प्रिय मित्र राहुल

Submitted by चिखलु on 26 July, 2018 - 15:24

प्रिय मित्र राहुल,

अगदी अचानक तू माझ्या आयुष्यात आलास, मित्र झालास आणि तेवढ्याच अचानकपणे तू आम्हा सर्वाना मागे सोडून निघून गेलास.
तुझ्याशी मैत्री झाल्यावर जेवढा आनंद झाला त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आज रडू आलं.
देवाचे खेळ काही समजत नाहीत, इतका हसतमुख माणूस देवालाही त्याच्याजवळ हवा आहे का?
डॅलस ला गेल्यावर ज्याला आवर्जून भेटावं अशी व्यक्ती म्हणजे राहुल. आता डॅलस ला गेल्यावर कुणाला भेटायचं?
गणपती मध्ये कुणाच्या घरी जायचं?
"शैलेश, तू आई बाबांची काळजी घेतो, साईबाबांच्या blessing कायम तुझ्यासोबत असतील" असं म्हणणारा तू, अरे तुझ्या मुलीला आज Fathers डे ला तुझी गरज आहे. कुठे गेला आहेस तू? परत ये तू.

मी अमेरिकेत आल्यावर जे अगदी मनात घर करून राहिले त्यातला तू एक. आणि एक मित्र म्हणून तू कायम मनाच्या एका कोपऱ्यात राहणार, आपल्या गप्पा, Southwest Harry Hines मध्ये आपली झालेली ओळख, तुझ्या घरातला गणपती बाप्पा, Our Place मधले lunches या आठवणी कायम माझ्या सोबत राहणार.

मन किती वेडं असतं, पुन्हा एकदा डॅलस ला आपण भेटू असं उगाचच वाटतं. कधी कधी देवाचा खूप राग येतो, आजचा दिवसही असाच. आज देवाशी कट्टी.
राहुल, तुझ्या आठवणीने कायम हसू यायचं, आज मात्र तू खूप रडवलस. Balance of Life यालाच म्हणतात का? कशाला हवाय असला balance.
आपण कितीही strong आहोत असा आव आणला तरी एखाद्या नाजूक प्रसंगी कोलमडून गेल्यावर नियती किती ताकदवान आहे हे नव्याने कळते. नियती माझ्यावर इतकी का रागावलीये

मित्रा पुन्हा एकदा भेट रे, आपल्या गप्पा अर्धवटच राहिल्या. यावर्षी गणपतीला तुझ्या घरी बोलव रे पुन्हा. "साई बाबांच्या blessing तुझ्यासोबत आहेत" असं म्हण रे एकदा. तुला निरोप देणं जीवावर आलंय. आणि या जन्मात, आता तू नाहीस हे मनाला समाजवणंही शक्य नाहीए. माझ्यासाठी तू आहेस अजून. साई बाबांच्या blessing आहेत तुझ्यासोबत. ते घेतील तुझी काळजी. भेटू पुन्हा असच कुठेतरी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

डोळे पाणावले Sad माणसे गेली की त्यांची आपल्या आयुष्यातली जागा कळते, ती रिकामी जागा कधीच भरु शकत नाही.