पुण्यातली खादाडी - नवी सांगवी, जुनी सांगवी, औंध , पिम्पळे गुरव

Submitted by किल्ली on 18 July, 2018 - 02:30

नवी सांगवी, जुनी सांगवी, औंध,पिम्पळे गुरव ह्या भागातील उत्तम खाऊची आणि जेवणाची स्थळे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

साई चौक चौपाटी: (नवी सांगवी )
१. श्री पराठा ह्यांचे सगळेच पराठे
२. मराठवाडा special पाणीपुरी (मोड आलेले मूग , चणे ह्यांचे फीलिंग असते, गॉड पाणी तिखट पाणी , मिश्र पाणी देतात , आपण करायचं कॉम्बिनेशन हवं तसं )

औंध ITI रस्ता :
१. कढाई येथील रबडी-जिलेबी

साई चौकातला बारामती वडापाव राहिला.
एम एस काटे चौकाच्या अलिकडे गायत्री भेळ
आणि कृष्णा चौकातला पाणीपुरी वाला आमचा फेवरेट.. का तर तो शेवटी २ मसाला पुरी देतो. Proud
जुन्या सान्गवीतले अम्माज इडलीपिठ .. , काटे पुरम चौकात पण एक डोसेवाला आहे.
आणि आमच्या अग्दी घराजवळ झालेली जगताप यान्ची खाउ गल्ली. मोस्ट हॅपनिन्ग प्लेस. Happy

नयनाजी विपू बघा Happy
आणि कृष्णा चौकातला पाणीपुरी वाला आमचा फेवरेट.. का तर तो शेवटी २ मसाला पुरी देतो>>>> मझा पन !!
आणखी एक नवीन पाणीपुरीवाला आलाय तिथे , कालच पाहिला Happy
शेवपुरी कुठे मिळते चांगली ह्या भागात ?

कृष्णा चौक च्या आसपास :
महावीर चा फालुदा,
शेगाव कचोरी (हॉट चिप्सच्या जवळची )

साई चौक :
ग्राहकची भरीत भाकरी ठेचा चटणी : अगदी वऱ्हाडी ठसका आणि किफायतशीर

काटे चौकाजवळ :
सुआशी हॉटेल आहे : तिथले स्टार्टर्स खुप यमी असतात

रामकृष्ण मंगल कार्यालय जवळ :
KP पिझ्झा : बरा आणि स्वस्त

साई चौकातला बारामती वडापाव राहिला. >>> ++११११११
आणि कर्जत चा वडापाव ....तो सुद्धा मस्त आहे....
काटेपुरम चोकात गोली वडापाव .. , बटाटा वाली पाणीपुरी ....तोसुद्धा शेवटी २ मसाला पुरी देतो.... Happy

एक खान्देशी जेवण मिळण्याचं नवीन हॉटेल सुरु झालाय , काटेपुरं पासून रामकृष्ण जाणाऱ्या रस्त्यावर ..
पाहायला पाहिजे try करून .. वरणबट्टी मिळेल असं लिहिलंय ... माझी आवडती डिश .. मैत्रिणीने खिलवली होती एकदा

साई चौकातला बारामती वडापाव राहिला >>>>> अगदी अगदी.

बारामतीच्या रेल्वे स्टेशनला जसा वडापाव मिळायचा अगदी तशीच चव. आतापर्यंत असा वडापाव खाल्ला नाही कुठे.

काटे पुरम चौक, कुलकर्णी वडेवाले.

जे बॅचलर जेन्टस असतील त्यांच्यासाठी....
जुन्या सांगवीत PWD कॅार्नर रजपुत कडे बाॅईल्ड एग भुर्जी

औन्ध मधल्या दुर्गा च्या गरमागरम कॉफीला ह्या भागात तरी दुसरा पर्याय नाही Happy
ह्या वीकान्ताला पुन्हा एकदा, रम्य सन्ध्याकाळी हा वाफाळता अनुभव घेतला Happy

वरण बट्टी कृष्णा चौक

नॉर्थ इंडियन चिकन डिशेस- दिल्ली दरबार (डांगे चौक) हे हॉटेल एका मस्जिदचा भाग आहे, खूप चांगले लोक.. आणि तिथल्या पदार्थांची चव अप्रतिम!

Aroma's Hyderabad house- झकास बिर्याणी.. चिकन फ्राय पीस बिर्याणी बेस्ट. (कोकणे चौक)
अजून एक आहे, कराची house, थोडे महाग आहे पण तिथेही बिर्याणी झकास आहे, खास शाही टच (कोकणे चौक)

महालक्ष्मी मंदिर परिसरात भेळ उत्तम मिळते.

तीन महिन्यांपूर्वी बाबा रामदेव ढाबा सुरू झाला आहे, काळेवाडी फाट्याजवळ.. उत्तम सर्व्हिस, झकास चव.

औंधमधल्या फॅब इंडिया च्या थोडं पुढे डाव्या हाताला एक गल्ली लागते, तिथे एका laundry च्या बाहेर एक सँडविच शॉप ( खरं तर गाडी, पण मोबाईल नाही, पर्मनंट) आहे. तिथे एकदा रात्री रस्ता चुकून गेले होते. आम्हाला सगळ्यांना तिथले सगळे सँडविचेस उच्च आवडले होते. पण जागेचं नाव माहीत नाही, कारण चुकून त्या लेनमध्ये गेले होते. पण लोकलाईट्सचा फेवरीट अड्डा वाटला. खूप गर्दी होती.
कोणी तरी प्लिज मला नक्की लोकेशन आणि नाव सांगा

कोणी तरी प्लिज मला नक्की लोकेशन आणि नाव सांगा>> काका हलवाई ची गल्ली, अगदी लगेच उजव्या बाजूला आहे ते, नाव आत्ता आठवत नाहीये

पुण्यात आमच्या देवगड़ हापूस आणि पायरी ची होम डिलिव्हरी सुरु केली आहे. कृपया संपर्क करा.
तुमच्या order साठी 9004194114 वर whats app करा.

सांगवीत कृष्णा चौकापाशी एक पाटील म्हणून खान्देशी आहेत पत्र्याच्या शेड्स मध्ये हॉटेल आहे त्यांचे, त्यांना लागूनच बिर्याणीवाला आहे. तर त्या पाटीलकाकांचा नंबर मिळू शकतो का? कुणी सांगवीत राहणारे आहेत का? ह्या धुंद पावसाळी वातावरणात वरण बट्टी वांग्याची भाजी खावीशी वाटतेय, आणि त्यांच्याकडे चांगली असते बट्टी.. मी फार दूर आहे सांगवी पासून. फुकट चक्कर नको म्हणून विचारावं म्हणतोय

माझ्या मते आर्या सांगू शकेल, ती राहते बहुदा तिकडे. तिथे रस्त्याचे मेजर काम चालू होते मध्यंतरी. अशक्य हाल. ते विचारात घ्या जाण्याआधी.

अपडेट: पाटीलकाकांचे हॉटेल स्थलांतरित झाले आहे कोरोनाकाळापासून (कुठे ते माहीत नाही). दुसरे एक हॉटेल सापडले सोहम नावाचे. आवडले नाही.

नारायणपेठेत खान्देश जंक्शन आहे चांगले, पण फार लांब असल्याने आणि भूक अति लागल्याने जाणे झाले नाही.

लंपन आणि अजिंक्यराव ,
आर्याला विचारले होते मी इथे अशी अशी मदत हवीय असे. ( एक खवय्या दुसऱ्याला मदत करनेके लिये कूच बी करेगा रे )
पण हाय , तिला हे हॉटे.लचं माहीत नाहीये.
सॉरी अजिंक्यराव