Submitted by रुपेंद्र कदम 'रुपक' on 10 September, 2018 - 01:00
वाढली आहे तुझी मिळकत किती?
चालतो आहे नजर चुकवत किती ?
वाकडी केली जरा मी वाट तर
जीवनाने घेतली हरकत किती
वेदना ही सावकारी वाटते
वाटली आहे तिने बरकत किती?
कोणत्या रागात आहे गीत हे
गायली आहे इथे फसगत किती?
घेतले आभाळ भाड्याने कुणी
चालले आहे पुढे सरकत किती?
टाळले मी सावलीला आजही
अन् उन्हाची वाढली धडगत किती?
घोषणा केल्यास होत्या काल ज्या
राहिला आहेस तू सहमत किती?
© रुपेंद्र कदम 'रुपक'
✍ पुणे 9 सप्टेंबर 2018
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा