माणसातील माणुसकी आता बघायला
कमीच मिळते
स्वतःच्या मनाची भावना महत्वाची
दुसऱ्याची भावना कोणाला कळते
काहींना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते
खरंच माणसातील माणुसकी बघायला कमीच मिळते गरिबांना त्रास देणारा श्रीमंतांचा खास असतो कारण तो व्यक्ति पैशासाठी माणुसकी विसरत असतो
गरीब मात्र बिचारा लाजार होऊन बसतो
नशिबी येतं दुःख सारं
हाक मारून उघडत नाही कोणी दारं
स्वतःचं घर बांधताना
दुसऱ्याचं घर मोडणारी माणसं
घरात नात्यात भांडण लावणारी माणसं
का कोणाच्या आयुष्याशी खेळतात ही माणसं
फक्त पैशासाठी इतका आहे का महत्वाचा पैसा
माणूस महत्वाचा की पैसा काही कळत नाही
एकदा गेलेला माणूस पुन्हा मिळत नाही
हे कसं कोणाला कळत नाही
पैसा काय येतो जातो
किती कमावला तरी कमीच पडतो
माणूस तोच असतो ज्याच्या मनात माणुसकी असते दुसऱ्याची कदर केली जाते
आदर दिला जातो
माणसाचं मन चांगलं तर सगळं चांगलं
शेवटी माणूसच माणसाला उपयोगी पडतो
माणूस
Submitted by महादेव सुतार on 3 August, 2018 - 11:41
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे!
छान आहे!
धन्यवाद सर
धन्यवाद सर