ज्योतिष आणि नातेसंबंध

Submitted by y2j on 10 August, 2018 - 06:13

ज्योतिष आणि नातेसंबंध
.कुंडलीतील ग्रहांचा जातकाच्या आयुष्यातील प्रत्येक घटकांवर प्रभाव असतो ,ग्रहांचा जातकाच्या जवळील व्यक्तींवरचा पडणारा प्रभाव पुढीलप्रमाणे पडतो .
1.तृतीय स्थानी गुरु असता जातकाला एक तरी भाउ आसतोच ,काही व्यक्तींना दोन ,तीन भाउ असण्याचीही उदाहरणे आहेत .
2.तृतीय स्थानी सूर्य असता जातकाला बहीण असण्याची शक्यता जास्त असते .
3.पंचम वा लाभ स्थानी गुरु असल्यास पुत्र संतान होण्याची शक्यता जास्त असते या स्थानी सूर्य वा मंगळ असल्यास फक्त पुत्र संततीच होते .
4.पंचम वा लाभ स्थानी शुक्र असल्यास कन्या संतान होण्याची शक्यता जास्त असते .
5.लग्न किंवा सप्तम स्थानी गुरु असता जातकाला त्याच्या अनुरूप जोडीदार मिळतो .
6.लग्न किंवा सप्तम स्थानी शुक्र असल्यास नवरा बायको दोघेही दिसायला सुंदर असतात .
7.लग्न ,चतुर्थ वा सप्तम स्थानी मंगळ असल्यास जातक दिसायला अगदी साधारण जरी असला तरी जोडीदार मात्र त्याला सुंदर मिळतो .
8.लग्न वा सप्तम स्थानी मंगल शुक्र युती असल्यास जातकाला अतिशय सुंदर जोडीदार मिळतो .
9.लग्न वा सप्तम स्थानी शनि असल्यास जातकाचा जोडीदार हा काहीसा थोराड आणि रुक्ष असतो .
10.अष्टम वा बाराव्या स्थानी सूर्य असल्यास जातकाला त्याच्या पित्यापासून दूर रहावे लागते जर सूर्य हा राहू किंवा शनि युतीत असेल तर पित्याला अल्पायु योग असतो .
11.वरील बाबीं विचारात घेता इतर ग्रहांचे युती योग ,ग्रहद्रुष्टी, भावेशाचे कार्यत्व यांचाही विचार करावा लागतो .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती
<<वरील बाबीं विचारात घेता इतर ग्रहांचे युती योग ,ग्रहद्रुष्टी, भावेशाचे कार्यत्व यांचाही विचार करावा लागतो>> हे मह्त्वाचे आहे . फक्त एक-दोन ग्रहावरून भाकीत करू नये. ग्रहांचा खेळ हा क्रिकेट सारखा असतो. एखादा प्लेयर चांगला असून उपगोय नाही सर्व टीम वर्क (सर्व ग्रहांची पोसिशन पाहावी लागते )
तरीही सध्या सध्या गोष्टी कारकत्वा वरून आश्चर्य कारक भविष्य सांगता येत.
एका सकाळी माझ्या काका कडे एक माणूस त्याची म्हैस हरवली आहे म्हणून विचारायला आला होता. काका म्हणाले ती रात्री उत्तरेला गेली आहे आणि रात्री डिड च्या सुमारास तिला कोणीतरी बांधून ठेवली आहे. शोधा सापडेल. तसे शोधल्यावर ती एका शेतात बांधलेली सापडली. त्या शेतावरील माणू स म्हणाला रात्री साधारण डिड दोन वाजता मला घंटीचा आवाज ऐकू आला मी बाहेर पाहतो तो हि म्हैस.. कोणीतरी येईल शोधात म्हणून मी बांधून ठेवली. मी काकांना विचारलं तुम्ही हे कस सांगितलं? ते म्हणाले हरवलेल्या गोष्टीचे प्रतिनिधित्व चंद्र करतो. चंद्र हा रात्री दिड ला चर राशीतून स्थिर राशीत जात होता म्हणजे फिरणारी म्हैस स्थिर झाली व तो चंद्र राहू च्या युतीत जात होता म्हणजे तिला बंधन योग आला .