स्व. विनिता पाटील! माझी मानलेली बहीण! आज सकाळी तिचे पार्थिव पाहिले अन गेल्या तीन वर्षांतील असंख्य घडामोडी डोळ्यांपुढून गेल्या. सोबत स्वातीताई सामक आणि सुप्रिया जाधव होत्या. त्या रडू शकल्या, मी थिजू शकलो. विनितासाठी करम तर्फे ह्यानंतर काय केले जाणार आहे ते जाहीर करूच, पण तिने तीन वर्षांत जे दिले त्याचा यथाशक्ती धांडोळा घेणारी ही गझल माझ्या बहिणीला समर्पित!
-'बेफिकीर'!
गझल - लाटा जरी जातात.....
लाटा जरी जातात माघारी समुद्राच्या
रेतीरुपे उरतात तक्रारी समुद्राच्या
देतो जिभेला मीठ अन डोळ्यांतुनी घेतो
नादी नको लागूस व्यवहारी समुद्राच्या
त्याचे कसे का होइना, अपुले भले करतो
जावे भिकारी होउनी दारी समुद्राच्या
करतो प्रकाशाला परावर्तित तुझ्यासाठी
असुनी तळाशी रात्र अंधारी, समुद्राच्या
थेंबाप्रमाणे बाष्प व्हावे वाटते विनिता
केली उगी समवेत मी यारी समुद्राच्या
-'बेफिकीर'!
_/\_ RIP
_/\_
RIP
_/\_ RIP , दुःख पोचले तुमच्या
_/\_ RIP , दुःख पोचले तुमच्या गजलमधून