नजरबाज
आजच्या काळात आपण खूप गुप्तहेर कंपन्या ची नावं ऐकतो. रॉ, आय एस आय, इंटरपोल आणि बऱ्याच काही नॅशनल आणि इंटरनॅशनल इंटेलिजन्स गुप्तहेर कंपन्या आहेत. नजीकच्या काळात शिवचरित्र वाचण्याचा योग आला, छत्रपती शिवाजी महाराजांची जीवन गाथा खरंच खूप inspiring आहे. तर शिवचरित्र वाचत असताना मला शिवाजी महाराजांच्या नजरबाजांविषयी फार कुतूहल निर्माण झाले. शिवाजी महाराजांची gurilla war technique तर प्रसिद्ध आहेच पण महाराजांच्या विजया मध्ये नजरबाजांचं खूप मोठं योगदान होत असे मला वाटते.
तर हा लेख अंशतः काल्पनिक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरबाजाच्या जीवनावर प्रकाश टाकणारा किंवा या लेखाच्या माध्यमातून मी त्या नजारबाजाचे आयुष्य जगायला मिळेल म्हणून मी हे लिहिलं आहे.
असाच आपल्या शिवाराच्या बांधावर बसून चांगले कंबरे एवढे उंच वाढलेलं पीक समाधानाने बघत महादेव बसला असताना घोड्यांच्या टापांच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले, नक्कीच महाराजांनी काहीतरी कामगीरी सोपवायला बोलावणं पाठवलं असणार. तो लगबगीनं उठला वस्त्राला लागलेला पाला पाचोळा त्याने झटकला आणि घोडेस्वार काय म्हणतो याकडे लक्ष देऊ लागला. सदरेवर गेल्यानंतर त्याला कळले की महाराज सुरतेची लूट करण्याची मोहीम आखत आहेत. आणि या मोहिमे साठी महाराजांना एक नजराबाजांची तुकडी सुरतेला पाठवायचीय. सुरतेची इतंभूत माहिती तेथील व्यापारी तेथील किल्लेदारानां न कळता महाराजांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी या नजरबाजांच्या वर सोपवली होती. ही कामगिरी अत्यंत महत्वाची होती.
नजरबाजाला नेहमी सतर्क रहायला लागते आणि छोट्या छोट्या गोष्टी टिपाव्या लागतात शिवाय पकडला गेला तर जीव जाण्याचा धोका आहेच किंवा मग छळ करून धर्मपरिवर्तन वैगेरे यालाही सामोरे जायला लागत असे.तर महादेव शिवाजी महाराजांचा खास नजरबाज अत्यंत हुशार,चपळ आणि अफाट स्मरण शक्ती असलेला, महाराजांच्या अनेक मोहिमांमध्ये त्याचा सहभाग असायचा.त्याने आयुष्यात खूप काही सोंगे केली कधी फकीर तर कधी बैरागी तर कधी व्यापारी कधी कट्टर नमाजी तर कधी घोड्याना नाल मारून देणारा.त्याला कित्येक भाषा अगदी अस्खलित पणे बोलता यायच्या. आपल्या मोहिमेवर तो इतका गुंतला जायचा कि महाराजही त्याला ओळखायला चुकायचे कधी कधी.
सदरेवरून आल्यानंतर तो अगदी भारावला होता.कारण स्वराज्यातील प्रत्येकाला वाटायचे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, या स्वराज्यासाठी काहीतरी करावे पण प्रत्येकाला ती संधी मिळायची नाही. महादेव ला ती संधी आज मिळाली होती।
पण आता त्याला त्याची पहिली मोहीम आठवू लागली. अफ़जलखान जेव्हा चालकरून येत होता तेव्हा त्याच्या छावणीची माहिती काढण्याची जबाबदारी महाराजांनी महादेव वर सोपवली होती.अफजल खान पुण्याजवळ तळ ठोकून बसला होता.महादेव शिवाजी महाराजांचा निरोप घेऊन निघाला त्याने मेंढपाळाचा वेष घेऊन गड सोडला. मग त्याने पुण्याजवळ जाताच लोहाराचा वेष घेतला.त्याने आधीच मोहीम आखली होती त्यामुळे त्याने लोहाराचे संपूर्ण काम शिकून घेतले. त्याला बघून त्याचे काम बघुन कुणालाही वाटणार नाही की हा लोहार नसून शिवाजी महाराजांचा मावळा आहे.त्याने तीन आठवडे छावणी च्या जवळ गावातील लोहाराची छोटी मोठी कामं करण्यात घालवले.मग त्याने सैन्यातील एका सरदाराला गाठून त्याला विनवणी केली की छावणी ची कामे त्याला मिळावीत. तो छावणीत घुसला त्याने प्रत्येक गोष्ट टिपली.खानाचे सैन्य किती, त्याचा शस्त्र साठा काय, त्याच्या आणि त्याच्या सैन्याच्या मनात काय चालले आहे.
हे सगळं करत असताना त्याने आपल्याच बांधवांच उध्वस्त होणारं जीवन त्याच्या डोळ्यांनी पाहिलं पण तो तिथे जरा सुद्धा बदलला नाही.कारण त्यांची पुसटशी प्रतिक्रिया सुद्धा शत्रूच्या मनात संशय निर्माण करू शकते त्याला माहित होते.
त्याने खानाच्या सैन्याची इतंभूत माहिती राजांना कळवली, त्यानुसार महाराजांनी आपली पुढची चाल ठरवली. गडावर परतल्यानंतर महाराजांची कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर पडली आणि त्याला वाटले आपल्या जीवनाचे सार्थक झाले. ती थाप अजूनही त्याच्या लक्षात होती.
क्रमश।।।।।।
कसा वाटला नक्की
कसा वाटला नक्की प्रतिसादामध्ये सांगावे.
छान सुरुवात.. थोडे मोठे भाग
छान सुरुवात.. थोडे मोठे भाग टाका
पु ले शु
@किल्ली... नक्कीच खूप
@किल्ली... नक्कीच खूप दिवसांनी लिहितोय म्हणून कंट्रोल नाही झालं... पुढचा भाग मोठा असेल
इन्ट्रेस्टिन्ग रे मित्रा !!!
इन्ट्रेस्टिन्ग रे मित्रा !!!
खरचं रे थोडे मोठे भाग टाक, आणि पटापट टाक.. खुप मस्त होणार आहे हि कथा
- प्रसन्न
खूप छान
खूप छान
धन्यवाद प्रसन्न आणि धनुर्धर..
धन्यवाद प्रसन्न आणि धनुर्धर.... हो नक्की मोठा भाग लिहितोय आणि लवकरच post करतोय
MAST SURUVAT...
MAST SURUVAT...
धन्यवाद कोमल
धन्यवाद कोमल
छान
छान
धन्यवाद कुसुमिता दुसरा भाग पण
धन्यवाद कुसुमिता दुसरा भाग पण post केलेला आहे.
छान सुरुवात केलीय!
छान सुरुवात केलीय! इंटरेस्टिंग!
प्रतिसादासाठी धन्यवाद
प्रतिसादासाठी धन्यवाद