जोर काढुनी पोर काढलं , काट्यावरचं बोर निघालं

Submitted by सिद्धेश्वर विला... on 25 September, 2018 - 04:03

जोर काढुनी पोर काढलं

काट्यावरचं बोर निघालं

ऐन उमेदीत रंग दाखवलं

कार्ट सालं क्रूर निघालं

नाना स्वप्नं पाळण्यातली

अश्रूं बनली पापण्यातली

स्मरती कर्मे मागली पुढली

काठी साली कमकुवत निघाली

मी पण देखील हेच केले

उगाच वाही अश्रुंचे नाले

का दोष त्या नशिबाला ?

पुसले का कधी आईबापाला ?

{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }

Group content visibility: 
Use group defaults

छान.