गणेशोत्सावाच्या अवघ्या ७ दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या ३७७ कलमामध्ये दुरुस्ती केली. न्यायालयाचा हा पुरोगामी निर्णय सगळी माध्यमे चढाओढीने साजरा करू लागली. जवळपास सगळ्या ब्रांडसनी आपआपले लोगो प्राईड flag च्या रंगात रंगवून या निर्णयाला आपला पाठींबा दर्शवला. यात अगदी आरोग्य, फूड इंडस्ट्री, गृहकर्ज, वाहतूक, विमान, टायर अशा सगळ्या क्षेत्रातल्या कम्पन्या होत्या हे विशेष.
त्यातलीच काही उदाहरणे पुढे देत आहे.
याच प्राईड कलर्स वरून स्फूर्ती घेऊन मायबोली गणेशोत्सवासाठी घेऊन येत आहोत “ क्रंची प्राईड सलाड”
ज्यांना प्राईड कलर्स ची अलर्जी आहे ते याला “क्रंची रेनबो सलाड” म्हणू शकतात.
साहित्य-
झुकीनी, लाल भोपळी मिरची, जांभळा कोबी,ब्रोकोली, बेबीकोर्न, कॉर्न चे दाणे, राजमा, ७-८ लसून पाकळ्या, लिंबू, थोडेसे ऑलिव्ह ऑईल, सलाड ची पाने (हि केवळ कमी-भरती ला आहेत स्पर्धेचे १:१:१ प्रमाण सांभाळण्यासाठी), चिली फ्लेक्स.
कृती:-
१) लसुण अतिशय बारीक कापून ऑलिव्ह ऑईल मध्ये घालून ठेवणे. जितका जास्तवेळ राहील तितके चांगले, जर वेळ कमी असेल तर लसूण पेस्ट ऑईल मध्ये घालून वापरा.
२) बेबी कॉर्न, मका दाणे आणि राजमा कुकर ला उकडवून घेणे.
३) झुकीनी चे १ इंच लांबीचे तुकडे करून डायरेक्ट gasवर भाजावेत. त्यांना स्मोक्ड वास येण्या पुरतेच, ते शिजायला नकोत नाहीतर त्यांचा क्रंच जाईल.
४) पर्पल कोबी, सलाड लीफ बारीक कापून घेणे.
५) लाल भोपळी मिरची चे बारीक तुकडे करणे.
६) ब्रोकोली आपण कच्ची वापरणार आहोत म्हणून फक्त तुरे घेणे.
७) या सगळ्या गोष्टी आधीच कापून ठेवणार असाल तर कापून झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा, नाहीतर त्या मऊ पडतील, स्पेशली सलाड लीफ
८) मोठ्या बोल मध्ये पाने (सलाड लीफ + कोबी), दाणे (राजमा+ मका+ बेबी कॉर्न), फळभाज्या (भो. मी.+ झुकीनी) हे सगळे १:१:१ प्रमाणात एकत्र करणे (स्पर्धेसाठी सलाड असल्याने, नाहीतर आपल्याला हव्या त्या प्रमाणात ), ड्रेसिंग साठी ओलिव्ह ओईल घालावे, चवी प्रमाणे मीठ, चिली फ्लेक्स, लिंबू रस घालावे आणि मिक्स करावे.
क्रंची प्राईड सलाड तयार आहे.
तळटीप:-
- हे काही रॉकेट सायन्स रेसिपी नाहीये, रंगाला रंग उभा करून केलेले सलाड आहे,
त्यामुळे यात वेरीअशन ला प्रचंड वाव आहे, उदा लाल रंगात डाळिंब दाणे , आणि हिरव्या रंगासाठी हिरवी भो.मी.,ऑरेंज रंगासाठी गाजर , पर्पल रंगासाठी बीट उकडून,etc
शेवटी diversity celebrate करणे हाच मुळ उद्देश असल्याने हे सलाड सगळे बदल स्वीकारेल
फक्त एकच पथ्य पाळा कि ज्या भाज्यांना पाणी सुटते , काकडी, टोमाटो अशा भाज्या टाळा, नाहीतर फार पाणी सुटेल आणि सलाड मऊ पडेल,
- घरी खायचे असल्यास यात काही थेंब टोबेस्को सॉस जास्त छान लागते.
Behind the scene :-
- कच्च्या मालाच्या फोटोसेशन वेळी एक सलाड लीफ नावाचे मॉडेल गैरहजर राहिले.
- राजमा आणि कॉर्न एकत्र कुकर ला लावल्याने राजमा अंमळ जास्त शिजला, त्यामुळे सलाड मिक्स केल्यावर ते दाणे वरतून टाकले आहेत
- शेवटच्या फोटो च्यावेळी उन्हे फिरली आणि त्यामुळे फोटो फारच डल आलाय, फोटो पेक्षा बरे दिसत होते.
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन सिम्बा .
हार्दिक अभिनंदन सिम्बा .
Pages