सिंगापूर येथे अर्जंट व्हिसा कसा मिळेल?

Submitted by बाबा कामदेव on 13 August, 2018 - 08:39

२८ ओगस्ट ला सिम्गापूराला निघायचा बेत आहे. पण तो पर्यंत विसा मिळणे कठीण आहे असे पुणे थोमस कूक चे म्हणणे आहे कारण येत्या आठवड्यात मुम्बैतल्या सिंगापूर कॉन्सुलेटला बर्‍याच भारतीय सुट्या असल्याने २७ पर्यन्त मिळण्याची गॅरंटी नाही . थॉमस कूक हे सिंगापूर कॉन्सुलेटचे अधिकृत विसा एजन्ट आहेत....
बरे ,होणारच नाही असेही सांगत नाहीत
काय क्रावे ब्रे ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर authorised agent चा व्हिसा मिळणार नाही सांगत असतील तर विश्वास ठेवा. व्हिसा आणि पासपोर्ट हातात आल्यावर मग Hotel बुकिंग आणि विमानाची तिकिटं काढली तर मग जमू शकेल. तेच पूर्ण ट्रिप plan करणार असतील तर मग chance घ्यायला हरकत नाही. व्हिसा / पासपोर्ट वेळेवर नाही मिळाला तर ते refund देणार का?

चेन्नई ला काँसुलेट आहे आणि चेन्नईहून सिंगापूरची तिकीट खूप स्वस्त असतात. स्वतः try करायचा हा अजून एक option.

वैयक्तिक जात आहोत. ट्रावल मार्फत नाही. विसा साठी कन्फर्म विमानाची तिकीटे लागतात. आम्ही स्वतःच विसा काढतो आहोत. त्यामुळे वेळेत २८ तारखेपर्यन्य विसा न मिळाल्यास विमान बुकिण्ग रद्द करावी लागतील.
चेन्नै वरूनच जायचे आहे. पण विसा मुम्बैतून घेणे सोइस्कर आहे.

4 working days लागतात बहुतेक काँसुलेट ला application मिळाले की व्हिसा stamping होऊन हातात पासपोर्ट पडायला. बाकीचे दिवस agent कुरियर. 4 working days मिळतील, स्वतः वकीलातीत गेलं तर.

तीन दिवसात मिळतो. थॉमस कुक वेडे आहेत. मला त्याम्चा फार राग येतो मी तीन दिवस त्यांच्या ऑफिसात खेटे घातले युरोप पॅकेज हवे आहे म्हणून काही उत्तरच दिले नाही ढिसाळ कारभार. मग मी दुसरीकडून केल्यावर पार जायच्या आधी आ ठ दिवस फोन काय तुम्हाला जायचे आहे म्हणे. मर मेल्या म्हटले मी तर.

============
जुने खोड. सिंगापूर लै गोड.
===============

पुण्याहूनही एजंटमार्फत व्हिसा काढला तरी अप्लिकेशन मुंबईला जाऊन, व्हिसा स्टॅम्प होऊन मोजून 4 दिवसांत (working days) व्हिसा हातात मिळतो. कन्फर्म तिकिटे, ओरिजिनल पासपोर्ट आणि खर्चाची सोय कशी करणार ती कागदपत्रे लागतात फक्त.

28 ऑगस्टपर्यंत मोप टाइम आहे. तुम्ही पुण्यात असाल तर गिरीकंदवाल्यांकडून करू शकता. भरपूर वेळा सेम व्हिसासाठी त्यांची सर्व्हिस वापरली आहे.

ढोले पाटील रोड वर galaxy travels म्हणून सिंगापूर एअर लाइन्स चे ऑफिस आहे. थोमस कूक वाले पण त्यांच्यामार्फत बूक करतात कधी कधी. त्यांनी जर का नाही सांगितले तर नाही होणार. अगोदर ३ दिवसात विसा यायचा. आजकाल ८-१० दिवस लागताय्त. आम्ही जून मध्ये त्यांच्याकडून बूक केला होता. प्रवासाच्या तार्खेच्या जेमतेम ३ दिवस अगोदर विसा आला.

२८ ऑगस्ट ला बराच वेळ आहे.
एक आठवड्यात विसा मिळतो.
बाबा, पेपर्स / डॉक्युमेण्ट्स सगले नीट आहेत ना? तुम्हाला हवं असल्यास मुंबैतले नम्बर देउ शकते. तिथे बोलुन बघा.

सिंगापूर ला कोणी ओळखीचे आहे का? (पर्मनेंट रेसिडेंट पाहीजे) असल्यास ते तुमचा visa तिकडून स्पॉन्सर करू शकता.... 2 दिवस लागतात वीसा यायला

सिंगापूर ला कोणी ओळखीचे आहे का? (पर्मनेंट रेसिडेंट पाहीजे) असल्यास ते तुमचा visa तिकडून स्पॉन्सर करू शकता.... 2 दिवस लागतात वीसा यायला>>>>
येस्स ...स्वानुभव

जौ द्या मुसाफिर.कॉम वाल्यांकडे पैसे भरले आणि कागदं पाठिवली . या पुढे हरीची इच्छा Wink

विसा मंजूर झाल्याचे मुसाफिर .कॉम ने सांगितले. जीव भांड्यात पडला. अन्यथा भूतान चा प्लान बी रेडी होता. बादवे, मुसाफिर.कॉम ची सेवा अतिशय उत्तम आहे,प्रॉम्प्त आहे. तिथे नीलेश पाटील म्हणून मराठी विसा ऑफिसर आहेत. मराठी माणसाला अगत्याने मदत करतात. मार्गदर्शन करतात...

थॉमस अँड कूक युसलेस आणि पाट्या टाकणारे आहेत. अमा यांचा अनुभव वर लिहिलाच आहे.....