भूतान - प्रवास मार्गदर्शन.

Submitted by दक्षिणा on 13 July, 2018 - 08:55

सप्टेंबर च्या मध्यात भूतान चा प्लॅन ठरला आहे. तिकिटे बूक झाली आहेत.
तिथे काय पहावे, आणि कुठे रहावे हे अजूनी ठरते आहे.
काय विशेष मार्गदर्शन करू शकाल?
सप्टेंबर मध्ये तिथे वातावरण कसे असेल? थंडीचे कपडे बरोबर घ्यावेत का?
खायला काय स्पेशल? काय चुकवू नये? काय करणे टाळावे?

एक कोटेशन मिळाले आहे ९२००० हजार (इनोव्हा/झायलो) साठी, बागडोगरा ते बागडोगरा यात हॉटेल वगैरे सगळं इन्क्लुडेड आहे. (ब्रेकफास्ट आणि डिनर) दुपारचे जेवण आम्हाला पहावे लागेल.

साईट सिईंगबद्दल पण मार्गदर्शन जरूर करावे कृपया.

अवांतर - अनुभव पण शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षे,
मुशाफिरी दिवाळी २०१७ अंकातला `अस्पर्श भूतान' लेख बघ. पॉप्युलर भूतानपलिकडच्या भूतानबद्दल त्यात माहिती मिळेल.
मोशन सिकनेस वगैरे समस्या नसतील तर तो भूतान बघावास असं म्हणेन.

फक्त भूतानचा प्लॅन आहे की भूतानला जाताना नॉर्थ सिक्कीम मध्ये पण हॉल्ट घेणार आहात? ,सिक्कीम मध्ये थांबायचा मानस नसेल तर बागडोग्रा मार्गे जाणे खर्चिक पडेल (ते तुमच्या एजंटने दिलेल्या एस्टीमेट वरून जाणवते आहेच). नुसता भूतानच्या प्लॅननुसार थेट थिम्पु पर्यंत फ्लाईट घेणे दगदग अन खिसा दोन्ही दृष्टीने परवडेल.

अर्थात, नॉर्थ सिक्कीम इन्कल्युडेड असेल तर ठीकच आहे नॉर्थ सिक्कीम मध्ये गुरूडोंगमार लेक मस्ट आहे, त्याशिवाय नथुला बॉर्डर, लाचेन, लाचुंग, मंगन, यूमथांग व्हॅली मस्ट आहे. सिक्कीम मधून भु मार्गे भुतानला जाताना एक दोन दिवस बफर जरूर ठेवा, तिथे हिमालय अन वातावरण भयानक लहरी आहे, बर्फ-पाऊस-लँडस्लाईड वगैरे प्रोन एरिया मधून रस्ता जातो (भूतानचा) गंगटोक शहरात मुक्काम असेल तर दीड-दोन दिवस पुरेत साईट सीइंगला. रुमटेक मोनेस्ट्री चुकवू नका, अव्वल उत्तम शांत अनुभव असतो तो. गंगटोकचा एमजी रोड सुंदर आहे एखादी हॅरी पॉटर युनिव्हर्स मधली ऍली असावी असा तो रस्ता आहे, फक्त गर्दी बेसुमार असते (तरीही शिस्त असते) . सिक्कीमीज (भूतीया लेपचा गोरखा वगैरे) अन भूतानीज लोक खूप प्रेमळ असतात अन मदतीला तत्पर असतात. नक्की पाहा, अन हो गंगटोक मध्ये बनजाखरी फॉल आणि तिबेटीयन बुद्धिस्ट म्युझियम नक्की पहा , प्रवासाला शुभेच्छा.

आम्ही सपत्नीक २०१७ एप्रिल मध्ये नॉर्थ सिक्कीम केलं होतं खूप उत्तम अनुभव होता. तिथे पावलोपावली आर्मीचं अस्तित्व जाणवतं अन गंमत म्हणजे तिकडे आपल्याच मराठमोळ्या मराठा लाईट इंफॅन्ट्री अन महार रेजिमेंटचे डिप्लोयमेंट होते तेव्हा (अजूनही असली तर कल्पना नाही) सगळी आपली सातारा कोल्हापूर सांगली पुणे अहमदनगरची पोरे भेटतील. खूप मदत करतील, सोबत चहा प्यायला आग्रह करतील आम्ही तरी तीर्थ समजून प्यायलो होतो. एक वेगळाच अभिमान वाटतो १२००० फुटांवर छत्रपतींचा दगडी बस्टसाईझ पुतळा स्थापन केलेले पाहून, घेण्याचा अनुभव आहे!.

जोडणीपत्रक -

खादाडी

व्हेज/नॉनव्हेज मोमो चुकवू नका आपण पुण्यात खातो त्या मोमोजला सर नाही ती, त्याशिवाय याकचं दूध घट्ट करून कडक केलेला छुर्पी हा प्रकार उगाच पाच रुपयांचा घेऊन ट्राय करा (स्थानिक लोक तो सुपारी सारखा चघळत असतात) , थुकपा हे तिबेटीयन नूडल सूप पण मस्ट ट्राय, सिक्कीमीज खाद्यपरंपरेत बीफ नॉर्मल आहे, ते त्याज्य असल्यास नॉनव्हेज नीट पारखून खा, तसं ब्रॉयलर चिकन प्रत्येक ठिकाणी मिळूनच जातं. सिक्कीम मध्ये स्थानिक असलेल्या 'दले खुरसानी' मिर्चीचं जहाल लोणचं सुद्धा ट्राय करता येईल, आवडलं तर एमजी रोड वर सुरुवातीलाच सिक्कीम टुरिझमच्या ऑफिस इम्पोरीयम मध्ये त्याच्या बरण्या विकत मिळतील, बांबू शूटचं लोणचं पण उत्तम असतं फक्त ती जरा अकवायर्ड टेस्ट आहे मला ते मुरवलेले बांबू शूट खास आवडले नव्हते, ऱ्होडोडेंड्रोन फुले नक्की पाहा, ह्या फुलांचे आंबूस गोडसर ऱ्होडोडेंड्रोन सरबत नक्कीच ट्राय करा.

भूतान मधे टायगर नेस्ट मोनेस्ट्री नक्की पहावीत इतकेच सांगू शकेल मी.

भूतान भारी जागा आहे दादा, खूपच मस्त लोक आहेत. टायगर नेस्ट मोनेस्ट्रीचं खालील चित्र पहा. ही आमची थोडक्यात हुकलेली जागा होय. जब्बर मजा येते ह्या पूर्ण भागात. रात्री आभाळ मोकळं असलं तर अक्षरशः सडा हा शब्द फिका पडावा इतकी पखरण दिसेल ताऱ्यांची.

(चित्र जालावरून साभार)

images (10).jpeg

भुतान सरकारची साईट बघा. आम्ही ईथुन चौकशी केली होती तेंव्हा सिंगापुर टु सिंगापुर असे कंपलसरी पॅकेज होते. बाकी दुसरे ट्रावल एजंट चालत नाही असे कळले होते. आमच पण राहीलय अजुन.

जेम्स बाँड, तुम्हाला किती खर्च आला / कसे गेलात वगैरे लिहिणार का

बॉण्ड नाय ताई आम्ही वांड असतोय. आम्ही दोन कपल्स गेलो होतो, गंगटोक मध्ये जवळपास २* किंवा ३* च्या जवळपास जाणारी हॉटेल्स मिळाली होती (तसंही गंगटोक फुडं आडोसा मिळाला तिथं अंग टाकायला लागतं) . साईट सीइंग, परमिट फीज, गाईड, पर्सनल गाडी (दोन जोडपी मिळुन एक झायलो/स्कॉर्पिओ/इनोव्हा) इत्यादी सगळे अधिक येणे जाणे सगळे मिळून (विमान तिकिटे) ३८,००० /कपल इतका खर्च आला होता. त्यात जेवण ब्रेकफास्ट वगैरे धरून जवळपास ४६ पकडा खर्च (गंगटोक सोडून सिक्कीम मध्ये जेवण महाग असते कारण दुर्गमता, चॉईस ऑन लिमिटेड असतो) तरीही लाचुंग/लाचेन मध्ये उत्तम शाकाहारी जेवण (दोन पंजाबी भाज्या, पुलाव, रोटी, गरम खीर) मिळाळेच होती. काही ठिकाणांवर मॅगी / मोमोवरच भागवावे लागले. गाडीबद्दल बोलता, बागडोगरा एअरपोर्ट ते गंगटोक पुढे पूर्ण टूर वेगवेगळ्या गाड्या अन ड्रायव्हर होते. गाड्या पहाडात चालण्या लायक असतील तरच टिकतात म्हणून इकडे साध्या माणसाकडेही स्कॉर्पिओ वगैरे आरामात दिसून जाते, मारुतीच्या बारक्या गाड्या फक्त गंगटोक/सिलिगुडी गंगटोक मधेच दिसतात. गाडी नक्की करण्यापूर्वी ड्रायव्हर निर्व्यसनी असणे चेक करणे मस्ट (सिक्कीममध्ये दारू स्वस्त आहे) गाडीचे टायर गुळगुळीत नसलेले पाहणे अन इन्श्युरन्स अपडेटेड असलेलं तपासणे गरजेचे होय , सहसा हे टूर ऑपरेटरला सांगितले की त्यांना येणारा पाहूणा 'कच्चा खेळाडू' नसल्याचं कळतं अन बाकी व्यवस्था (गाडीसहित) चोख होते. गंगटोक मध्ये इतका त्रास नाही होत पण वरती उंची वाढत जाते (नॉर्थ मध्ये) तशी थोडा त्रास होऊ शकतो (होईलच असे नाही) ते प्रत्येकाच्या फिटनेस लेव्हल अन प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. मुख्य खर्च हॉटेल्सचा पण त्यावर खर्च करणे व्यर्थ होय, कारण 'हॉटेल्स' म्हणावी अशी आस्थापने फक्त गंगटोक/सिलिगुडीत सापडतील बाकी ठिकाणी लोकांनी आपली घरेच हॉटेल मध्ये कन्व्हर्ट केली आहेत (तुमची चॉईस अगदीच ताज गृप खाली जाणारी नसली तर ह्यापुढे हा प्रतिसाद वाचू नये, ताज गृप हॉटेल्स पार थिम्पु मधेही सापडतील). हल्ली सिक्कीम मध्ये ५०० मीटर दारूबंदीमुळे खूप कंट्रोल आलाय हे ही खरे. एकदा गंगटोक सोडले की फक्त उबदार जागा, स्वच्छ पांघरुणे इतकेच पाहावे (ती तशी मिळतातही) , बाकी स्वस्त चीनी मालाच्या रुपात आलेली आर्टीफॅक्ट (?) विकत घेणे न घेणे आपली मर्जी, गंगटोक मधेच एमजी मार्ग जवळच 'लाल मार्केट' आहे, तिथे हा माल खच्चून भरलेला दिसतो, उत्तमोत्तम बोन चायना क्रोकरी मिळू शकते पण ती धडपडत आणायची डोकेदुखी होते , नवऱ्याला एखाद्या बार मध्ये उलथवून क्रोकरी घेण्याचा गनिमी कावा यशस्वी ठरू शकतो हा स्वानुभव (आमच्या सौ ने आम्हाला असेच गंडवले होते) (ठळक सूचना फक्त लग्न झालेल्या तायांना लागू, नाहीतर फुकट जावईबुवांचे शाप आम्हाला लागायचे)

सिंगल असाल तर एमजी रोड गंगटोकच्या वरल्या अंगाला भरपूर सुंदर हॉटेल , पब, डान्स फ्लोर वगैरे आहेत त्यातलं एक येती नावाचं हॉटेल लैच उत्तम होते डिसेंट पब्लिक असतं. सिक्कीम एकट्यादुकट्या लेडीज करता पण खूप सेफ आहेच.

अजून काय सांगू बोला.

काय मस्त पोस्ट. मग प्रवास व र्णन मालिकाच लिहा की. शैली छान आहे तुमची. आम्ही काय तिकडे जात नाय. पहाडां कौन चढता बोलके. पर पढनेका शौक है. मला भूतानचा राजपुत्र व जेतसन पेमा राजकन्या/ राणी त्यांचे बाळ खूप आव्डते. ह्यांडीक्राफ्ट कप डे थंका नावाचे बुद्ध्हीस्त वॉल हँगिंग ह्यात इंटरेस्ट आहे. बाकी वाचनमात्र.

हॅव अ ग्रेट हॉलिडे दक्षिणाताई.

अहो एकतर २०१७ मध्ये जाऊन आलोय, त्यात आणि आठवून लिहायचं म्हणजे ते करायला गेले काय अन गळ्यात अडकले पाय होऊन बसायचं. त्यापेक्षा इथेच उस्फुर्त (शुद्ध मराठीत एक्सटेम्पोरेट) लिहितो, (दक्षिणा ताईंना चालणार असेल तर सविनय धागा हायजॅक विनंती करणारा अर्ज रुजू करण्यात येत आहे)

रच्याकने तुमचा भूतान आणि नेपाळ मध्ये घोळ होतोय का? पहिल्या पॅरा मधील काही गोष्टी नेपाळ मध्ये येतात.

फक्त भूतानचा प्लॅन आहे की भूतानला जाताना नॉर्थ सिक्कीम मध्ये पण हॉल्ट घेणार आहात? , >> जेम्स भाऊ धन्यवाद. खूप छान लिहिताय. सध्या तरी आम्ही बागडोग्रा पासून बाय रोड भूतान ला जातोय. ते योग्य ठरणार नाही का?

बागडोगराहुन आठ-दहा तास पकडून चला, जवळपास साडेतीनशे किलोमीटर. वाट जवळपास डोंगराळ असणार. विमानाचा ऑप्शन असला तर द्रुक एअर (भुतानी राष्ट्रीय विमानसेवा) वेबसाईट रेफर करा, तिथे दर तीन महिन्याने पुढील 3 महिन्यांसाठी फ्लाईट शेड्युल पीडीएफ फॉरमॅट मध्ये दिलेले असते. बागडोगराहुन थेट पारो (भुतानचा एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ) आठवड्यातून दोन दिवस फ्लाईट होत्या मी लास्ट चेक केले होते तेव्हा.

उरला प्रश्न बाय रोड प्रवास ओके असण्याचा तर ते आपल्यावर अवलंबून असेल, मोशन सिकनेस + वाढती उंची असे दोन्ही असते त्यातले आपल्याला त्रासदायक काय ते ठरवून निर्णय घेता येईल तुम्हाला. आपल्याला समजा आपल्याकडे गगनबावड्याचा घाट 'लागत नाही' म्हणून तिथेही लागणार नाही असेही नसते अन उंची वाढली की ते घाट लागतीलच असेही नसते.

शिवाय दहा तास प्रवास करून भूतान मध्ये शिणवट्यात पोचण्यात पॉईंट नसेल असे मला वाटते. सरळ पारो पर्यंत फ्लाईट घेतलीत तर उत्तम पडेल अन तिथली मुख्य भटकंती लगेच ते ही फ्रेश मूड मध्ये सुरू करता येईल.

ड्रक एअर चेक केले होते पण मला फ्लाईट स्केड्युल दिसले नाही.
मिळालेली माहिती अशी आहे की ड्रक एअर चे चार्जेस खूप आहेत. पारो ते भूतान.
आणि ते फक्त फॉरेनर्स साठी आहे म्हणे. मोस्ट्ली इंडियन्स बाय रोड जातात.

८ ते १० तास खूप होतात Sad

<<< बागडोगराहुन थेट पारो (भुतानचा एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ) आठवड्यातून दोन दिवस फ्लाईट होत्या मी लास्ट चेक केले होते तेव्हा. >>>
पारो हा विमानतळ जगातील १० धोकादायक विमानतळांपैकी आहे आणि इथे मॅन्युअल मोडमध्येच लँडिंग करावे लागते. नुकत्याच बघितलेल्या कार्यक्रमानुसार संपूर्ण जगात फक्त २६ पायलट सर्टिफाइड आहेत जे पारो विमानतळावर विमानाचे लँडिंग आणि उड्डाण करू शकतात. ( वेब वरील माहिती जुनी आहे ज्यात फक्त ८ पायलट सर्टिफाइड आहेत, असे म्हटले आहे).
https://youtu.be/9uwO7xAuxys?t=4m16s ( ६ नंबर = पारो विमानतळ )

Phuentsholing नावाचं ठिकाण आहे तिथे येताना आणि जाताना दोन्ही वेळेला एकेक रात्र रहावं लागणार आहे.
याबद्दल काय सांगाल? भूतान मध्ये एन्ट्री वगैरे करताना ज्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात त्या या ठिकाणी कराव्या लागतात.