाही त्यापेक्षा डायरेक्ट साबा ना विचारूनच परत पाटी बद्दल ठरवा, कदाचित अजून वर्षभर आशा विविध पद्धतीही असू शकतील,प्रत्येक वेळी बाहेरून मदत मागण्यापेक्षा घरातच विचारले तर जास्त चांगले असे मला वाटते

डायरेक्ट साबा ना विचारूनच परत पाटी बद्दल ठरवा>>+१

आमच्या घरचे तर ह्यांच्या घरात काय प्रथा आहेत हे विचारायच्या फंदातच नाही पडले. Proud तुमच्यात असेल ते तुम्ही करा आणि आमच्यात असेल ते आम्ही करु. आमचे काही खटकले तर आम्हाला सांगा मुलीला काही बोलायचे नाही असे सांगून मोकळे झाले होते.