Submitted by सिद्धेश्वर विला... on 24 September, 2018 - 04:08
होय मीच आहे तो,,, अनभिषिक्त सम्राट
या मनाच्या रंगमंचावर
अनेक कलाकृती जन्म घेतात
काही सुखासीन तर काही कल्लोळ माजवतात
कधी उठतो आणि सलाम करतो
कधी पडतो आतल्या आत
काय वाढून ठेवलंय पुढे ? हे दडले काळात
तरीहि मीच फक्त मीच आहे तो,,, अनभिषिक्त सम्राट
माझ्या मनाचा , इथे जन्मणाऱ्या प्रत्येक कलाकृतीचा
मीच धावतो , वावरतो , मीच फेकतो
मीच घडवतो,,, प्रारब्ध माझे
प्राक्तनाच्या दरवाज्यावर बसून
मीच तो जो थयथयाट करितो
मीच तोडितो नातेबंद सारे
मीच तो, जो ओळखी पुढचे इशारे
तरीहि रंग भरतो या रंगमंचात न्यारे
मीच तो सम्राट तरीहि अनभिषिक्त सदैव
या मनाच्या रंगमंचावर
मीच तो जो हारेकवेळी नीच ठरतो , प्रत्येक कलाकृतीत
सम्राट असूनही नित्य अवहेलना पदरी
हे या अनभिषिक्त सम्राटाचे दुर्दैव
{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा