सांजवलेल्या आयुष्या चल वाट चालण्या अंधाराची
पुरे उजळणी गतकालाच्या वैभवशाली कर्तृत्वाची
भूक, वेदना, पाप, पुण्यही नष्ट जाहले मृत्यू होता
आत्म्याने का वाट बघावी? पिंडदान मिळण्या श्राध्दाची
कुठून आला? कसा मिळवला? प्रश्न केवढे गौण जाहले?
घरात पैसा अमाप असणे, बाब वाटते अभिमानाची
तेल वड्याचे वांग्यावरती काढायाचा प्रघात म्हणुनी
नोकरदारांवरती खटले, सुटका होते पण नेत्याची
आत्मवृत्त मी उगाच लिहिले, पाठ फिरवुनी वाचक गेले
कोण वाचतो भग्न कहाणी पराजिताच्या मनोगताची?
उत्तरार्ध येण्याच्या आधी, पाश तोडले जर असते तर
आली नसती वेळ आज ही अशी शेवटी कण्हावयाची
तू गेल्यावर असे वाटले जीवनात ना राम राहिला!
आज कळाले आठवातही उर्जा असते जगावयाची
गरीब जनता शतदा मरते जगता जगता मरण्याआधी
श्राध्द करावे कुठल्या दिवशी? हीच कसोटी पंचांगाची
बंडखोर "निशिकांत" असोनी, अंगिकारली स्थितप्रज्ञता
मावळताना आस न उरते, जगावयाची, मरावयाची
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
गरीब जनता शतदा मरते जगता जगता
गरीब जनता शतदा मरते जगता जगता मरण्याआधी
श्राध्द करावे कुठल्या दिवशी? हीच कसोटी पंचांगाची
बंडखोर "निशिकांत" असोनी, अंगिकारली स्थितप्रज्ञता
मावळताना आस न उरते, जगावयाची, मरावयाची
मस्तच!
प्रगल्भ आशय. सहज सुंदर गझल.
प्रगल्भ आशय. सहज सुंदर गझल. बरेच दिवसांनी मला गझल आवडली. शीर्षक सुद्धा छान.
आत्म्याने का वाट पहावी मधे बहुधा दोन लघुंमुळे लय जमत नाहीये गुणगुणताना.
नोकरदारांवरती.... इथे आत्ता जमले. इथेही दोन लघुंचा गुरू घेतलाय का ?
बाकी निर्विवाद सुंदर.
मनापासून आभार शाली दिलखुलास
मनापासून आभार शाली दिलखुलास प्रतिसादासाठी.
किरणुद्दीनजी, दोन लघूंचा एक
किरणुद्दीनजी, दोन लघूंचा एक गुरू हमखास वापरला जातो असे मला वाटते. मात्रांची संख्या आणि लयीत वाचता येणे या दोन बाबी पाळल्या आहेत मात्रावृत्तात अवश्यक असलेल्या. मनापासून आभार अपले दिलखुलास प्रतिसादासाठी.
निशिकांत, गझल आवडली.
निशिकांत, गझल आवडली.
>>>आत्मवृत्त मी उगाच लिहिले, पाठ फिरवुनी वाचक गेले
कोण वाचतो भग्न कहाणी पराजिताच्या मनोगताची?>>>
सही!