तो भुकेने व्याकुळ झाला होता. कितीतरी वेळापासून त्याच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. भुकेल्या अवस्थेत रस्त्यावरून जात असताना खमंग वास नाकात शिरला. तेथे एक देवमाणूस गोरगरिबांना खायला देत होता. पण नशीब कसे परीक्षा घेते पहा ना, त्या अन्नदात्याजवळ त्याच्यासारख्याच क्षुधार्थ्यान्ची गर्दी होती. गर्दीतून त्याला फक्त भांड्यांचा, चमच्यांचा खणखणाट ऐकू येत होता. खाणे वाढून घेण्यासाठी वाटली जाणारी कटोरी घेण्यासाठी सुद्धा रांग होती. वाऱ्याच्या झुळकेसरशी येणाऱ्या खमंग वासाने त्याची भूक अजूनच चाळवली जात होती. तोंडाला पाणी सुटले होते. एवढा वेळ वाट पाहण्याची तपश्चर्या फळाला आली. त्याला कटोरी मिळाली. प्रेमळ नजरेने पाहत अन्नदात्याने त्याला विचारले,
“मेडीयम?"
"सिर्फ तिखा बनाओ, प्याज और सेव अलगसे"
------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
तळटीप: कटोरी ह्या शब्दाला मराठी प्रतिशब्द द्रोण/वाटी असा वापरता आला असता हे मान्य! पण ज्याप्रमाणे तिखट पदार्थांत चिमूटभर साखर घातल्याने त्याची चव खुलते त्याप्रमाणे मराठी कथेत हिंदी शब्द इफेक्टसाठी वापरला तर चालतो
(उपमेचा संदर्भ: माबो पाकृचे धागे आणि प्रतिसाद, )
--------------------------------------------------------------------------------------------------------
अन्नदाता (शतशब्दकथा)
Submitted by किल्ली on 28 August, 2018 - 02:35
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मिसळ??
मिसळ??
छान लिहलय.
छान लिहलय.
पाणीपुरी बद्दल लिहलय ना ?
पाणीपुरी बद्दल लिहलय ना ?>>>>
पाणीपुरी बद्दल लिहलय ना ?>>>>> पाणीपुरीत प्याज आणि सेव अलगसे??![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
ओके. कथा पुण्यातली आहे का?
मस्त.... पाणीपुरीसारखी...
मस्त....
पाणीपुरीसारखी...
मिसळ तर नाही कारण तो कटोरी
मिसळ तर नाही कारण तो कटोरी मध्ये खात आहे.
कटोरीमुळे मला पाणीपुरी किंवा शेव पुरी वाटतं होतं.
भांड्यांचा, चमच्यांचा खणखणाट ऐकू येत होता <<<< यावरून वाटतं की भेळ आहे
फायनल आन्सर: भेळ.
पाणिपुरी आहे ना ही.
पाणिपुरी आहे ना ही.
नाही हो पाणीपुरीच आहे. ते
नाही हो पाणीपुरीच आहे. ते तिखट पाणी मध्ये तो भैय्या थोड्या थोड्या वेळाने चमचा ढवळतो आणि उगाचच भांड्याच्या वरच्या टोकाला तोच चमचा अपटतो आणि पुन्हा पाणीपुरी द्यायला लागतो अंदाजे दर दहा पुऱ्यांच्या मागे त्याचा हा खेळ सुरू असतो![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
किल्लीतै भारीच्चे ही शशक...
किल्लीतै भारीच्चे ही शशक...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला वाटतं रगडा पॅटिस असावा...
रगडा पॅटिस सुद्धा असू शकतं.
रगडा पॅटिस सुद्धा असू शकतं.
सगळेजण या वाक्याकडे दुर्लक्ष करत आहेत
खमंग वासाने त्याची भूक अजूनच चाळवली<<<<
भेळ, रगडा पॅटीस, पाणीपुरी याला खमंग वास येतो का?
तो जर भुकेने व्याकुळ आहे तर तो पाणीपुरी पेक्षा भेळ खायला प्राधान्य देईल.
लिहिताना तरी माझ्या डोक्यात
लिहिताना तरी माझ्या डोक्यात पाणीपुरीचे विचार चालु होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते तिखट पाणी मध्ये तो भैय्या थोड्या थोड्या वेळाने चमचा ढवळतो आणि उगाचच भांड्याच्या वरच्या टोकाला तोच चमचा अपटतो आणि पुन्हा पाणीपुरी द्यायला लागतो अंदाजे दर दहा पुऱ्यांच्या मागे त्याचा हा खेळ सुरू असतो >> बरोबर
पाणीपुरीत प्याज आणि सेव अलगसे>> ठेले किवा हातगाडी वाले देतात अस, द्रोण त्यात कान्दा, शेव आणि मग पाणी ढवळून ते पुरीत भरतात
फीलीन्ग सठी रगडा, भिजवलेले हर्भरे, मसाला बटाटा अस काहीही असु शकत
कथा पुण्यातली आहे का>>
असु शकते, मी आहे ना पुण्यात म्हणून
@चैतन्य : भेळ ह्या अर्थाने पण सुट होतेय कथा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद चैतन्य रासकर,
धन्यवाद चैतन्य रासकर, द्वादशांगुला ,akki320,अक्षय दुधाळ ,माऊमैया , सस्मित![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्हा सगळ्याना नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारीच !
भारीच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मेघा.
धन्यवाद मेघा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत
मस्त! मला पण भेळ च वाटली
मस्त! मला पण भेळ च वाटली होती खरं तर ! पण पाणीपुरी पण धावेल![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अर्र!! असं प्याज और सेव अलगसे
अर्र!! असं प्याज और सेव अलगसे मी आजवर पाणीपुरीसाठी कधीच ऐकलं नाहीये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असेल बुवा तुमच्यात.
बाकी श्शक जमलीये.
असेल बुवा तुमच्यात>> आओ कभी
असेल बुवा तुमच्यात>> आओ कभी हवेली मे
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(पुण्यात या हो, हवेली तालुका आहे म्हणून)
बाकी श्शक जमलीये>> धन्स धन्स
धन्यवाद anjali_kool
धन्यवाद anjali_kool![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत
असं प्याज और सेव अलगसे मी
असं प्याज और सेव अलगसे मी आजवर पाणीपुरीसाठी कधीच ऐकलं नाहीये.>>>> आम्ही मागतो की नेहमी कांदा अलगसे पापु खाताना पण पुण्यात नाही तर ठाण्यात![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शशक छान पण पापु पेक्षा मिसळ वाटते.
धन्यवाद निल्सन
धन्यवाद निल्सन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पाणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत
मस्त....
मस्त....
छान आहे उत्कंठावर्धक
छान आहे उत्कंठावर्धक
धन्यवाद Namokar, कल्पमुख
धन्यवाद Namokar, कल्पमुख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत
छान... पाणीपुरी.. तोंडाला
छान... पाणीपुरी.. तोंडाला पाणी सुटले![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
छान आहे असं लिहिणार होतो पण
छान आहे असं लिहिणार होतो पण तुम्ही लगेच ‘तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत’ असा आशिर्वाद द्याल. म्हणून काहीच लिहित नाही.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धन्यवाद उमानु, तुम्हाला
धन्यवाद उमानु, तुम्हाला नेहमीच चटकदार भेळ, मिसळ, पणीपुरी, रगडा पॅटीस मिळू देत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धन्यवाद शाली, स्पेशल दुआ:->
तुम्हाला नेहमीच परमहंसाची दाल बाटी मिळू देत
(No subject)
तुम्हाला नेहमीच परमहंसाची दाल
तुम्हाला नेहमीच परमहंसाची दाल बाटी मिळू देत>>> सही!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ही जमलीयं
ही जमलीयं
मलाही पापु च वाटलेलं
हाहा मस्तंच, मला पण चटकन
हाहा मस्तंच, मला पण चटकन पाणीपुरीच आली डोळ्यांसमोर...
पण शिर्षक अन्नदाता म्हणजे पाणीपुरीवाल्या बद्दल आहे नं कथा?
प्याज और सेव अलगसे म्हणजे
प्याज और सेव अलगसे म्हणजे मिसळच. पण कटोरी मधे घेतांना बाजुला कस घेणार?
Pages