नमस्कार मंडळी, हा नवीन धागा काढण्याचे कारण म्हणजे आपले नवीन मायबोलीकर बोकलत, तर या गोष्टीला काही दिवसांपूर्वी सुरवात झाली, अमानवीय या धाग्यावर अनेक मायबोलीकर त्यांना आलेले गूढ अनुभव शेअर करत असतात. त्या सगळ्या अनुभवांना एक गंभीरतेची किनार असते पण आपले बोकलत त्या सगळ्या गंभीरतेवर पाणी ओतून तो धागा विनोदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मायबोलीकरांनी त्यांना हात जोडून नवीन धागा काढण्याची विनंती केली पण परिणाम शून्य, म्हणून त्यांच्या वतीने हा धागा मी काढत आहे आणि त्यांना कळकळीची विनंती करत आहे कि इथून पुढे त्यांनी त्यांचे अनुभव या धाग्यावर शेअर करावेत. नमुन्यादाखल त्यांनी शेअर केलेला अनुभव इथे पोस्ट करत आहे.
मुंजाचाच विषय निघालाय तर आता मी तुम्हाला एक खरीखुरी माझ्याबाबत घडलेली घटना सांगतो. ३-४ दिवसाची सुट्टी काढून मामाने मला त्याच्या गावी कोकणात बोलावलं होतं. साधारण दुपारी एक वाजता तिकडे पोहचलो समोर पाहतोय तर सगळे गावकरी माझीच वाट पाहत उभे होते. मला पाहताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रत्येकजण माझ्याकडे अपेक्षेने पाहत उभा होता, कोणाच्या डोळ्यात पाणी होते तर कोणी हात जोडून उभं होतं. मामाच्या घरी गेल्यावर मामाला हा काय प्रकार आहे म्हणून विचारलं तर तो गंभीर झाला आणि म्हणाला तुला मी मुद्दाम इथे बोलावलंय. गाव संकटात आहे, गावाच्या बाहेर एक चिंचेचं भलं मोठं झाड आहे त्या झाडावर एक मुंजा राहतो त्या मुंजाने गावातल्या माणसांचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. दर अमावसेला २० कोंबड्या आणि पौर्णिमेला १० बोकड अर्पण करावी लागतात. नाही केल्या तर त्या चिंचेच्या झाडावरून येणारी केबलची वायर तो तोडून टाकतो. त्यामुळे बायकांचे डेली सोप्स आणि बाप्यांचे क्रिकेटचे सामने बंद होतात. अजून जीओचा टॉवर पण आपल्याकडे नाय आला त्यामुळे या अनर्थातून गावाला वाचव आणि गावात सुख समाधान शांती नांदु दे. गाव खरोखरच एका मोठ्या संकटात सापडलं होतं.दैनंदिन गरजेचं साधन नसल्याने बायकांची भांडणं आणि बाप्यांच्या पारावरील गप्पाना ऊत आला होता. एक मात्र चांगली गोष्ट अशी की लोकं एकटे दुकटे बाहेर पडायला घाबरत असल्याने गाव हागणदारीमुक्त झाला होता. तरीसुद्धा गावाला या संकटातून काढणं माझं कर्तव्य होतं. मामा मला म्हणाला उद्या अमावास्या आहे, जर तू मुंज्याला कुस्तीचा आव्हान देऊन हरवलंस तर तो कायमचा निघून जाईल. मी थोडा वेळ विचार केला, आणि मामाला बोललो निश्चिन्त रहा. मी हरवेन उद्या त्या मुंजाला. आता मी कुस्तीच्या तयारीला लागलो, जेमतेम २४ तास माझ्याकडे होते.या २४ तासात सल्लूचा सुलतान आणि आमिरचा दंगल वारंवार पाहून कुस्तीतले सगळे डावपेच व्यवस्थित शिकून घेतले. दुसऱ्या दिवसाची रात्र कधी अली समजलीच नाही. रात्री ठीक बारा वाजता त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन मुंजाला कुस्ती खेळायचं आव्हान दिलं. आव्हान दिल्याबरोबर झाडावर सळसळ झली आणि २० ते २५ फुटाचा एक माणूस भेसूर हसत माझ्यासमोर उभा राहिला. आकाशात एक लख्ख वीज चमकली आणि आमच्या कुस्तीला प्रारंभ झाला. सगळे गावकरी माझ्या नावाचा जल्लोष करत होते त्यामुळे माझ्या अंगात चेव आला होता. पहिला डाव आम्ही एकमेकांची ताकद मोजण्यात खर्ची घालवला. नंतर खऱ्या कुस्तीला सुरवात झाली. कधी तो वरचढ ठरायचा तर कधी मी. साधारण १ तास असाच गेला दोघेही थकलो होतो. शेवटी मुंजाने मला पकडायला हाताची कैची मारली ती मी लीलया चुकवली आणि ज्या क्षणाची वाट मी पाहत होतो तो आला. कैची चुकल्यामुळे मुंजा थोडा वळला आणि त्याची कंबर माझ्यासमोर अली. मी क्षणाचाही विलंब न करता सुलतान मधली सल्लूची फिनिशिंग मूव्ह मारली, या डावातून मुंजा सावरू नाही शकला आणि उताणा पडून राहिला. गावकर्यांनी एकच जल्लोष करत मला खांदयावर उचलला आणि शोले मधल्या जय वीरू सारखी माझी वरात काढली. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी जंगी पार्टी ठेवली होती. सगळी गावकरी मला आशीर्वाद देत होती.मामाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. एका गावाला संकटातून वाचवल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं.
अमानविय शक्तिंशी बोकलत ह्यांचे मानविय द्वंद्व !!!!!
Submitted by कल्पतरू on 24 August, 2018 - 07:23
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बोकिको ?
बोकिको ?
बोकलत यानी. झकास लिहिले आहे.
बोकलत यानी. झकास लिहिले आहे. बोकलत यांचा उपरोध तुम्हाला समजला नाही वाट्टे. पण मुळातच तो धागाच इनोदी आहे. त्यात बोकलत यानी चमचाभर इनोद टाकला तर धागा समृद्धच होइल ना? आता तो धागा गंभीर आहे हा तुमचा विनोदच ना? तिथे बर्याच लोकांनी तो केवळ टाइमपास आहे असे कबूल केलेले आहे. माझ्या वैय्यक्तिक मतानुसार तो धागा मनोरुग्णांचा आहे त्यामुले कींव आणि सहानुभूतीस पात्र आहे.....
वाह कल्पतरु !!
वाह कल्पतरु !!
मी सांगितलेले शिर्षक खरंच वापरलं कि तुम्हि धाग्याला
-प्रसन्न
बाबा कामदेव म्हणजे रॉबिनहूड
बाबा कामदेव म्हणजे रॉबिनहूड का?
मानवकाका, तुम्हाला आज कळलं ?
मानवकाका, तुम्हाला आज कळलं ?
कल्पतरू --- उत्तम काम केलंत .
कल्पतरू --- उत्तम काम केलंत .... आता तरी बोकलत यांच्या पासून धाग्याची सुटका होईल अशी अपेक्षा
बोकलत हे छानच लिहीतात पण आमचे
बोकलत हे छानच लिहीतात पण आमचे म्हणणे होते की त्या धाग्यावर नको.
बाबा कामदेव - तिथे माझाही एक अनुभव आहे. तो जर तुम्हाला विनोदी वाटत असेल तर ठीक आहे. आम्ही सर्व मनोरुग्ण आहोत. त्यामुळे तुमच्या सारख्या हुशार, मनाने कणखर अशा व्यक्तींनी तिथे फिरकू नये ही विनंती.
जाउ द्या हो बाबा कामदेव!
जाउ द्या हो बाबा कामदेव!
मायबोलीवर लिहीलेले कुठले काय गंभीर नि कुठले विनोदी?
ज्याची विनोद बुद्धी प्रगल्भ झालेली असते त्याला हे सगळे विश्वच विनोदी वाटते - पैसा, सत्ता, त्या मागे धावणे, खोटे अभिमान, अज्ञान या सर्वात काहीच गंभीर नसते. सगळे नश्वर!
आपण स्थितप्रज्ञ राहून भगवंताची लीला बघावी!
हटकेश्वर हटकेश्वर!
ज्याची विनोद बुद्धी प्रगल्भ
ज्याची विनोद बुद्धी प्रगल्भ झालेली असते त्याला हे सगळे विश्वच विनोदी वाटते >>>
मी माझ्या सत्य, थरारक आणि
मी माझ्या सत्य, थरारक आणि जीवाचा थरकाप उडवणाऱ्या कथा अमानवीय धाग्यावरच लिहीत जाणार, अमानवीय अनुभवांसाठी तो धागा असताना इथे कशाला लिहू.
अहो तिथेहि लिहा नि इथेहि लिहा
अहो तिथेहि लिहा नि इथेहि लिहा.
वाटल्यास आणखी एक दोन धागे काढून तिथेहि लिहा.
मायबोलीवर लिहायचे फक्त. कशाला, का, खरे आहे का, संदर्भ काय, असले प्रश्न विचारायचे नाहीत.
ठीक आहे दोन्ही धाग्यावर
ठीक आहे दोन्ही धाग्यावर लिहितो, पण ही जबरदस्ती आहे किती प्रयत्न करताहेत मला तिकडून हुसकवायला.
मी माझ्या सत्य, थरारक आणि
मी माझ्या सत्य, थरारक आणि जीवाचा थरकाप उडवणाऱ्या कथा अमानवीय धाग्यावरच लिहीत जाणार, अमानवीय अनुभवांसाठी तो धागा असताना इथे कशाला लिहू.>>> बोकलतराव, तुम्ही कुठेही लिहा परंतू क्रुपया प्रतिसादाच्या आधी 'लेखक बोकलत आहे' हा वैधानिक इशारा द्यायला विसरु नका.
तसेही त्या धाग्यावर पुड्या
तसेही त्या धाग्यावर पुड्या सोडण्याची स्पर्धा भरलेली असते, त्यात तुमचे चांगले वाटले किस्से. आणखी टाका.
इतर सोडलेल्या पुड्या या
इतर सोडलेल्या पुड्या या भूतभक्तांना खऱ्या वाटणाऱ्या असतात. तर बोकलत यांच्या पुड्या भूतभक्तांनाही विनोदी पुड्याच वाटतात. त्यामुळे त्या वेगळ्या धाग्यात लिहिण्याची मागणी.
'लेखक बोकलत आहे'
'लेखक बोकलत आहे'
लेखकांचे नाव बोकलत असे आहे पण
लेखकांचे नाव बोकलत असे आहे पण ते बोकलत नाहीयत, तिकडे बोकलायला लावत आहेत
@बोकलत
@बोकलत
अहो मलाही सुरवातीला फक्त तो धागा मनोरंजनाचा वाटला होता म्हणून मीही कथा टाकल्या ना कि अनुभव.
पण ज्या लोकांसाठी तुम्ही लिहिता त्यांनाच जर नको असेल तर त्यांचा मान आपण ठेवायला हवा. इतके सुज्ञ आपण निश्चितच आहोत
तुमचे लिखाण विनोदी व उत्तम असते ते हि वाचायला आवडेल पण या नवीन धाग्यावर..
आणि हो नवीन धागा आयता मिळाल्याबद्दल अभिनंदन
रमेश रावल सहमत.
रमेश रावल सहमत.
मला सुद्धा तिथे विनोदी किस्से टाकण्याचा मोह झाला होता एकदा. पण तिथे इतके लोक तिथे येणारे किस्से त्यांच्यामते खरे अथवा खरच घडू शकणारे म्हणून आस्वाद घेत असताना, आपण का तिथे खिल्ली उडवावी आणि त्यांना कमी का लेखावे म्हणून मोह टाळला.
मी माझे सत्य आणि थरारक अनुभव
मी माझे सत्य आणि थरारक अनुभव तिथे टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे पण तिथले काही वाचक माझ्या विरोधात आहेत. ते का विरोध करताहेत ते समजलं नाही मला. अहो मी माझा किमती वेळ काढून तिथे दोन अनुभव शेअर करतो कोणासाठी? यांच्यासाठीच ना. आता मला सांगा रात्री अपरात्री यांची गाठ कोणा भयानक आणि खतरनाक पिशाच्चशी पडली तर यांच्या गाठीशी असलेले माझे अनुभवच कामी येतील ना? आता हे सगळे खिशात रामरक्षा, मारुती स्तोत्र, क्रॉस वैगरे घेऊन फिरतात ही वेगळी गोष्ट पण चुकून एखाद्या दिवशी सोबत न्यायला विसरले म्हणा तर केव्हाड्यावर पडेल, त्यावेळी बोकलत आठवेल पण तेव्ह खूप उशीर झाला असेल, एव्हडी साधी गोष्ट समजत नाही, बापडे भोळे आहेत बिचारी साधी माणसं. ते कितीही नको नको बोलले तरी माझं कर्तव्य आहे तिकडे वेगवेगळ्या कथा सांगण आणि त्यांना भुतांसोबत खेळायच्या कुस्तीचे वेगवेगळे डावपेच शिकवणं.
खरेक्ट बोकलत
खरेक्ट बोकलत
बोकलतरावांना कित्ती काळजी
बोकलतरावांना कित्ती काळजी आमच्या सारख्यांची
धन्यवाद बोकलत
ओ बो, इन्कमटॅक्स रिटर्न्स
ओ बो, इन्कमटॅक्स रिटर्न्स फाईल केलेत का ?
नाही केले का काय झालं?
नाही केले का काय झालं?
पण ज्या लोकांसाठी तुम्ही
पण ज्या लोकांसाठी तुम्ही लिहिता त्यांनाच जर नको असेल तर त्यांचा मान आपण ठेवायला हवा
>>> अशी एखादी लिस्ट आहे का लोकांची. मला आवडले किस्से माझा मान ठेवा बोकलत
नाही केल का काय झालं? >>>>
नाही केल का काय झालं? >>>> अमानवीय आयकर अधिका-यांशी बोकलत यांचे युद्ध असा धागा काढावा लागेल
(No subject)
बोकलत कोणत्याही बीबीवर लिहिणे
बोकलत कोणत्याही बीबीवर लिहिणे हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. जोवर तुम्ही मायबोलीच्या धोरणाशी विसंगत (जे सदस्य पाहून बदलते) :)) लिहीत नाही तोवर दुनियाकी कोइ ताकत तुम्हे कुठेही लिखनेसे नही रोकती. उगीच दोन बुद्रुकांचे ऐकून तुम्ही तिथे लिहायचे बंद करू नका . काही लोकाना तिथे स्वतःची मक्तेदारी निर्माण करायची आहे आणि स्वतःच्या थापा खपवायची आहेत. तुम्ही अवश्य तुमच्या थापा तिथे खपवा... जय हिन्दु राश्ट्र
रच्याकाने:
रच्याकाने:
शीर्षकातील सर्व वेलांट्या दीर्घ हव्यात.
शीर्षकात मानव दोनदा आल्याने
शीर्षकात मानव दोनदा आल्याने मानव पृथ्वीकर यांना या धाग्याने जखडून ठेवले आहे.
बाबा कामदेव, तुम्ही मायबोलीच्या धोरणाशी द्वंद्व खेळू पाहताय का?
Pages