स्वयंसेवकाचे मनोगत

Submitted by आयडी गोठस्कर on 4 August, 2018 - 05:24

(वैधानिक इशारा : केवळ मनोरंजनासाठी लिहीलेले आहे. यातून गंभीर संदेश वगैरे कुणाला दिसला तर लेखक त्यास जबाबदार नाही).

पाकिस्तान !
पाकिस्तान !!
पाकिस्तान !!!

या एकाच उद्देशाने गझमीचा महमूद हिंदुस्थानात शिरला होता. पण संघ स्वयंसेवकांच्या प्रखर विरोधामुळे त्याला माघारी हटावे लागले. जाता जाता तो अनपेक्षित रस्त्याने गेला आणि वाटेत सोमनाथाचे मंदीर त्याने उद्ध्वस्त केले.

मुहम्मद घौरीने मात्र प्रखर आघात केला. त्या काळी हिंदू धर्मास ग्लानी आलेली होती. या कारणाने प्रभात शाखा आणि सायंशाखा कमी होत चाललेल्या होत्या. त्यावेळच्या सरसंघचालकांना हिंदू धर्म धोक्यात आहे हे उमजत होते पण त्यांचा नाईलाज होता. संघाच्या प्रयत्नाने देशात सोन्याचा धूर निघत होता. लोक सुखसमाधानात होते. ऐश्वर्यात मजेत होते. त्यामुळे त्यांना धर्मकर्तव्याचा विसर जाहला.

मुहम्मद घौरीने लूटमार बहुत केली. पण स्वयंसेवकांचे क्षात्रतेज त्याच्या ध्यानी आले. जर हे विलासी जीवन सोडून युद्धासाठी उभे ठाकले तर खैर नाही या विचाराने त्याने पाकिस्तानचा बेत सोडून दिला. पण जाताना त्याने संघाने सुरू केलेली नालंदा व तक्षशिला ही विद्यापीठे उध्वस्त केली.

मुघलांनी अत्यंत धूर्तपणे पाकिस्तानचा डाव टाकायला सुरूवात केली. त्यांना कुठलीही घाई नव्हती. त्यांनी हिंदुस्थानी लोकांना मुघलाई डिशेस खायला घातल्या. बिर्याणी, कबाब खाऊ घातले. उंची वस्त्रं , मुघलाई संगीत शिकवलं. येणेकारणाने हिंदुस्थानी जनतेने त्यांना आपलेसे म्हटले. मग हळू हळू त्यांनी सत्ता काबीज केली. त्या साठी त्यांनी जातव्यवस्था निर्माण केली. अस्पृश्यता निर्माण केली. फोडा आणि झोडा नीती वापरून त्यांनी राज्य केले. याकाळात संघाचे स्वयंसेवक थोडे उरले. पण त्यांनी उमेद सोडली नाही.
स्वयंसेवकांनी मावळाच्या खो-यात एका चुणचुणीत मुलाला शस्त्रविद्या शिकवली. तोच मुलगा पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज या नावे प्रसिद्ध झाला. त्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

त्यांच्यानंतर पेशवाई स्थापन करून संघाने संपूर्ण देशात पुन्हा एकदा हिंदुत्वाचा झेंडा फडकवला. पण जातीव्यवस्थेने घात केला. अर्धी रयत मुस्लीम झाली होती. ब्रिटीश आले. त्यांच्याविरोधात कुणीच लढायला उरले नाही. संघाने मग झाशीच्या राणीला आणि पेशव्यांना सोबत घेऊन बंड केले. ते चिरडले गेले. पेशवाई बुडाली आणि इंग्रजांचा अंमल सुरू झाला. त्यांनी संघाच्या शाखा बंद करून टाकल्या.

इकडे मुघलांचे वंशज कार्यरत होतेच. संघशाखा बंद झाल्याबरोबर त्यांनी पाकिस्तानाचा डाव पुन्हा खेळायला सुरूवात केली. त्यांनी मुस्लीम लीग बनवली. त्याला गांधीजींनी मदत केली. देशात उरलेल्या गुप्त स्वयंसेवकांनी हा डाव ओळखला आणि १९२५ साली पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. गुप्तपणे त्यांनी संघ वाढवला. लाठ्या काठ्यांनी ब्रिटीशांना नामोहरम केले. लॉर्ड माउंटबॅटन यांना अंधारात पकडले आणि स्वातंत्र्याची मागणी केली. त्याने घाबरून मंजुरी दिली.

पण संघाला श्रेय नको म्हणून त्याने गांधीजींना बोलवून स्वातंत्र्य देतो असे सांगितले. गांधीजींनी मात्र मुस्लिमांना वेगळा देश द्यावा या मागणीला पाठिंबा दिला. अशा रितीने संघाच्या कामावर पाणी फिरले आणि पाकिस्तान अस्तित्वात आला.

देशाचे आणखी तुकडे पडू नयेत यासाठीच मग संघाने काही कारवाया केल्या. त्यामुळे हिंदुत्वाचा मार्ग मोकळा झाला. आता स्वतंत्र भारतात हिंदूराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवणे बाकी आहे. त्यानंतर पाकिस्तान, बांग्ला देश हिंदुस्थानात सामील करण्याचा मार्ग मोकळा होईल. चीन ला आताच नमोवण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष युद्धामधे चीनचे सहा तुकडे करण्याची योजना नागपूरला बनलेली आहे. चीनचा पाडाव झाल्यास भारत महासत्ता म्हणून उदयास येईल. मग संपूर्ण जगावर हिंदूंचे राज्य प्रस्थापित होण्यास किती वेळ लागणार आहे ?

याकामी हिंदुस्थानचा खरा इतिहास जनतेस समजणे गरजेचे आहे. हा वरील इतिहास शंभर टक्के सत्य असून वेळोवेळी त्या त्या काळातील स्वयंसेवकांनी केलेल्या अस्सल नोंदींच्या आधारे लिहीला आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाब यांचे म्हणणे पटले. संघ स्वयंसेवक आणि भक्त यांच्यासाठी हा खरा इतिहास आहे. त्यांच्या साठी हा विनोद कसा असेल ?
(संघावरचा विनोद त्यातली नावे बदलून वाचला तर विनोदी होत असतोय )

लेखकाने फारच मॉडेस्ट अप्रोच घेतला आहे,

संघाच्या आटोकाट प्रयत्नानंतर सुद्धा, चीन युद्ध मध्ये मानहानी झाल्यावर, लष्कराचे मनोधैर्य कायम राहावे म्हणून 26 जानेवारी 1963च्या परेड मध्ये संघाने , भारतीय लष्कराला सामील होण्याची परवानगी दिली याबद्दल काही लिहिले नाही,

मुघल लोक बायका पळवत म्हणून आपल्यात सतीची प्रथा सुरू झाली
- आम्हाला शाळेत एका बाईंनी दिलेले मौलिक ज्ञान Happy

मुघलांमुळेच आपल्या देशात पडदा, घुंगट वगैरे प्रकार सुरू झाले, त्या अगोदर बायका देशात मुक्तपणे फिरत असत.

मुघल आल्यामुळेच मुलीची मुंज करून तिचे शिक्षण सुरू करणे थांबवले. आता परत स्वातंत्र्य मिळाल्याने श्री. खाऊवाले यांनी परत मुंज चळवळ सुरू केली आहे