ये कहा आ गये हम - अजरामर (विबा) प्रेम

Submitted by थॅनोस आपटे on 19 September, 2018 - 07:33

सिलसिला मधली सगळीच गाणी रोमँटीक आहेत. पण मै और मेरी तनहाई हे शब्द अमिताभच्या आवाजात कानावर पडले की थेटरात जादू होते. हा सिनेमा आला होता तेव्हां आम्हाला समज नसल्याने ( प्रौढांसाठी) तो नंतर कधीतरी मॅटीनीला पहावा लागला. रेखाची जादू भारतात सर्वत्र होती तशीच विदेशातही होती. अमिताभ अढळपदाला पोहोचलेला होता.

अमिताभ रेखा जोडी बाबत लोक अगदी आवडीने चर्चा करत असत. रेखा अर्ध्या हिंदुस्थानच्या दिलाची धडकन होऊन बसलेली होती आणि अमिताभचं गारूड एकमेवाद्वितीय होतं. साहजिकच लोकांना यांच्या मधे असलेल्या प्रेमाच्या चर्चेबाबत जिव्हाळा वाटायचा. अमिताभ जसा अन्यायाला सर्वांचा प्रतिनिधी होऊन वाचा फोडत असे त्याचप्रमाणे रेखा आपल्याला सात जन्मात मिळणे शक्य नाही तर आपला प्रतिनिधी म्हणून अमिताभनेच तिला प्रेम केले पाहीजे अशी अर्ध्या हिंदुस्थानची प्रबळ इच्छा असायची (अर्धे = पुरूष).

पण यात जया भागदौडीवर जो अन्याय व्हायचा त्याबद्दल या अर्ध्या राष्ट्राची चालायचंच म्हणून मूक संमती असायची. अर्थात अमिताभने संसार आणि विबासं दोन्ही व्यवस्थित जपले. बहुतेक पुरूषोत्तम अशाच गड्याला म्हणत असावेत. यापूर्वी थेट पुराणात माधवाने विबासं आणि लग्नाची बायको या सर्वांना एकाच वेळी सुखी करण्याचा कृष्णपराक्राम केलेला होता. आधुनिक युगात धर्मेंद्र आणि अमिताभ या शोलेतील जोडगोळीने हा यज्ञ पार पाडला आणि कुणाचीच तक्रार नव्हती.

ही सर्व पार्श्वभूमी असताना सिलसिला पाहणे म्हणजे अगदी मेंदूला रोमॅण्टीक गुदगुल्या केल्याप्रमाणे अनुभव होता. विशेषतः अमिताभ रेखाचे प्रणयप्रसंग कातिल आहेत. रेखाच्या डोळ्यातले भाव अक्षरशः मार डाला आहेत.

मै और मेरी तनहाई
अक्सर बातें करते है

असे शब्द धीरगंभीर पण अत्यंत व्याकुळ आवाजात कानी पडतात आणि कडाक्याच्या थंडीत धुक्यातून एक जोडपे फिरायला चालले दिसते. अत्यंत सुंदर बागेत सर्वत्र गुलाब फुललेले आणि अमिताभच्या छातीवर चालता चालता रेखा डोके घुसळत चालत असते. ती फ्रेमच अतिशय वेधक आहे. यश चोप्रांना पडद्यावर काय दिसायला पाहीजे हे आधीच दिसत असावे.

अमिताभचा आवाज संपतो आणि लताबाईंचा स्वर्गिय आवाज काळजाचा ठोका घेतो.

ये कहां आ गये हम
युं ही साथ साथ चलते चलते..

गाण्याचे शब्दही जबरदस्त. शिव हरींचे संगीत आजही ताजे वाटते. शिवाय प्रसंगाला अनुरूप असे गाणे अलिकडच्या कित्येक वर्षात पाहीलेले नाही.
त्या प्रेमाला कारूण्याची किनार अजरामर करून जाते.

पण हे गाणे सिनेमात न पाहता युट्यूब वर पाहण्याचा अनुभव काही औरच आहे..
बहुधा दुबईतला लता मंगेशकरांचा लाईव्ह शो आहे. प्रेक्षकात सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर दिसतात. अमिताभ बच्चनचे स्टेजवर आगमन होते. अमिताभचा आवाज किंचित जाडसर झालेला. संवादफेकीत किंचित फरक पडलेला. मागे पडद्यावर सिलसिलाचे दृश्य दिसत असते. अमिताभची नुकतीच उगवलेली पांढरी दाढी. केस अजूनही ओरिजिनल . रेखा तशीच टवटवीत. आणि पुन्हा ते शब्द उमटतात

"मै और मेरी तनहाई... "

कॅमेरा रेखावर येतो आणि सिनेमा पेक्षाही मेंदूला जास्त गुदगुल्या होतात. आता उघडपणे काहीही नाही. तरी पण न बोलता बरंच काही.

लताचा आवाज येतो. आजही तीच आब राखून आहे तो स्वर्गिय आवाज. थोडासा थकलाय. पण गोडवा अजूनही आहे.

" ये कहा आ गये हम "

रेखाचा लाजताना क्लोज अप. ती इतकी शांत. कुठलीं ही नाराजी नाही, तक्रार नाही, नैराश्य नाही. अगदी भरून पावल्याप्रमाणे प्रफुल्लीत.
बाकी इथे लिहीण्यात अर्थच नाही. सारेच सूज्ञ आहेत. काय पहायचे ते बरोब्बर कळतेच की ? हो ना ?

आणि कॅमेरामन हुषार असतातच.

https://www.youtube.com/watch?v=HDTdSfkJkTM

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युं ही राह चलते चलते..>> युं ही साथ साथ चलते..
अस आहे बहुतेक ते, पाहा एकदा

पण मै और मेरी तनहाई हे शब्द अमिताभच्या आवाजात कानावर पडले की थेटरात जादू होते. >>> +!१११

छान लेख,
गाणी ऐकलीयेत फक्त, पाहावा का सिनेमा?

किल्ली ताई... साथ साथ बरोबर आहे.
बदल करतोय.

गाणी ऐकलीयेत फक्त, पाहावा का सिनेमा? >>>. नक्कीच.
(प्रेमभंग वाल्यांना खूप जास्त आवडतो)

छान लेख, सगळीच गाणी छान आहेत, इव्हन सर से सरके, ऐकायला आणि लडकी है या शोला बघायला सुद्धा.

किल्ली, बघण्यासारखा आहे.

दुबई मधला शो वाटत नाही. कारण युट्युब विडीओत अंदाजे ६.१३ ला "शिव उद्योग सेना" असे स्टेजच्या बॅकड्राॅप ला दिसते.

ट्युलिप / शिवौद्योग सेना >>> +१
अपना तो ध्यान बस रेखा के एक्स्प्रेशन्स और अदाओं पे ज्यादा था भई..

अपना तो ध्यान बस रेखा के एक्स्प्रेशन्स और अदाओं पे ज्यादा था भई..
नवीन Submitted by मेरीच गिनो on 19 September, 2018 - 23:36
>>>>
+1
माझा विबा समोर असता तर माझीपण अशीच अवस्था असती

:सिनेमामुळे तरूण पिढी बिघडत चालली आहे का ?: मोड

यश चोप्रांना उद्योग नव्हते. याड लावलं राव विबासं चं..
हपिसात होता होता वाचलं.
रेखा एक्स्पोज न करता पण कातिलाना....