वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.
ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.
कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!
घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.
तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.
तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.
त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.
मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.
सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.
आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!
तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.
त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.
बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.
डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.
पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.
२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.
खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.
डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ
ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/
डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4
मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.
एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.
मल्हारी, असं वाक्य कुठेही
मल्हारी, असं वाक्य कुठेही नाही. तू व्हिडीओही पाहिलेला नाहीस आणि तुला कुठलीही वाक्ये कुठेही दिसताहेत.
भागवतांच्या लेखामधे पहिल्या हाफ मधे जिचकारांच्या भाषणाची (तुझे काँग्रेसचे ग्रेट जिचकार) थोडक्यात माहीती आहे. त्यानंतर त्यावर दीक्षितांनी काय केले, काय सुधारणा केल्या हे त्यांनी थोडक्यात दिलेले आहे. शेवटी दीक्षितांच्या भाषणाच्या लिंका दिलेल्या आहेत. हे सर्व टाळून चर्चा करणे व्यथ आहे.
दीक्षित बरोबर की चूक हा मुद्दाच वेगळा आहे. प्रश्न अर्धवट वाचून व ऐकून मतं बनवण्याचा आणि ती अधिकाराने व आग्रहाने लादण्याचा आहे.
गोलपोस्ट शिफ्ट करायचा प्रयत्न
गोलपोस्ट शिफ्ट करायचा प्रयत्न चांगला आहे राजसी. --- मला कळलं नाही.
इथे इतकी चर्चा (actually भांडणं) का ? हा प्रश्न ! मूळ विषय बाजूला आणि बाकीची चर्चा जास्त!
लोकांना actually फायदा होतोय ना? त्यांचे actually ग्रुप्स आहेत ना? ते कोणाकडे पैसे मागत नाहीत ना? ते कोणत्या विशिष्ट labs recomnend करत नाहीय ना? आता फेसबुक किंवा youtube subscribers वाढले म्हणून जो आर्थिक फायदा होणार त्याबद्दल प्रॉब्लेम आहे का? तसं तर निशा मधुलिका ला स्वयंपाक करताना बघण्यासाठी 5+mn subsribers आहेत.
राजसी + १.
राजसी + १.
किरण्या, आता लेख परत वाच,
किरण्या, आता लेख परत वाच, त्यातले जिचकर स्तवन वाच, त्यावरून दीक्षित रुब्रिफिकेशन वाच, त्यानंतर फुकट अन विनासायास गाळीप्रदान कर.
राजसी,
तुमच्याशी च र चा करायची माझी पात्रता नाही. क्षमस्व.
मल्हारी बास प्लीजच.
मल्हारी बास प्लीजच. फारएण्डने उदाहरण म्हणून दिलेले वाक्य आहे ते. ते कुठेही नाही लेखात. तू अडचणीत आल्यावर हा कांगावा सुरू केलास. दुसरी गोष्ट म्हणजे तुला मला किंवा इतर कुठल्याही आयडीला किरण्या अशी हाक मारण्याची परवानगी कुणीही दिलेली नाही. हे काम तू गेले तीन वर्षे इमाने इतबारे करतोहेस. तुला थोडे टोचले की थयथयाट सुरू कर तोहेस.
हे आता केविलवाणे वाटण्याच्या पलिकडेही गेलेले आहे. मला तुझ्याशी चर्चा करण्याची इच्छाच नाही. एखाद्या डॉक्तरशी करेन. तू डॉक्टर आहेस की कंपाऊंडर की काँग्रेस पक्षात सतरंज्या उलचतोस हे मला ठाऊक नाही आणि मला त्याच्याशी घेणे देणे नाही.
तुझ्यासारख्या भेकड आणि अंधारात लपून अंदाधुंद गोळीबार करून विचारवंत म्हणून स्थापित होऊ पाहणा-या अमानवीय अस्तित्वाशी मला कसलेही घेणे देणे नाही.
फारएण्डने उदाहरण म्हणून
फारएण्डने उदाहरण म्हणून दिलेले वाक्य आहे ते. ते कुठेही नाही लेखात. >>> लेखात नाही पण त्यांच्या स्वतःच्या नंतरच्या एका प्रतिक्रियेत आहे.
https://www.maayboli.com/node/66654?page=2 >>> इथे. १३ ऑगस्ट ची प्रतिक्रिया.
@शाम भागवत
@शाम भागवत
हा लेख वजन कमी करण्यासाठी अतिशय प्रोस्ताहन देणारा आहे. माझा भाऊ सध्या करत आहे. त्याला उत्तम results आले आहेत.
Thank you for sharing and thanks to Mohan Kee Meera and others sharing for their experiences and results.
मी पण सुरु केला आहे. मला तर सोपा वाटला. ८ दिवस झालेत. आशा आहे की सुरु ठेवेन.
मि. खड्डा, कोण काय आहे हे
मि. खड्डा, कोण काय आहे हे इथल्या लोकांना बरोबर माहित आहे. कुणाला दुर्लक्षित करायचे, आणि कुणाच्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायचे हे ही. काळजी नसावी.
इथे. १३ ऑगस्ट ची प्रतिक्रिया.
इथे. १३ ऑगस्ट ची प्रतिक्रिया. >> ओके. मी काही प्रतिक्रिया स्किप केल्या होत्या.
फा,
फा,
ज्याचे जीवितकार्य माझा आयडी उडवणे इतकेच आहे, त्याला कितीदाही तोंडघशी पाडले तरी काय उपयोग?
तिथे लॉजिक इंग्लिश लिटरेचर च्या एमए पुढे हतबल होते, अन नियती निवड करते ..
मि. खड्डा, कोण काय आहे हे
मि. खड्डा, कोण काय आहे हे इथल्या लोकांना बरोबर माहित आहे. कुणाला दुर्लक्षित करायचे, आणि कुणाच्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायचे हे ही. काळजी नसावी. >> ह्म्म.
काही दिवसांपूर्वी अड्ड्यावर वेगळे काही वाचले होते. पण ते असोच. बदल हा जगाचा स्थायीभाव आहे. उद्या मधूमेह बरा होऊ शकतो असे सिद्ध झाले तर स्विकारावे लागेल.
@sharpie शुभं भवतु _/\_
@sharpie
शुभं भवतु
_/\_
@फारएन्ड
@फारएन्ड
व्हिडीओतील प्रतिलेखन आहे ते. व्हीडीओतल्या वेळाही सोयीसाठी दिल्या आहेत. मी फक्त वस्तुस्थिती टेबलावर मांडतोय.
ते माझे विचार आहेत अस काही जण भासवत आहेत. त्याला माझा इलाज नाही.
कॅनडा इथे एक रिसर्च पेपर
कॅनडा इथे एक रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेला आहे. त्याबाबत टेलीग्राफ ने दिलेले वृत्त.
https://www.telegraph.co.uk/science/2017/03/15/type-2-diabetes-can-rever...
टाईप टू - मधूमेह. लक्षणे राहत
टाईप टू - मधूमेह. लक्षणे राहत नाहीत .
https://www.medicalnewstoday.com/articles/317074.php
@sharpie,
@sharpie,
मगाशी प्रतिक्रीया नीट देता आली नाही.
एवढ्या गदारोळात तुमची प्रतिक्रीया आलेली पाहून खूप हायस वाटल. योग्य ठिकाणी योग्य तो मजकूर पोहोचतो आहे याचा पुरावाच होता तो. तुमच्या सारखेच प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रतिक्रिया देणाऱ्यांचीच मी वाट पहातोय.
३ महिन्यांनी प्रतिक्रीया जरूर कळवत रहा. प्रगतीच्या काही लेखी नोंदी ठेवता आल्या तर पहा.
इंडीयन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स
इंडीयन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स ( IISER ), पुणे इथे एक रिसर्च केला गेला आहे. डॉ वाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली काँप्युटरवर एक मॉडेल बनवले गेले. नेटवर्क मॉडेल असे त्याचे नाव आहे. या अभ्यासात मधूमेह रिव्हर्स होतो असे भाकीत केले गेलेले आहे. जिज्ञासूंनी गुगळून पहावे.
शाम भागवत - तुमचा मूळ लेख मला
शाम भागवत - तुमचा मूळ लेख मला खटकला नाही, कारण तो एक शास्त्रीय लेख अशा दृष्टीने वाचता तुम्ही तुम्हाला समजलेली माहिती इतरांना देत आहात अशा दृष्टीने तो वाचला. माझा एक मित्र ते फॉलो करतोय सध्या आणि तो पूर्ण खातरजमा केल्याशिवाय काहीही करत नाही. तुम्हीही तपासण्यांचे रिपोर्ट डॉ दीक्षितांना पाठवण्याबद्दल लिहीले आहे, त्यामुळे मी लिहीले ते मूळ लेखाबद्दल नाही.
माझा विरोध फक्त तशा घाउक वाक्यांपुरताच आहे. एखाद्या मोठ्या गटाबद्दल इतकी घाउक वाक्ये सहसा खरी नसतात.
भागवत सर,
भागवत सर,
फारएण्डने तुमचा कोट केलेला प्रतिसाद आहे त्यात दोन टाईम स्लॉट आहे. त्या दोन्ही स्लॉट मधे तुम्ही दिलेली विधाने नाहीत. तुम्ही नेमके कोणते भाषण सांगताय ? तुम्ही बालगंधर्व रंगमंदीरात दीक्षितांचे जे भाषण झाले , ज्याची लिंक दिली त्याबाबतच बोलताय असे गृहीत धरतो.
पहिल्या टाईम स्लॉट मधे हाजी अलीचा दर्गा आणि दुस-यात महाबळेशवरला हाताला एक्स्टेन्शन लावण्याबद्दल उल्लेख आहे.
४३.५१ पासून पहा. त्यात
४३.५१ पासून पहा. त्यात त्यांनी सांगितले आहे. मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. परखून घ्या. सायंटिफिक वाटले, प्रचिती आली तरच विश्वास ठेवा.
या धाग्यावर हे कोट केले होते.
त्या प्रतिसादातच लिंक दिलीय.
त्या प्रतिसादातच लिंक दिलीय.
ते भाषण २०१८ मधले आहे.
स्थळ टिळक स्मारक मंदीर
हे ते भाषण <\a>
भागवत सर तुम्ही दिलेल्या
भागवत सर तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून पहा. माझ्याकडे सह्याद्री दूरदर्शनचा कार्यक्रम दिसतोय. टिळक स्मारकचे व्याख्यान मी पाहीले आहे. त्यात असा उल्लेख असल्याचे आठवत नाही. प्रयोग केल्याचे उल्लेख आहेत.
https://m.youtube.com/watch
https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=Pm6neCIJbUE
या लिंकवर तुम्ही दिलेले टाईम
या लिंकवर तुम्ही दिलेले टाईम स्लॉट्स चेक करून पहावेत. त्यातल्या एकात स्तनपानाविषयी माहिती आहे.
आता पुन्हा बाळंतपण, पगारी रजा आणि घरकामगार असे दुष्टचक्र सुरू होणार इथे.
हा रिसर्च पेपर आहे.
हा रिसर्च पेपर आहे.
International Journal of Clinical Trials
Dixit JV et al. Int J Clin Trials. 2017 Nov;4(4):171-175
http://www.ijclinicaltrials.com
Original Research Article
Effect of eating frequency on prediabetes status: a self-controlled
preventive trial
Jagannath V. Dixit , Sanjeev Indurkar
http://dx.doi.org/10.18203/2349-3259.ijct20174118
डाऊनलोड करण्यासाठी
http://www.ijclinicaltrials.com/index.php/ijct/article/download/231/126
मग लिंक बरोबर आहे.
मग लिंक बरोबर आहे.
सह्याद्री वाहीनीवरच आहे तो व्हीडीओ
तिन्ही टाईम स्लॉट चेक केले. बरोबर आहेत
मोबाईल, आयपॅड व संगणक
मोबाईल, आयपॅड व संगणक तिन्हीवर चेक केले. लिंक बरोबर चालतीय.
तुम्ही तो प्रतिसाद पुन्हा
तुम्ही तो प्रतिसाद पुन्हा वाचा. सह्याद्री वाहीनीवरचा टाईम स्लॉट वेगळा आहे. असो.
पण तुम्ही म्हणता तसे स्टेटमेण्ट सह्याद्री वाहीनीवर केलेले आहे. पण संदर्भ किंचित वेगळा आहे.
मी भारतात असतो. आता झोपतो.
मी भारतात असतो. आता झोपतो.
तुमच्या प्रतिसादातल्या या
तुमच्या प्रतिसादातल्या या टाईम स्लॉट्स बद्दल बोलत होतो.
जिवनशैली बदला.
डॉ. दिक्षीतांनी ७ राज्यातल्या २७ शहरातील १००० मधुमेहींचा अभ्यास केल्यावर, मधुमेहावरील सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये काय बदल केला पाहिजे?
जास्त माहितीसाठी पहा ४४:३४ ते ४६ः२३
मधुमेहाबद्दल डॉक्टर लोकांना चुकीचे शिकवल गेलयं.
डॉक्टर लोकांना शिकवले गेलेय की मधुमेह हा बरा होणारा आजार नाही तर तो कायम वाढत जाणारा आजार आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे.
जास्त माहितीसाठी पहा ४६:२४ ते ४६ः५२
Pages