ऑन लाईन फर्निचर विकत घेण्याबद्दल

Submitted by मनीमोहोर on 23 June, 2018 - 02:59

मला पलंग, वॉर्डरोब, आणि सोफा विकत घ्यायचे आहे. Urban ladder किंवा पेपरफ्राय चा इथे कोणाला अनुभव आहे का ? खूप डिस्काउंट देत आहेत त्यामुळे गुणवत्तेबद्दल बद्दल शंका वाटतेय. तसेच mdf, रबर वुड, पावडर वुड इंजिनिअर्ड वुड अशा पासूनच बनवलेले फर्निचर जास्त दिसते आहे. त्याबद्दल ही नेटवर खूप उलट सुलट माहिती आहे. Urban ladder आणि pepperfry दोन्हीचे मिक्स रिव्ह्यू आहेत नेटवर. तुमचा कोणाचा वैयक्तीक अनुभव चांगला / वाईट असेल तर इथे प्लिज शेअर करा म्हणजे निर्णय घेताना मला उपयोग होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला urbanladder चा अनुभव नाही.
पण माझ्यामते Its not about pepperfry or urbanladder. तिथुन आपण काय घेतो हे महत्वाचे.

पेपरफ्राय साईटवरून मी आजवर फर्निचर व्यतोरिक्त अनेक छोट्या छोट्या वस्तु मागवल्या आहेत त्यांच्या गुणवत्तेबाबत आणि सर्विसबाबत माझा अनुभव चांगला आहे.

फर्निचर पैकी फक्त बूक रॅक, बारस्टूल अशा छोट्या वस्तुच मागवलेल्या आहेत. पण मला त्यांचा अनुभव चांगला म्हणता येईल असाच आलाय. पेपरफ्राय साईटवर 'वूड्स्वर्थ' नामक ब्रँडचे फर्निचर सॉलिडवूड मधले असते. मला त्यातल्या अजूनही काही वस्तु घ्यायच्या आहेत, घेणार आहे. तर एकदा 'वूड्स्वर्थ' ची रेंज बघून घे.

मी अर्बन लॅडरवरून सोफा सेट घेतलाय. शिवाय दोन तीन बेडस पण घेतले आहेत. गुणवत्ता छान आहे. सर्विसही व्यवस्थित आहे.

सोफासेटच्या वेळी बुकींग नंतर त्यांनी आधी एक खुर्ची (आम्हाला ज्या रंगात हवी होती ती) घरी आणून दाखवली होती, आम्हाला बघायची होती म्हणून. कदाचित बुकींगच्या आधी देखिल दाखवतात आणून बहुतेक.

Its not about pepperfry or urbanladder. तिथुन आपण काय घेतो हे महत्वाचे. +१
फर्निचर या कॅटेगरीतल्या फक्तच दोनच वस्तू आतापर्यंत ऑनलाइन मागवल्या आहेत.
१. स्नॅपडिल वरुन लॅपटॉप टेबल. ही खरेदी अगदीच अडाणीपणाची होती. घरातला ग्लासटॉप टीपॉय खराब झाल्याने त्याला पर्याय म्हणून शोधताना हा लॅपटॉप टेबल दिसला. त्याची माहिती (आकार वगैरे) काहीच नीट न पाहता ऑर्डर केला, घरी येताच निराशा झाली. पण हरकत नाही, तोच आता लॅपटॉप टेबल कम मुलाला अभ्यास करण्यासाठी म्हणून वापरला जातोय.
२. पेपरफ्राय वरुन शू रॅक. पहिला डाव देवाचा म्हणत वर केलेली चूक, इकडे सुधारली. ऑर्डर करण्याआधी सगळी माहिती व्यवस्थित पाहून मगच ठरवलं. वेळेत डिलिवरी व व्यवस्थित असेंब्ली करुन दिली पेपरफ्रायवाल्यांनी. मिळालेली वस्तू हवी तशीच निघाल्याने ही डील व्हॅल्यू फॉर मनी ठरली Happy

मी अर्बन लॅडर वरून एक शू रॅक घेतला. चांगला आहे. दुसृया सुतारा कडून असेंबल करून घेतला. तो भेटेपरेन्त दोन तीन महिने ते पॅकेट पण उघड्ले नव्हते. पेपर फ्राय मध्ये क्वर्की फर्नि चर छान मिळते. माझ्या हैद्राबादच्या घरासमोरच त्यांचे एक चक्क फिजिकल दुकान आहे. तिथे जाउन चेक केला स्टफ खूप वेगळ्या लुकचे व सॉलिड फर्निचर आहे. पण महागही आहे. जसे साडेतीन लाखाचा सोफासेट, दीड लाखाचा बेड इतक्या इन्वेस्ट्मेंटची मला आता गरज नाही म्हणून ते ड्रॉप केले. बारकी टेबले, कपाटे सुरेख वाटली. एखादा अ‍ॅक्सेंट पीस दुकानातूनच घेण्यालायक आहे.

आता जून जुलै मध्ये हैद्राबादेत पहिले आय किया दुकान उघडत आहे तिथे बघितल्या शिवाय त्या घरासाठी काही घेणार नाही. आयकिया चे पण ऑनलाइन उपलब्ध होईल तिथे जरूर बघा.

अ‍ॅमेझॉन वरून मागवलेला सोफा खराब निघाला. पण काहीही कटकट न करता त्यांनी परत घेतला. पैसे मिळायला थोडासा उशीर झाला. पण मिळाले.

पेपरफ्रायचे स्टुडीओज आहेत. पुण्यात सेबा रोडला आहे. तिथे वस्तू पाहता येते आणि ऑर्डर करता येते. मुंबईत पण असणारच. अर्बन लॅडरचा स्टुडीओ आहे कि नाही कल्पना नाही. पण तिथून मागितलेली एक वस्तू आलीच नाही. डिलीव्हरीचा प्रॉब्लेम. सीओडी असल्याने त्रास नाही झाला.

दुकानात एमडीफपेक्षा हलके लाकूड वापरतात. रबर वूड किंवा काही ठिकाणी आंब्याचे लाकूड वापरतात. रबर वूड टिकते पण आंब्याचे तुटते. तो भाग कापडाने झाकला गेल्याने कळत नाही. सागवानी खूपच महाग आहे. पण त्याला पर्याय नाही.

Studio madhe jaun baghun mag online ghya. Mala side tables, curtains ashya vastoo chhan milalelya aahet.

Furlenco navachi furniture rental app / co aahe. Tyancha review changle aahet. Try Karun bagha. Mala tyanchya kimati/ combo aavdalet. Lok 6-6 mahinyala furniture change kartat. Soft furnishings te lok navin detat. Mostly public la brand new furniture milalay.

आम्ही पेपराफ्राय वरून एक स्टडी टेबल आणि एक 4 खणाचे उभे लाकडी कपाट घेतले आहे.
किंमत सुतारापेक्षा हाय एन्ड असेल थोडी.पण फिनिश मस्त.
IMG_20180311_210028.jpg

मी पेपरफ्रायवरून टीव्ही युनिट, चेस्ट ऑफ ड्रॉवर्स, सिंगल बेड विथ बॉक्स स्टोरेज, लॅपटॉप टेबल, २-डोअर वॉर्डरोब, आणि छोट्यामोठ्या इतर वस्तू अशी बरीच खरेदी केलीय गेल्या ५-६ महिन्यात. ओव्हरॉल चांगला अनुभव आहे. यापुढेही घेणार आहे.

सनमायका/लॅमिनेट बनवायची फॅक्ट्री कुणी पाहिली आहे का? ती पाहिली तर पेपर लॅमिनेशनला नावे ठेवता येत नाहीत.

दोन मुलांसाठी स्टडी युनिट्स बनवून घेतली घरी. लाकडी फ्रेम + प्लायवूड वापरून बनवलं तर प्लायचा खर्च अधिक मजुरी असा प्रत्येकी ३५ ते चाळीस हजार खर्च सांगितला. फक्त प्लाय आणि मजुरी हा एकूण चाळीस हजार आणि चांगल्या दर्जाचं एमडीएफ वापरून दोन्हीचे २५००० ठरले. माझे बजेट २५००० च असल्याने तेच केलं. एमडीफ चा दर्जा चांगला आहे. एलडीफ असेल तर दरवाजे हातात येतात काही दिवसांनी. नेटवर जे उपलब्ध आहेत ते बहुतेक एलडीएफ आहेत. स्वस्त आहेत. शिवाय प्रत्येक विशेष दिवसाचं निमित्त साधून ४०% डिस्काउंट वगैरे सांगितलेले असते.
खर तर तीच खरी किंमत असते.

अर्बन लडर आणि पेपरफ्रायवर दोन प्रकाराचे फर्निचर असते १. प्रेस्स्ड फायबर वुड (एम डि एफ) आणि २. सॉलिड वुड (शिशम वुड)

जर तुम्हाला मजबूत आणि कायमचे फर्निचर पाहिजे असेल तर सॉलिड वुड, मॅगो वुड, शिशम वुडचे मॅटरियल असलेले फर्निचर मागवा..हे महाग असते पण डिल असेल तर दुकानापेक्षा स्वस्त पडते. जर तुम्हाला नाजूक, हलके, छोटे किंवा तात्पुरते फर्निचर पाहिजे असेल तर एम डि एफ असलेले फर्निचर मागवा..हे तसं जरा स्वस्त असते आणि डिल असेल तर अजून स्वस्त पडते.

मला दोघांचा चांगला अनुभव आहे.

फ्लिपकार्ट वाल्यांची फर्निचरची ऑनलाईन शॉपिंग साईट होती. मेटलकार्ट की असं काही तरी नाव होते. त्या साईटवर चांगल्या दर्जाचे फर्निचर होते. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून बंद करताना खूप स्वस्तात सगळे फर्निचर विकून टाकले. ज्यांनी घेतले त्यांच्याकडे पाहीले. लॉटरीच लागली त्यांना.

धन्यवाद सर्वाना लगेच इथे अनुभव शेअर केलेत म्हणून.
सगळेच प्रतिसाद चांगले आहेत. मला निर्णय घेताना ह्याचा नक्कीच उपयोग होणार आहे.

ममो, ऑनलाईन डील्स स्वस्त पडेल हे आलंच ओघानं; तरीही जर ओळखीतला अनुभवी सुतार असेल आणि फर्निचर हलवा-हलवीचा प्लॅन नसेल तर बनवून घेतलेलं फर्निचर केंव्हाही बेस्टच... जरा महाग पडेल, घरात सामानाचा पसारा होईल पण फिनिशिंग मध्ये हे सगळ्यात जास्त उजवं ठरतं हे ही तेव्हढच खरं. आणि अर्थातच प्लाय कुठल्या गेज चा हवाय, फिटिंग्स कुठल्या स्टाईलच्या हव्यात, सन्मायकाची काय क्वालिटी हवीय हे आपलं आपल्याला ठरवता येतं.
अजून एक; सोफा वगैरे लाकडी ठीक पण डबल-बेड/ सिंगल बेड लोखंडाच्या मट्रेल चा का विचार नाही करत...? ते ही एलेगंट दिसतील वर पुन्हा मस्त मजबूत असतात आणि पलंग वगैरे डिसमेंटल करता येतो अगदीच कुठे मूव् करायचा झाला तर. वाळवी वगैरेची ही झिगझिग नाही.