Submitted by चिनूक्स on 27 March, 2009 - 03:49

८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच महाबळेश्वर येथे पार पडले. या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ पार्श्वगायिका श्रीमती आशा भोसले यांच्या हस्ते झालं. गेली साठ वर्षं आपल्या दमदार गायकीने समस्त रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या आशाताईंचं उत्स्फुर्त भाषणही अतिशय सुरेल होतं. "कवींनी माझे गाणे, तर लेखकांनी जीवन समृद्ध केले. मी कविता वाचायला गेले नाही, त्याच माझ्याकडे आल्या. त्यांना माझा आवाज आवडला", असं सांगत आशाताईंनी रसिकांशी मनमोकळा संवाद साधला. आशाताईंचं हे सुंदर भाषण खास आपल्यासाठी..
------------------------------------------------------------------------------------
उद्घाटनाचं भाषण आंतरजालावर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्रीमती आशा भोसले यांना धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे भाषण
हे भाषण मला कधी पासून ऐकायचे होते. इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
भाषणाच्या शेवटी हसत खेळत हल्लीच्या वारकरी संप्रदायाला काढलेला चिमटा एकदम आशा भोसले स्टाईलमध्ये!
(No subject)
चिन्मय,
चिन्मय, खूप आभारी आहे !
प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
चिन्मय,
चिन्मय, आपले अनंत आभार.
किती सहज,
किती सहज, गप्पा मारल्यासारखं भाषण!!! अधुन मधुन गाण्याच्या लकेरी!! झकास!!
खूप खूप धन्यवाद चिन्मय!
आयटी, चिमटा मस्तच!!
पाडव्याच्
पाडव्याच्या दिवशी एकदम मेजवानीच मिळाली आम्हाला...
इथे उपलब्ध करुन देणार्या सगळ्यांना धन्यवाद...
उद्घाटणपर
उद्घाटणपर भाषणा ऐवजी ही काहीसे स्वगतच वाटले. कलाकारांशी संवाद सदरात मध्ये ठेवायचे होते, त्याने रंगत तरी वाढली असती.
उद्घाटणपर भाषनात आजच्या साहित्याचा आढावा घेणे अपेक्षित असते. आशाजींचा चाहता असुनही खेदाने जागा चुकली असे म्हणावे वाटते. (तस आयोजकांचेही बरोबराच आहे म्हणा, त्या नसत्या तर कोण तिथे कडमडले असते, आजकालच्या साहित्यीक गोंधळानंतर)
सकाळ मध्ये
सकाळ मध्ये बातमी वाचल्यापासुन त्यांचे भाषण ऐकायची इच्छा होती. इथे ते उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
केदारशी
केदारशी सहमत! तरि एकदम छानसा अनुभव.
भाषण
भाषण म्हणुन चांगले आहे पण साहित्य संमेलनात हे का हे कळले नाही. आणि सुधीर मोघेंचे नाव त्यांना आठवू नये?
वा! खूप
वा! खूप मस्त. एका अद्वितीय गायिकेचं एका सामान्य वाचकाच्या भूमिकेतून केलेलं अनौपचारिक, हलकंफुलकं आणि उत्स्फूर्त असं मनोगत मला तरी उद्घाटनपर भाषण म्हणून खूप आवडलं! आणि पंचाहत्तराव्या वर्षीसुद्धा त्यांचा आवाज काय गोड आणि सहज लागलाय!
इथे उपलब्ध करून देणार्यांचे विशेष आभार.
छान...
छान... चांगले केले आहे भाषण.
पण केदारशीसुध्दा सहमत.
चिनूक्स, भाषण उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
आणि सुधीर मोघेंचे नाव त्यांना आठवू नये? >>
त्यांचे वय ७५ वर्षे आहे. या वयात स्मृती क्षीण होते. आणि सुरूवातीलाच त्यांनी म्हटले ना की त्यांना नातवांची नावेही नीट लक्षात रहात नाहीत.
आशाताई या
आशाताई या एक गायिका आहेत. साहित्यिक नव्हेत. त्यांच्याकडून साहित्याची मीमांसा किंवा समीक्षेची अपेक्षा करणे चूक. साहित्याने त्यांना काय दिले, याबद्दल म्हणूनच त्या भरभरून बोलल्या आहेत.
साहित्याचा आढावा घेण्याचे काम हे अध्यक्षाचे असते. उद्घाटकाचे नव्हे. अगोदर झालेल्या साहित्य संमेलनांतील उद्घाटकांची व अध्यक्षांची भाषणे पुस्तकरूपात उपलब्ध आहेत. ती वाचली तर हे सहज लक्षात येईल. शिवाय अध्यक्षांची भाषणेही केवळ साहित्याच्या आढाव्यापुरती किंवा समीक्षेपुरती कधीच मर्यादित राहिलेली नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक साहित्याबद्दल न बोलता अनेक सामाजिक / राजकीय प्रश्नांबद्दल अध्यक्षांनी बोलणे पसंत केले होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळातही अध्यक्षांनी आणि उद्घाटकांनी विविध सामाजिक व राजकीय प्रश्नांच्या रोखाने आपली भाषणे केली आहेत.
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
चिन्मय, हे
चिन्मय, हे भाषण इथे ऐकण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
खुप छान,
खुप छान, प्रसन्न वाटलं भाषण ऐकून. अगदी आपल्या पुढ्यात बसून बोलतायत, गप्पा मारताहेत असं वाटतं..
मला गप्पा
मला गप्पा म्हणून आवडलं पण मला पण ते साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं भाषण नाही वाटलं.. कदाचित माझी काहीतरी वेगळी अपेक्षा होती..
असो. हे इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद !
अनेक अनेक
अनेक अनेक धन्यवाद!
सुरेख
सुरेख कल्पना ! चिनूक्सचे आणि इथे देण्यासाठी मदत केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
भाषण आवडले.
***
तुका म्हणे नाही | आमुची मिरासी | असावेसी एसी | दुर्बळेची ||
मला आवडले
मला आवडले हे भाषण. आशाजींनी साहीत्य कडे त्या कश्या वळल्या ह्या आठवणी सांगितल्या. आणि जरी थोडे व्यतिगत अनुभव असला तरी ते नक्कीच साहित्य संबधित आहे असे मला वाटले. चिनूक्स ह्यांना धन्यवाद.
उपलब्ध
उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
चिनॉक्स, धन
चिनॉक्स,
धन्यवाद , मस्तं भाषण!
आणि गाताना तर काय अप्रतिम आवाज लागलाय आशा ताईंचा.. जादू..मिरॅकल...!!
मला सहज गप्पांच्या स्वरुपात सामान्य वाचकाच्या भूमितेतून भाषण आणि असामान्य गायकी खूप आवडली !
'उसवून श्वास माझा' चा अर्थ काय सुरेख गाउन दाखवला आशा ताईंनी..:)
शेवटचं संत ज्ञानेश्वरांचं गाणं पण मस्त !
चिनूक्स,
चिनूक्स, आशाताईंच भाषण इथे उपलब्ध करुन देऊन कान तृप्त केल्याबद्दल खूप आभार.
चाफ्याशी सहमत. कसला गोड लागलाय आवाज.
धन्यवाद
धन्यवाद
सही!
सही! धन्यवाद, चिनू(क्स).
चिनूक्स,
चिनूक्स, आशाताईंचे भाषण इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद
अगदी मनापासुन बोलल्या आहेत
चिनूक्स,
चिनूक्स, खूप आभार .. मस्त वाटलं भाषण ऐकायला आणि त्याहीपेक्षा त्यांची गाणी ऐकायला ..
'उसवून श्वास माझा ..' >>> खरंच किती मस्त उलगडून सांगितला अर्थ ..
आणि दिन तैसी रजनी .. मस्तच!
चिनूक्स.....त
चिनूक्स.....तुझे खूप खूप आभार
आवडलं आशाताईंचं इन्फॉर्मल भाषण.
साहित्य संमेलनातलं भाषण म्हणून ठीक आहे की नाही ह्यावर चर्चा कराविशी पण वाटत नाहीये.
त्यांनी त्यांना साहित्यानं काय दिलं हे फार प्रामाणिक पणे सांगितलं.
ह्या वयातही काय आवाज आहे त्यांचा....... अपुन तो पुरे फिदा !!
'उसवून श्वास माझा' .........तर एकदम कातिल
..इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
नितांतसुं
नितांतसुंदर!!!!!
इथे दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
या
या साहित्यसम्मेलनास मी प्रत्यक्ष हजर होतो. आशाताईंचे भाषण परत ऐकण्याची इछा होती. ते मिळाल्याबद्द्ल शतशः धन्यवाद.