शाहरूखचा चित्रपट चालो न चालो. पण त्याच्या नवीन चित्रपटाच्या ट्रेलरवर लोकं नेहमीच तुटून पडतात.
ईदच्या मुहुर्तावर त्याने आपल्या आगामी चित्रपट झिरोचा टीजर रीलीज केला आणि चोवीस तासांच्या आत दोन करोडपेक्षा जास्त लोकांनी तो बघायचा विक्रम केला.
जर तुम्ही त्या दोन करोड लोकांमध्ये नसाल तर तुमच्यासाठी खाली लिंक देतो.
टीजर यूट्यूब ट्रेंडींगमध्ये फूटबॉल वर्ल्डकपला दुसर्या क्रमांकावर सारत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ही भारतीय चित्रपटप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे _/\_
#1 ON TRENDING
Zero | Eid Teaser | Shah Rukh Khan | Salman Khan | Aanand L Rai | 21 Dec 2018
https://www.youtube.com/watch?v=89aTDByJTz4
मला कमी जास्त आवडलेल्या गोष्टी
१) टीजरमधील शाहरूखची एंट्री. बॉलीवूडच्या ईतिहासात आजवर बुटक्यांचा वापर केवळ विनोदनिर्मितीसाठीच केला गेला आहे. पण झिरो मध्ये मेन हिरो खुद्द शाहरूख खान एका बुटक्याची भुमिका करत आहे हे बघूनच थक्क व्हायला होते. त्याच्या या प्रयोगासाठी त्याला त्रिवार हॅटसऑफ !!!
२) टीजर असा असावा की चित्रपटाच्या कथेची पुरेशी कल्पना न देता उत्कंठा वाढवावी. शाहरूखला बुटके बघून हा उद्देश साध्य होतो.
३) टीजरमध्ये जो एक छोटासा म्युजिकचा तुकडा आहे त्यावरून चित्रपटाचे संगीत चांगले असावे असे सध्या तरी वाटते.
४) शाहरूखसोबत यात सलमान दिसतो. दोघांना एकत्र बघणे चाहत्यांसाठी पर्वणी असते. शाहरूखला सलमानसमोर बुटके बघणे अजून मजेशीर वाटते. सलमान जर टीजरपुरता नसून यात पाहुणा कलाकार असेल तर आणखी मजा आहे.
५) बुटक्या व्यक्तींच्या नाचात एक टिपिकल उत्साह एक अतरंगीपणा असतो. शाहरूखने ती बॉडी लॅंगवेज नेमकी पकडल्यासारखे वाटतेय. त्यामुळे पुर्ण चित्रपटभर त्याने काय धमाल केली असेल हे बघायची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे. कारण शाहरूख म्हणजे सळसळत्या चैतन्याचा झरा आहे ..
६) चित्रपटात शाहरूखसोबत अनुष्का आणि कतरीना कैफ अश्या टॉपच्या दोन लोकप्रिय अभिनेत्री आहेत. पण ते या टीजरमध्ये कुठेही नव्हत्या. त्यामुळे आता पुढच्या ट्रेलरची वाट तितक्याच उत्सुकतेने बघितली जाईल.
७) शाहरूखचा झिरो धो धो चालला तर बुटक्या व्यक्तींना नक्कीच एक ग्लॅमर येईल. कित्येकांना शाहरूख म्हणून हाक मारली जाईल. कित्येकांच्या मनातील न्यूनगंड निघून जाईल. ईन्शाल्लाह असेच व्हावे. टीजरला लोकांनी डोक्यावर उचलून धरले आहेच.
मात्र या सगळ्यात एकच गोष्ट खटकली. चित्रपट डिसेंबरला प्रदर्शित होतोय. आणि टीजर आताच रीलीज करून उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. त्यामुळे पिक्चर रीलीज व्हायच्या आधी मी मरून तर नाही ना जाणार ही भिती सतावू लागली आहे
व्हिलन किंवा लव्हरबॉय या दोन
व्हिलन किंवा लव्हरबॉय या दोन गोष्टी सोडल्या आणि स्वदेस हा अपवाद सोडला तर जन्मभर त्याने काय केल आहे हे सांगू शकाल काय?
>>>>
आजच हा प्रश्न धडक (हिंदी सैराट) धाग्यावर आलेला. शाहरूखने जन्मभर काय केले आहे याची बरीच लिस्ट निघेल. तुर्तास उत्तरादाखल हे ट्रेलर बघणे पुरेसे आहे. शुभरात्री, शब्बाखैर, खुदाहाफिज
नवीन आयडी का? या प्रश्नाचे
नवीन आयडी का? या प्रश्नाचे उत्तर डिपी पाहून मिळाले.
साधासुधा लव्हर बाॅयचा डिपी लावलेला ऋ ( xxx /xxxxx/xxx अजून किती नावे घेऊ?) "रईस" जादा होऊन आता काठी घेऊन राडा घालायला आलेला दिसतोय.
पण एकंदरीत सुंभ जळाला तरी पिळ गेला नाहीये.
कोणीतरी "बॅटरी" म्हणालेले दिसतेय त्याला.
शाहरूख खान कोण ? कुणी माहिती
शाहरूख खान कोण ? कुणी माहिती देईल का ?
अप्पु राजा vs ० का? आणि काय
अप्पु राजा vs ० का? आणि काय खटकले साठी वेगळा धागा का?
वाहता धागाय का?
वाहता धागाय का?
"रईस" जादा होऊन आता काठी घेऊन
"रईस" जादा होऊन आता काठी घेऊन राडा घालायला आलेला दिसतोय. >>>>>>> धूरवाला आहे ओ तो
<<<
<<<
मेन हिरो खुद्द शाहरूख खान एका बुटक्याची भुमिका करत आहे हे बघूनच थक्क व्हायला होते. त्याच्या या प्रयोगासाठी त्याला त्रिवार हॅटसऑफ !!! >>>
माझ्या माहितीत कमल हासनने बुटक्याचा रोल आधीच यशस्वीपणे केला आहे. हा काही नवीन प्रयोग नाही.
धूरवाला आहे ओ तो >
धूरवाला आहे ओ तो >
कमल हासनने बुटक्याचा रोल.....
कमल हासनने बुटक्याचा रोल.....
>>>>
तो एक टिपिकल राम और श्याम टाईप चित्रपट होता. बुटक्याने वा कमी शक्तीच्या माणसाने कल्पकतेने केलेले मर्डर याव्यतीरीक्त बुटक्याला केंद्रस्थानी ठेवून असे काही नव्हते. बुटका दाखवला नसता तरी चालले असते. आणि सोबत राजाही होताच हिरोईनसोबत अर्धी स्क्रीन खायला.
पण ईथे बुटक्या हिरोलाच केंद्रस्थानी ठेवले आहे. ते सुद्धा शाहरूख असल्याने तो एकेक फ्रेम पुर्ण स्क्रीन व्यापून उरणार हे नक्की.
शाहरूख खान कोण ? कुणी माहिती
शाहरूख खान कोण ? कुणी माहिती देईल का ?
>>>>
हा धागा वाचत राहा....
काय खटकले साठी वेगळा धागा का?
>>>>
काहीच खटकले नाही. काही खटकण्यासारखे नाहीये यात. उगाच का मग रिकामा धागा काढा?
वाहता धागाय का?
>>>
नाहीतर... झालाय का चुकून.. मी कधीच वाहता धागा काढत नाही.
हा धागा वाचत राहा >>> कळवा मग
हा धागा वाचत राहा >>> कळवा मग तसा प्रतिसाद आला की. नवीन असल्याने इथल्या ब-याच बार्बी माहीत नाहीत.
नवीन असल्याने इथल्या ब-याच
नवीन असल्याने इथल्या ब-याच बार्बी माहीत नाहीत. >>> तुम्हाला बाबी म्हणायच आहे का?
बादवे, भन्नाट भास्कर हि ऋ ची नवीन आयडी आहे का?
बादवे, भन्नाट भास्कर हि ऋ ची
बादवे, भन्नाट भास्कर हि ऋ ची नवीन आयडी आहे का?>>> रु चा नविन ड्युआयडी आहे.
ऋ हा माझा ड्यू आयडी होता
ऋ हा माझा ड्यू आयडी होता
त्याचा अवतार संपला. आणि मी ओरिजिनल आलो.
ईथे दिले आहे हे...
https://www.maayboli.com/node/66381
अरे काय argument? नवीन आयडी
अरे काय argument? नवीन आयडी काढून म्हणे जुना डुप्लिकेट आणि हा नवीन ओरिजिनल?
च्रप्स हा विषय ईथे नको
च्रप्स हा विषय ईथे नको
लिंक दिलेला धागा त्यासाठीच आहे.
शाहरूखच्या धाग्यात अवांतर पोस्ट मला नाही आवडत.
शाहरुख खान आणि अनुष्का आणि
शाहरुख खान आणि अनुष्का आणि कॅटरीना कैफ ह एक भयंकर कॉम्बो आहे. ह्या त्रयीचा एक भयचकीत चित्रपट आला होता.
अप्पु राजा इन्सपायर्ड असावा सिनेमा.
अतिशय बंडल डिसअपॉईण्टिंग टीजर
अतिशय बंडल डिसअपॉईण्टिंग टीजर. फोफसा सल्लू अगदीच नीरस वाटला. शाहरुखला बुटका दाखवण्यासाठी वापरलेले व्हीएफएक्स फार ग्रेट वाटले नाहीत. 'इफेक्ट' आहे हे समजून आलं.
म्युझिककडून अपेक्षा आहेत कारण अजय-अतुल आहेत.
@उपाशी बोकातः>> सहमत
@उपाशी बोका ::>> सहमत
मला शाहरुख विनीत भोन्डे (चला
मला शाहरुख विनीत भोन्डे (चला हवा येउ द्या आणि मराठि बिग बॉस ) सारखा दिसला/वाटला.
बेकार ट्रेलर. शाहरुख ला
बेकार ट्रेलर. शाहरुख ला बुटका दिसण्यासाठी वापरलेले स्पे.इफेक्ट गंडले आहेत. बुटके लोक असतात ते थोडे डिसप्रपोर्शनेट असतात, डोके आणि हात जरा मोठे दिसतात इतर लहान शरीराच्या मानाने. तसे न करता आहे त्याच शाहरुख ला नुस्ते आप्ले लहान साइज मधे दाखवल्याने विचित्र वाटत आहे भयंकर. त्यात तो सलमान सोबत. सर्वच अनप्लेजन्ट झाले एक मिनिटातच. फ्लॉप जाणार असे वाटतेय.
अजय अतुल आहेत का म्युजिकला ..
अजय अतुल आहेत का म्युजिकला .. ग्रेट !
मी तर वाटच बघत होतो या कॉम्बोची.. अजय-अतुल आणि शाहरूख !
बाकी हा ट्रेलर नसून टीझर आहे. एक नुसती झलक. लोकांपर्यंत चित्रपटाची हवा पोहोचवायला. याच कारणासाठी सलमान नावाचा ब्रांड वापरला आहे. यूट्यूब ट्रेंड पाहता यात यशही आलेले दिसतेय. अनप्लेजंटला हे यश मिळाले नसते असे मला वाटते.
पिक्चर चालेल का नाही हे एवढ्यात सांगता येणार नाही. सारे पटकथा आणि दिग्दर्शकावर आहे. सलमानचे बरेचदा फालतू चित्रपटही चालतात. कारण त्याचे अंध चाहते. शाहरूखबाबत मात्र चित्रपटात दम असेल तरच तो चालतो. कारण त्याचे डोळस आणि विचारी चाहते.
प्रपोर्शनेट बॉडीचा मुद्दा पटणेबल आहे. पण शाहरूख छान दिसणेही गरजेचे आहे
आजिबात आवडला नाहीये ट्रेलर.
आजिबात आवडला नाहीये ट्रेलर. एक नंबर फ्लॉप ट्रेलर आहे.
बुटक्या माण्साचा गेटप आजिबात्च जमला नाहीये.
सलमान पण जबरदस्तीने करतोय असं वाटतंय. जी एनर्जी त्याच्या स्वतःच्या(सलमानच्या) गाण्यांमधे असते ती आजिबातच नाहीये.
मला तर मै तेरा हाय रे जबरा होय रे जबरा चित्रपटाचं जे झालं तसंच काहीसं वाटतंय.
अंध भक्त वाचुन मोडी आले की
अंध भक्त वाचुन मोडी आले की काय धाग्यावर असं वाटलं.
सलमानचा वापर करावा लागला ह्यातच सगळं आलं ना भौ.
पण शाहरूख छान दिसणेही गरजेचे आहे>>>>>> पण तो आजिबातच दिसत नाहीये.
सलमानचे बरेचदा फालतू
सलमानचे बरेचदा फालतू चित्रपटही चालतात. कारण त्याचे अंध चाहते. शाहरूखबाबत मात्र चित्रपटात दम असेल तरच तो चालतो. कारण त्याचे डोळस आणि विचारी चाहते. >>>>

मी ट्रेलर नाही पाहिला, अन बघणार ही नाही, पण हे वरचे वाक्य वाचुन अगदीच रहावले नाही, वाट लागली हसुन .
बाकी चालु द्या.
तो एक टिपिकल राम और श्याम
तो एक टिपिकल राम और श्याम टाईप चित्रपट होता. बुटक्याने वा कमी शक्तीच्या माणसाने कल्पकतेने केलेले मर्डर याव्यतीरीक्त बुटक्याला केंद्रस्थानी ठेवून असे काही नव्हते. >>>>> +++११११ अप्पू राजामध्ये खलनायकामुळे अप्पू बुटका होतो. बर तो वडिलान्च्या खुनाचा बदला खलनायकान्कडून घेत नाही, तर आपण बुटके हयान्च्यामुळे (खलनायक) झालो म्हणून त्यान्चा बदला घेतो.
"शाहरूखच्या धाग्यात अवांतर
"शाहरूखच्या धाग्यात अवांतर पोस्ट मला नाही आवडत." - Good intentions. हे औचित्य बाकीच्या धाग्यात सुद्धा पाळायला हरकत नाही.
बुटके लोक असतात ते थोडे
बुटके लोक असतात ते थोडे डिसप्रपोर्शनेट असतात, डोके आणि हात जरा मोठे दिसतात इतर लहान शरीराच्या मानाने. << एक्झाकट्ली.
अप्पुराजा मधे ते बरोबर दाखवल होतं. आता ह्या "लेटेस्ट" टेक्निक मुळे सगळेच गंडले आहे.
(No subject)
धाग्यावरील महत्वाचे विचार:
धाग्यावरील महत्वाचे विचार: इतर बाकी काही वाचले नाही तरी चालेल.
>>> शाहरूखचा चित्रपट चालो न चालो. पण त्याच्या नवीन चित्रपटाच्या ट्रेलरवर लोकं नेहमीच तुटून पडतात.
>>> शाहरूख खान एका बुटक्याची भुमिका करत आहे हे बघूनच थक्क व्हायला होते.
>>> शाहरूख म्हणजे सळसळत्या चैतन्याचा झरा आहे.
>>> ईथे बुटक्या हिरोलाच केंद्रस्थानी ठेवले आहे. ते सुद्धा शाहरूख असल्याने तो एकेक फ्रेम पुर्ण स्क्रीन व्यापून उरणार हे नक्की.
>>> शाहरूखच्या धाग्यात अवांतर पोस्ट मला आवडत नाही.
>>> सलमानचे बरेचदा फालतू चित्रपटही चालतात. कारण त्याचे अंध चाहते. शाहरूखबाबत मात्र चित्रपटात दम असेल तरच तो चालतो. कारण त्याचे डोळस आणि विचारी चाहते.
>>> शाहरूख छान दिसणेही गरजेचे आहे.
Pages