Submitted by सिद्धेश्वर विला... on 3 October, 2018 - 05:34
असं किती दिवस अजून, फक्त बघायचं ,
म्हणून ठरवलं निदान डोळे तरी मारायचं
जाणूनबुजून एकदा गाठली तिला
चांगलाच मारला सणकून डोळा ॥
भडकून तिनं लाखोली वाहिली
चारचौघात बोलली " उंदीर साला "
पुढची शेपटी मागे नेली
मी पण बोललो मग " चिचुंद्री साली " ॥
प्रेमदूधात मिठाचा खडा पडला
दूध गेलं उडत , शिव्यांचा सडा पडला
वाग्युद्धध ते असेच चालले
पशूप्राण्यांचे दिले दाखले
नक्की कोण कुठल्या वंशाचा
कुत्रा मांजर डुक्करहि आले ॥
अशी भांडली,अशी भांडली
उभी आडवी तिनं चड्डी फाडली
प्रेमाची सुरुवात डोळ्याने झाली
पण ... पण ... साली
सुंदरी चिचुंद्री निघाली
सुंदरी चिचुंद्री निघाली ..........॥
{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा