Submitted by स्वप्ना_राज on 30 June, 2018 - 09:49
निळ्या शर्टवाल्याचे वडिल भ्रमिष्ट झालेत. शालवाल्या बाईच्या नवर्याला ल्युकेमिया झालाय. ब्लॅक सूटवाल्याचा मुलगा ड्रग्ज घेतो.....
त्या मुलीने माझ्याकडे पाहिलंही नव्हतं तरी तिचे डोळे बघून मला वाटलं - एका माणसाला एव्हढं दु:ख असू शकतं? आधी माझा तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. पण तिने माझ्या डोळ्यात बघून जे सांगितलं ते फक्त मलाच माहित होतं.
मी म्हणालो 'हे मला जमलं तर किती लोकांना मदत करता येईल'.
'आणि श्रीमंत होता येईल, हो ना डॉक्टर?’
मी ओशाळलो.
तिने माझा हात हातात घेतला ‘तुमची खरंच तशी इच्छा आहे?’
‘हो'
आजकाल मी लोकांच्या नजरेला नजर द्यायचं टाळतो.
Be very careful what you wish for. You may just get it.
-----
वि.सू. कथेच्या शीर्षकात 'वांच्छील' असा जो शब्द आहे तो बरोबर लिहिलाय का? नसेल तर जरूर कळवा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो असा 'वांछील' असा लिहितात,
तो 'वांछील' असा लिहितात, संदर्भ: पसायदान
शाळेत पण असेच वाचले आणि लिहिलेले आठवते.
धन्यवाद नरेन! बदल केला आहे
धन्यवाद नरेन! बदल केला आहे
छान आहे.
छान आहे.
शेवटाची ओळ वाचून THe monkeys paw कथेची आठवण झाली.
मस्त! आवडली.
मस्त! आवडली.
दोनदा वाचावी लागली मग समजली.
दोनदा वाचावी लागली मग समजली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आतापर्यंतच्या तुमच्या शशक मध्ये ही सर्वात जास्त सरस वाटली मलातरी !
अजुन येऊद्यात
सहीच
सहीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!
मस्त!!
छान आहे.
छान आहे.
शब्दकोशात वांच्छा आहे.
शब्दकोशात वांच्छा आहे.
नाही कळली..
नाही कळली..
कळली नाही.
कळली नाही.
२-३ दा वाचली; कळतेय, कळली असं
२-३ दा वाचली; कळतेय, कळली असं वाटतंय; पण कळली नाहीय.
मला वाटतं 'वांच्छिल' बरोबर असावं.
आवडली.
आवडली.
===
दुसर्यांची दुःखं वाचण्याचं 'वरदान'(?) मिळालं आहे डॉक्टरला.
अॅमी बरोबर प्रतिसादाबद्दल
अॅमी, बरोबर
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!!
साधना, Monkey's Paw वाचून शाळेत असताना जाम घाबरल्याचं आठवतंय.
पण त्या कथेशी ह्याचं साधर्म्य तुझ्या कॉमेंटनंतर लक्षात आलं.