मै बेवडा हू.. ठर्की हू.. ड्रग एडीक्ट्स हू.. सब हू..
पर टेरेरीस्ट नही हू !!..
असं संजू बोलतो ..
विश्वास ठेवता ??
ठेवत असाल तर तो येतोय...
संजू .. संजय दत्त.. रणबीरच्या रुपात येतोय ..
एका राजकुमाराचे आयुष्य जगणे ज्याच्या नशिबी होते..
त्याला आयुष्यात काय स्ट्रगल करावा लागला याची संघर्षमय कहाणी घेऊन येतोय..
आपला मुन्नाभाय त्याची ओरीजिनल स्टोरी घेऊन येतोय..
तीनशेपेक्षा जास्त मुलींशी असलेले संबंध अत्यंत प्रामाणिकपणे कबूल करत येतोय..
फक्त त्याला टेरीरीस्ट तेवढे म्हणू नका..
कधी कधी मनात सहज विचार येतो,
आपल्या संजूचे आडनाव दत्त नसून खान असते तर....
पण हा विचार करायची ही वेळ नाही..
आपले आदर्श मेले ह्यांव नी त्यांव या गप्पा मारायची ही वेळ नाही..
आता आपल्या सर्वांचा लाडका बाबा येतोय...
मला विचाराल तर 200 कोटी कुठे गेले नाहीत..
काय बोलता ?
घ्या ट्रेलर बघा ...
रणवीर बोले तो डिट्टो संजू दिसतोय !
संजय दत्त आणि रण्बीर
संजय दत्त आणि रण्बीर दोघांचेही फॅन नक्कीच बघतील चित्रपट.
>>>
रणबीरचा जो गेट अप आहे, जो लूक आला आहे...
काही वेळाने मी विसरूनच गेलो की तो खराखुरा संजय दत्त नसून रणबीर आहे ..
एवार्ड विनिंग परफॉर्मन्स होणार त्याचा..
हो. गेटप / लूक अगदीच जमला आहे
हो. गेटप / लूक अगदीच जमला आहे.
तरुण्पणीचा नव्यानेच पदार्पण केलेला संजय दत्त, सडक वैगेरेच्या वेळचा वाढवलेल्या केसांचा,
जेलमधे खंगलेला, सुटल्यावरचा वास्तव मधला, मुन्नाभाई, चित्रपटाबाहेर खर्या आयुष्यातला मधला वयस्कर दाढी पिकलेला स्थूल असे अगदी परफेक्ट लूक जमलेत त्याचे.
मला कुमार गौरव आणि सुनील दत्त यांचं कास्टिंग तितकं जमल्यासारखं वाटत नाही.
'रश्मी पुराणिक' ह्यांची पोस्ट
'रश्मी पुराणिक' ह्यांची पोस्ट वाचली. हास्यास्पद आहे. खरं तर, जेव्हा 'संजू' चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हाच वाटलं होतं की अश्याच प्रतिक्रिया टिपिकल संस्कारी पोलिसांकडून येतील.
एक गोष्ट लक्षात घ्या. संजय दत्तवर चित्रपट येतोय, त्याला भारतरत्न दिलं जात नाहीय. आणि चित्रपट हा कशावरही येऊ शकतो, कुणावरही काढला जाऊ शकतो. बायोपिक आहे तो. जो कुणी सजीव असेल, त्याच्या आयुष्याला दाखवलं जाऊ शकतं. ह्यापूर्वीही अनेक ह्याहीपेक्षा अट्टल आणि भयंकर गुन्हेगारांवर सिनेमे येऊन गेलेले आहेत. त्यात काही नवीनही नाही आणि नैतिक/ अनैतिक तर अजिबातच नाही. प्रत्येक आयुष्य, मग ते एखाद्या संताचं असो वा गुन्हेगाराचं, एक कहाणी असते. ती सांगितली जाऊ शकते. मग तो अगदी सामान्यातला सामान्य मनुष्य असो किंवा कुणी सेलिब्रिटी. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, कहाणी वेगळी.
रिसेंटली, मी 'ओमेर्ता' पाहिला. तो सिनेमा तर 'ओमर शेख' वर आहे. जो कन्व्हीक्टेड दहशतवादी आहे. माझ्या मते बायोपिक कसा असावा ह्याबाबतचा 'ओमेर्ता' हा आपल्याकडचा मापदंड असायला हवा. दिग्दर्शकाने फक्त एक कहाणी सांगितली आहे. कुठल्याही ठिकाणी कोणतंही स्टेटमेंट नाही. पूर्णपणे न्युट्रल.
सांगायचं सार हे की कुठलीही कहाणी, कुणाचीही कहाणी ही सांगता आली पाहिजे आणि सांगितली गेलीही पाहिजे. तो संजय दत्त असो वा ओमर शेख, अब्दुल कलाम असो वा मिल्खा सिंग आणि टाटा-बिर्ला-अंबानी असो वा रणजित पराडकर, त्या त्या कहाणीला फक्त 'कहाणी' म्हणून पाहायला शिका, मित्रांनो. बळंच जिथे तिथे संस्कारी डोस पाजू नका. हास्यास्पद व्हाल.
टीप - 'संजू'चं पहिल्या दिवशीच्याच तिकीटाचं बुकिंग केलेलं आहे.
रसप+१
रसप+१
त्या कहाणीला फक्त 'कहाणी'
त्या कहाणीला फक्त 'कहाणी' म्हणून पाहायला शिका>>>>>>>>. रसप, जस्ट टू मच एक्स्पेक्टेशन्स.
दिग्दर्शकाने फक्त एक कहाणी सांगितली आहे. कुठल्याही ठिकाणी कोणतंही स्टेटमेंट नाही. पूर्णपणे न्युट्रल>>>>>>> + १
पण संजु मधे त्याची बाजु मांडलीये, ग्लोरिफिकेशन केलंय. आय एम नॉट टेररिस्ट म्हणतोय तो.
टेररिस्ट नसेल तरी गुन्हेगार
टेररिस्ट नसेल तरी गुन्हेगार नक्कीच आहे!! चित्रपटात ग्लोरिफिकेशन असेल असे वाटते आहे. चित्रपटाचे रिव्ह्यू बघूनच चित्रपट बघायचा की नाही ते ठरवेन.
त्या कहाणीला फक्त 'कहाणी' म्हणून पाहायला शिका>>>>>>>>. रसप, जस्ट टू मच एक्स्पेक्टेशन्स >>> +१ पण कहाणी आहे की ग्लोरिफिकेशन तेसुद्धा बघायला हवे.
सस्मित,
सस्मित,
राजकुमार हिरानी आणि संजू टीम प्रमोशन्समधे सांगत आहे त्यावरून ग्लोरीफीकेशन नसावे असा अंदाज आहे.
हिरानींचे आधीचे चित्रपट पाहता, २९ जूननंतर ह्यावर कॉमेंट करण्याइतपत संयम बाळगण्यास माझी तयारी आहे.
पण संजु मधे त्याची बाजु
पण संजु मधे त्याची बाजु मांडलीये, ग्लोरिफिकेशन केलंय. आय एम नॉट टेररिस्ट म्हणतोय तो.
.>>> नाहीच आहे तो तेरारिस्ट.. गुन्हेगार नक्कीच आहे आणि त्याची शिक्षा त्याने भोगली आहे.
लोकहो.. आमिर खानला संजू ची
लोकहो.. आमिर खानला संजू ची नाही, वडील सुनिल दत्त ह्यांची भुमिका ऑफर केली होती राजकुमार हिराणीनी. पण आमिरला संजू (मेन रोल) करायचा होता (कारण तो खूप चॅलेंजिंग होता). म्हणून त्यानी वडील करायला नकार दिला.
इती न्यूज पेपर्स.
ऑ??? मला तर वाटलं आमीरला
ऑ??? मला तर वाटलं आमीरला मुन्नाभाईची ऑफर दिलेली हिराणीने
आणि आमीर खान संजय दत्त कसा
आणि आमीर खान संजय दत्त कसा दिसला असता
किती कष्ट घ्यावे लागले असते त्या मेकप आर्टिस्टला.
सस्मित,
सस्मित,
त्या म्हणत आहेत,
आमिर ला मुन्ना भाई mbbs चित्रपटात मुन्ना ची नाहींतर त्याचा वडिलांची भूमिका (जी सुनील दत्त नि केली) ऑफर झाली होती. आणि अमीर खान ला संजू (ने केलेला) रोल करायचा होता म्हणीं त्याने नकार दिला
मुन्नाभाई मध्ये मुन्ना
मुन्नाभाई मध्ये मुन्ना झालेल्या संजय दत्तचा बाप आमीर ??
https://www.youtube.com
https://www.youtube.com/results?search_query=munnabhai+offers+to+shahrukh
हे सर्च बघा
आणि सांगा मुन्नाभाई शाहरूखने केला असता तर कसा असता...
सर्किट सुद्धा मग कदाचित सलमान नाही तर सैफ असता..
आणि बाप अमिताभ ??
आमिर खानला संजू ची नाही, वडील
आमिर खानला संजू ची नाही, वडील सुनिल दत्त >. सिम्बा, ह्यावरुन असं वाटतंय की त्या संजू बद्दल बोलताहेत.
आणि तसंही मुन्नाचा वडील खुद्द सुनील दत्तच दाखवले होते की.
रसप, आपल्या पोस्टशी सहमत आहे.
रसप, आपल्या पोस्टशी सहमत आहे.
फक्त एका कंडीशनवर. तो बायोपिकच असावा. ग्लोरीफिकेशन नसावे.
अन्यथा मॅचफिक्सर अझरवर सुद्धा पिक्चर आला होताच की, मला ते सुद्धा आवडले नव्हते. बघितला नाही, पण कल्पना करू शकतो.
बाकी जी लोकं रईस चित्रपटावरून यात शाहरूखने कुठल्यातरी गुन्हेगाराचे उदात्तीकरण केले आहे असा ओरडा करू शकतात ते ईथे तर हक्काने ओरडा करणारच.
संजू बघण्यास मी सुद्धा उत्सुक आहे, कारण तो राजकुमार हिराणीने बनवला आहे. ट्रेलरमध्ये रणबीर प्रचंड आवडला आहे.
बाकी संजय दत्त बद्दल किती खरे आणि किती खोटे दाखवले आहे याची चर्चा चित्रपट पाहिल्यानंतरच करण्यात अर्थ आहे.
माझ्या अंदाजाप्रमाणे त्याचे ईतर छोटेमोठे दुर्गुण प्रामाणिकपणे दाखवत त्याचा मोठा गुन्हा मुद्दाम सौम्य करून दाखवला असेल.
आपल्या कडक परीक्षणाची वाट बघतोय.
सस्मित,
सस्मित,
त्या म्हणत आहेत,
आमिर ला मुन्ना भाई mbbs चित्रपटात मुन्ना ची नाहींतर त्याचा वडिलांची भूमिका (जी सुनील दत्त नि केली) ऑफर झाली होती. आणि अमीर खान ला संजू (ने केलेला) रोल करायचा होता म्हणीं त्याने नकार दिला >>>> सिम्बा, आमिरला मुन्ना भाई mbbs साठी विचारले होते ते खरे आहे, शाहरुखला सुद्दा विचारले होते.
आमिरला संजू चित्रपटात सन्जय दत्तच्या वडिलान्ची भुमिका ऑफर झाली होती हे सुद्दा खर आहे. ही भुमिका आधी अक्षय खन्ना करणार होता अस सुद्दा वाचल होत मी.
सुलू,
सुलू,
मला काहीच म्हणायचे नाहीये
फक्त शकुन च्या लिहिण्यावरून सस्मित चा झालेला गैरसमज दूर केला.
बाकी कोणीही कोणत्याही भूमिका करो, आपुन को क्या??
संजू बघाल न बघाल पण त्या आधी
संजू बघाल न बघाल पण त्या आधी राज कपूरचा धरम करम नक्की बघा.
रसप पटल , एकदा ऑनलाईन बघायला
रसप पटल , एकदा ऑनलाईन बघायला हरकत नाही
संजय दत्त कडे शस्त्र सापडलं.
संजय दत्त कडे शस्त्र सापडलं. ते कुठून आलं हे त्याला चांगलं ठाऊक होतं. जर त्याने वेळेत माहिती दिली असती तर खूप मोठ्या प्रमाणावर झालेली प्राणहानी वाचली असती. त्यामुळे आय अॅन नॉट टेररिस्ट असे म्हणणे ग्लोरिफिकेशनच आहे. टेररिस्ट काय आणि गुन्हेगार काय,थोडाच्साच फरक आहे.
रईस मधे ज्या कॅरॅक्टरवर सिनेमा आहे, ते आजच माहीत झाले आहे अनेकांना. तसेच त्यात कुठेही त्याचा उल्लेख सत प्रवृत्ती म्हणून केला नाही. माफिया डॉनच आहे तो. लोक पाहतील आणि सोडून देतील. दीवार मधे एका स्मगलरचा रोल अमिताभने केला आहे. पण थेट नाव नाही. काल्पनिक कथा म्हणून आली आहे. सुलतानचे पात्र थेट गुन्हेगार दाखवलाच आहे.
संजू मधे तो संजय दत्तच आहे. काल्पनिक नाही. आणि तो इनोसंट नाही असे कोर्टाने ताशेरे झाडले होते असे वाचनात आले.
दाऊद, हसीना पारकर, अरुण गवळी,
दाऊद, हसीना पारकर, अरुण गवळी, हाजी मस्तान
हे काही बायोपिक, या आधी आलेले
तसेच परिस्थितीमुळे गुन्हेगार बनलेले
Bandit queen, पानसिंग तोमर
प्रतिसाद लिहिता लिहिता लक्षात
प्रतिसाद लिहिता लिहिता लक्षात आलं की एक स्वतंत्र ब्लॉगच होऊ शकतोय. म्हणून वेगळी पोस्टच टाकतोय.
सॉरी रे ऋन्म्या ! __/\__
आमिर खानला संजू ची नाही, वडील
आमिर खानला संजू ची नाही, वडील सुनिल दत्त >. सिम्बा, ह्यावरुन असं वाटतंय की त्या संजू बद्दल बोलताहेत.>>
होय. संजू बद्दलच लिहिलं आहे. उगिच मधेच मुन्नभाई आणून कन्फ्यूजन केलंय मधल्या पोष्टींनी.
आता परत लिहिते.
लोकहो.. संजू सिनेमा मधे आमिर खानला संजू ची नाही, वडील सुनिल दत्त ह्यांची भुमिका ऑफर केली होती राजकुमार हिराणीनी. पण आमिरला संजू सिनेमा मधे संजू (मेन रोल) करायचा होता (कारण तो खूप चॅलेंजिंग होता). म्हणून त्यानी संजू सिनेमा मधे वडील करायला नकार दिला.

इती न्यूज पेपर्स.
आमीर खान सुनील दत्तच्या
आमीर खान सुनील दत्तच्या रोलसाठी
म्हणजे जो रोल आता परेश रावलने केलाय त्यासाठी आमीरला विचारलं हे कैच्याकैच.
होय. संजू बद्दलच लिहिलं आहे.
होय. संजू बद्दलच लिहिलं आहे. उगिच मधेच मुन्नभाई आणून कन्फ्यूजन केलंय मधल्या पोष्टींनी>> >>>> सिम्बाओ वाचा
हायला, म्हणजे सस्मित करेक्ट
हायला, म्हणजे सस्मित करेक्ट ट्रॅक वर होत्या होय!!
सॉरी
चित्रपट बघणार नाही !
चित्रपट बघणार नाही !
जो रोल आता परेश रावलने केलाय
जो रोल आता परेश रावलने केलाय त्यासाठी आमीरला विचारलं हे कैच्याकैच.
>>>>
आमीरने संजय दत्तचा रोल करायची ईच्छा करणे हे सुद्धा काईच्याकाईच आहे.
आमीरच्या अभिनयाच्या उंचीबाबत शंका नाही. पण शारीरीक उंचीचा विचार करता त्याला संजय दत्त दिसायला वीएफएक्स वापरावे लागले असते. त्यासाठी शाहरूखची मदत लागली असती. आणि उगाच धाग्यात शाहरूख आला असता... बरं झालं नकोच ते !
{{{ पण शारीरीक उंचीचा विचार
{{{ पण शारीरीक उंचीचा विचार करता त्याला संजय दत्त दिसायला वीएफएक्स वापरावे लागले असते. त्यासाठी शाहरूखची मदत लागली असती. आणि उगाच धाग्यात शाहरूख आला असता... बरं झालं नकोच ते !
Submitted by भन्नाट भास्कर on 27 June, 2018 - 17:37 }}}
शाहरुखची मदत का? रेड चिलीज शिवाय दुसरीकडे वीएफएक्स केले जात नाही का?
Pages