Submitted by बेफ़िकीर on 2 July, 2018 - 10:34
गझल - रोज मरगळ
रोज मरगळ उगीच का येते
आठवणही.... तुझीच का येते
वेळ सांगून येत नसुदे पण
वेळ केव्हातरीच का येते
तो मनांना दुखावतो कायम
त्यास बरकत बरीच का येते
खिन्न डोळे पुसायच्या कामी
रोज रात्री उशीच का येते
भेटतो तो विचारतो आहे
'दुःख माझ्या घरीच का येते'
भिंत नेतात जे अशांनाही
न्यायला पालखीच का येते
जे हवे ते लिहून ठेवा.... पण
शेवटी वाळवीच का येते
एवढा 'बेफिकीर' असुनी तू
सांग कामी शमीच का येते
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेहमीसारखीच हीही गझल छान!
नेहमीसारखीच हीही गझल छान!
छान
छान
२
.
छान
छान
छान...
छान...
अप्रतिम..
अप्रतिम..
जे हवे ते लिहून ठेवा.... पण
जे हवे ते लिहून ठेवा.... पण
शेवटी वाळवीच का येते
वरील ओळी जास्त भावल्या. नेहमी प्रमाणे छान
जे हवे ते लिहून ठेवा.... पण
जे हवे ते लिहून ठेवा.... पण
शेवटी वाळवीच का येते
वरील ओळी जास्त भावल्या. नेहमी प्रमाणे छान
जबरदस्त आहे सर्व!
जबरदस्त आहे सर्व!
जे हवे ते लिहून ठेवा.... पण
शेवटी वाळवीच का येते
वैश्विक सत्यच लिहून गेलात!
वेळ सांगून येत नसुदे पण
वेळ केव्हातरीच का येते
काय बोललात राव! वा!!
तो मनांना दुखावतो कायम
त्यास बरकत बरीच का येते
खास!
मागच्या एका प्रतिसादात
मागच्या एका प्रतिसादात कुणीतरी म्हणास्ले आहे की एक प्रकारचा उदासपणा दिसतो हल्ली.
ते मी ही नोंदवतो आहे.
पण याचवेळी एक फिलॉसोफिकल कल दिसून येतो आणि तो भावतो.
)
अर्थ गर्भ असणे किंवा शेर वाचल्यावर त्यावर विचार तयार होणे हे तुमच्या गझला वाचून घडतेच. (माझे तरी होते!