रेस

Submitted by कटप्पा on 20 June, 2018 - 22:10

आजचीच ताजी गोष्ट आहे. ऑफिस मधून निघालो आणि घरी जायला लोकल रोड ऐवजी I90 पकडला.
साधारण 4 माईल्स झाले असतील एकदम ट्राफिक स्लो झाले. मग सुरू झाला लेन्स बदलण्याचा खेळ.
अशा वेळी नेमके ज्या लेन मध्ये आपण तीच लेन अडकते, बाकी लेन्स मूव्ह व्हायला लागतात.
पण त्या दिवशी माझी लेन स्मूथ निघू लागली होती.
अचानक एक मर्क माझ्या साईडच्या लेन मधून माझ्या समोर घुसली. मी चरफडलो की साला आपण 2 सेकंद उशीर केला अक्सीलिरेटर दाबायला.
यानंतर सुरू झाली एक रेस. मी लेन बदलणे आणि त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करणे आणि त्याने मला पुढे येऊ न देणे.
जवळजवळ 15-20 मिनिटे त्या स्लो मुविंग ट्राफिक मध्ये मी प्रयत्नांची शर्थ करत होतो पण ती मर्सिडीज पुढेच. आता तर ती 4 ते 5 गाडी पुढे होती.
अचानक बॉस चा फोन आला हाफीसातून. एका एस्टीमेशन बद्धल त्याला काही प्रश्न होते. स्क्रीन शिवाय ते नंबर्स आठवून त्याला समजावणे मला अवघड जात होते. साधारण 10 मिनिटे त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी फोन ठेवला. आणि आठवले आपली मर्सिडीज बरोबरची रेस, आता फोकस हलला या कॉल मध्ये, आता हरवू त्याला. तो कुठे आहे याचा अंदाज घेण्यासाठी मी पुढे शोधू लागलो, मला दिसेना कुठेच.
अचानक रेयर व्यु आरशात पाहिले, तर ती मर्सिडीज माझ्या 3 गाडी मागे होता साईड च्या लेन मध्ये !!!!!!

Group content visibility: 
Use group defaults