Submitted by सुप्रिया जाधव. on 3 October, 2018 - 07:29
रडे थांबेचना ह्याचे, भयंकर पेटला हट्टा !
बिलंदर पावसाला मारला आहे कुणी रट्टा ?
ठळक कुंकू, करारी नाक आणिक हासरी जिवणी !
हुबेहुब रेखली आजी, जमेना हातचा घट्टा
व्यसन नव्हते सुपारीचे, समंजस घरधनी माझा !
तरीही बेभरवशी पावसावर लावला सट्टा
इथे येतात ते प्रत्येकजण नसतात ना स्कॉलर ?
सुमारांना घडवतो वेगळे कॉलेजचा कट्टा
कधीपासून नव्हते हासले माझ्याचवरती मी
नशीबा, ह्याचसाठी मांडली आहेस ना थट्टा ?
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
व्यसन नव्हते सुपारीचे, समंजस
व्यसन नव्हते सुपारीचे, समंजस घरधनी माझा !
तरीही बेभरवशी पावसावर लावला सट्टा..
खूपच छान