जवळपास ४ वर्षे होत आली ......
माझ्या ऋन्मेऽऽष या आयडीला !
गेले तीन महिने हळू हळू करत हळू हळू ईथे येण्याचा वेळ कमी होत गेला. धाग्यांचा रतीब केव्हाच आटला, पण प्रतिसाद द्यायला आणि मुख्यत्वे त्यातून पुढे होणारी चर्चा, वाद यांचा पाठपुरावा करायलाही हवे तेव्हा वेळ मिळणे अवघड झाले तेव्हा ऋन्मेऽऽषला कायमचे थांबवून आपल्या वर्जिनल आयडीने जे काही थोडेबहुत शक्य होईल तसे वावरावे असे ठरवले आहे.
ऋन्मेषचा पासवर्ड विस्मरणात टाकला आहे. त्याबद्दल केलेल्या विचारपूशीला आता ईथूनच उत्तरे दिली जातील. म्हटलं तर फक्त नाव बदलले आहे, म्हटले तर काही संदर्भ बदलले आहेत. ईच्छा तर खूप होतेय की या तीनचार वर्षांतील प्रवास कागदावर उतरवून काढावा. पण ईतके प्रवासवर्णन लिहावे ईतका वेळ हाताशी मिळणे अवघड झालेय. पण तरीही थोडक्यात आणि एका स्वतंत्र धाग्यात मनोगत लिहायचा मोह आवरत नाहीयेच. काय करणार, शेवटी मी ऋन्मेषच आहे
जेव्हा मी ऑर्कुटच्या निमित्ताने सोशलसाईटवर अवतरलो तेव्हा ऋन्मेषपेक्षाही छोटा होतो. साधी गर्लफ्रेंडही नव्हती. ती ऑर्कुटवरच मिळाली. पण त्या आधी मी एक शॉर्टटेंपर, शीघ्रकोपी, थोडासा हट्टी आणि थोडासा चिडका व्यक्तीमत्व होतो. जेव्हा ऑर्कुटवर कॉलेजच्या सळसळत्या उत्साहात बागडायचो तेव्हा अगदी तसाच वागायचो. ठोश्याला ठोसा, एखादा डोक्यात गेला की त्याला अद्दल घडवायला मग काय पण.. वाद, भांडण, ऑनलाईन शाब्दिक मारामारया. अर्थात माझ्यामते मी अन्यायाविरुद्ध भांडणारा रॉबीनहूड होतो. पुढे कधीतरी याच विचारांनी एका समूहाच्या संचालकांविरुद्ध बंडखोरी केली आणि समूहातून बॅन झालो. तेव्हा पहिल्यांदा ड्यूआयडी काढले, आणि पुन्हा आत प्रवेश मिळवला. बरेच दंगेधोपे झाले, आत्मा शांत झाला. मजाही आली, पण दुसर्याला त्रास देताना आपल्यालाही त्रास होतो हे जाणवले. हा त्रास टाळणे आपल्याच हातात असते हे समजले. सोशलसाईटवर आपले उपद्रवमूल्य फार आहे हा माज हळूहळू मीच स्वहस्ते गाळून टाकला. आणि आपले मनोरंजनमूल्य जपायला सुरुवात केली. याच बदलाच्या काळात माझे एक फेक प्रोफाईल फार फेमस आणि बरेच जणांचे लाडके झाले. पुढे तो मीच आहे हे समजूनही त्या प्रेमात काही फरक पडला नाही. वाल्या आणि वाल्मिकी दोन्ही कमीजास्त प्रमाणात आपल्याच आत असतात. कोणाला गोंजारायचे हे आपल्यालाच ठरवायचे असते हे मला समजले. आणि माझ्यापुरते मी ते ठरवायला सुरुवात केली.
पुढे कॉलेज झाले. जॉबला लागलो. गर्लफ्रेंडशीच लग्नही झाले. ऑर्कुट केव्हाच आटोपले होते. पण ऑर्कुटसमूहांवर काढलेले धागे आणि त्यात केलेली धमालमस्ती फार मिस करत होतो. मायबोली पाहिली आणि ईथे पुन्हा तीच धमाल त्याच रुपात करायचा मोह झाला आणि ऋन्मेषचा जन्म झाला.
अर्थात हे रूप माझेच होते. म्हटलं तर फक्त एक नाव बदलले होते, दुसरे रिलेशनशिप स्टेटस. तसेच त्याला अनुसरून वय पाच सहा वर्षे कमी केले होते ईतकेच. बाकी सारे संदर्भ तेच, आवडीनिवडी त्याच, आचारविचार अगदी ओरीजिनलच. शाळाकॉलेजचे किस्से माझ्याच शाळाकॉलेजचे होते. ऑफिसचे किस्सेही माझ्याच ऑफिसचे होते. गर्लफ्रेंड म्हटले की आताची बायको आणि आधीची गर्लफ्रेंडच डोळ्यासमोर यायची, शेजारचा पिंट्याही आपला खासच आहे. सई-स्वप्निल आणि आपला शाहरूख तर अगदी लहानपणापासून आवडीचा. कोकणातले गाव असो, मुंबईतली घरे असो. राजकारणावरची मते असोत, वा नास्तिक वृत्ती असो. दारूला विरोध असो, वा मांसाहाराला समर्थन असो. ईंग्रजी भाषेचे अज्ञान असो वा स्वत:वरचे प्रचंड प्रेम असो यात कुठलाही मुखवटा नसल्याने कुठेही वेगळ्या रुपात वावरतोय असे कधीच वाटले नाही, वा कुठे बेअरींग सुटत तर नाही ना याची काळजी घ्यावी लागली नाही.
पण सोशलसाईटने मला एक फार मोठी गोष्ट शिकवली, जी मायबोलीने आणखी पुढे नेली. ते म्हणजे संयम आणि समजूतदारपणा.
कोणाशीही वाद घालताना संयम आणि पातळी सोडू नये हे ऑर्कुटकाळातच शिकलो होतो. मायबोलीवर एक पाऊल पुढे जात, समोरची व्यक्ती आपल्याशी भांडते म्हणून ती व्यक्तीच वाईट असते असे जरूरी नाही असा विचार करू लागलो. काळ्यापांढरय़ा गुणदोषांसह प्रत्येक व्यक्तीला माझे निकष न लावता स्वतंत्रपणे स्विकारू लागलो आणि त्यानंतर कोणाबद्दलही रागलोभद्वेषमत्सर वगैरे काही उरले नाही. सोशलसाईटवरची हीच शिकवण प्रत्यक्ष आयुष्यात घेऊन गेलो. आणि आयुष्य आणखी सुखी समाधानी झाले. स्वत:तील या बदलासाठी जसे ऑर्कुटवरील फेक प्रोफाईल्सनी मला मदत केली तसेच मायबोलीवरील ऋन्मेष या ड्यूआयडीनेही मदत केली. याबद्दल मी ऋन्मेष आणि त्याला सांभाळून घेतलेल्या सर्वांचा, तसेच मायबोली संकेतस्थळाचाही आभारी आहे _/\_
ता.क. - ऋन्मेष तर ईथून थांबेल ते त्या बिचार्याला गरजेचा वेळ देऊ शकत नाही म्हणून, पण तोच पाच सहा वर्षांनी मोठा होत आता भन्नाट भास्कर या ओरीजिनल (कोई शक?) आयडीने जमेल तितका आपला प्रपंच सांभाळत वावरेल. काय करणार, मायबोलीचे व्यसन सहजी सुटत नाही
धन्यवाद,
आपलाच भन्नाट
आडनाव नका विचारू, त्याने जात कळते !
ऋन्मेष म्हणजे तुम्हीच हा
ऋन्मेष म्हणजे तुम्हीच हा अंदाज खरा ठरला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण मग तुमचा अभिषेक म्हणजे ऋन्मेष नाही का?
हे कोण आहे?
हे कोण आहे?
https://www.facebook.com/people/Runmesh-Thakur/100008441297955
सद्गुणांची खाणच आहात तुम्ही.
सद्गुणांची खाणच आहात तुम्ही. शिवाय खरेखुरे सांगून टाकले म्हणजे प्रांजळ पारदर्शी आहात.
हे भारीय !
तोटल किती ड्यूआय आहेत हेही एका दमात सांगून टाकाल..
मग त्या ऋ च्या चाहत्यांचं काय
मग त्या ऋ च्या चाहत्यांचं काय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तेच जे मोदींच्या चाहत्यांचे,
तेच जे मोदींच्या चाहत्यांचे,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
प्रतिमेच्या प्रेमात पडल्यावर काय होणार
तेच जे मोदींच्या चाहत्यांचे,
तेच जे मोदींच्या चाहत्यांचे,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
प्रतिमेच्या प्रेमात पडल्यावर काय होणार
रूनमेश आयडी ने एक खळबळ माजवली
रूनमेश आयडी ने एक खळबळ माजवली होती.. फेक का असेना पण जे लेख तुम्ही लिहिले बऱ्याच लोकांना खरे वाटले, शांत प्रतिसाद टाकून लोकांना चिडवणे आणि चिडलेल्याना संयमित उत्तरे देणे.. याबद्धल तुम्हाला मानाचा मुजरा !
ऋन्मेष आयडी ने एक खळबळ माजवली
ऋन्मेष आयडी ने एक खळबळ माजवली होती.. फेक का असेना पण जे लेख तुम्ही लिहिले बऱ्याच लोकांना खरे वाटले, शांत प्रतिसाद टाकून लोकांना चिडवणे आणि चिडलेल्याना संयमित उत्तरे देणे.. याबद्धल तुम्हाला मानाचा मुजरा !<<<++१११
ऋन्मेष म्हणजे तुम्हीच हा
ऋन्मेष म्हणजे तुम्हीच हा अंदाज खरा ठरला >>+१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला अजुनही असे वाटते कि तुमचा अभिषेक म्हणजे सुद्धा ऋन्मेष
कोणाशीही वाद घालताना संयम आणि पातळी सोडू नये>>हे मात्र बरोबर जमले तुम्हाला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मागे तब्येत डाऊन आहे म्हणून संगणकापासून लांब आहेस असे सांगितले होतेस. आता तब्येतीची काही तक्रार नाही ना?
ऋन्मेषची बडबड मिस करणार आता .
ऋन्मेषची बडबड मिस करणार आता ..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बा द वे , हा आयडी तरी खरा आहे का
प्रतिसाद वाचले. भूतबंगल्ल्यात
प्रतिसाद वाचले. भूतबंगल्ल्यात आल्यासारखे वाटतेय आता
प्रतिसाद वाचले. भूतबंगल्ल्यात
प्रतिसाद वाचले. भूतबंगल्ल्यात आल्यासारखे वाटतेय आता
प्रतिसाद वाचले. भूतबंगल्ल्यात
प्रतिसाद वाचले. भूतबंगल्ल्यात आल्यासारखे वाटतेय आता
प्रतिसाद वाचले. भूतबंगल्ल्यात
प्रतिसाद वाचले. भूतबंगल्ल्यात आल्यासारखे वाटतेय आता
{शांत प्रतिसाद टाकून लोकांना
{शांत प्रतिसाद टाकून लोकांना चिडवणे आणि चिडलेल्याना संयमित उत्तरे देणे.. याबद्धल तुम्हाला मानाचा मुजरा !}
धन्य आहेत लोक.
मी म्हटलेले मानदुबाचे लॉयल प्रेक्षक.
(No subject)
आता फक्त ऋदादा ऐवजी भन्नाट
आता फक्त ऋदादा ऐवजी भन्नाट दादा म्हणणार....
..... "नावात काय आहे"
....फक्त तब्येत कशी आहे आता ते सांग भन्नाटदादा..... आणि आजार संपल्यावर त्यातून वाचलास तर त्यावरच धागा काढेन असं म्हणालेलास....तो आजार हाच तर नव्हे ना
... गंमत केली रागावू नकोस.... माझ्या आवडत्या शाहरूखचा तो डीपी मिसणार ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
माझ्यासाठी एवढाच काय तो बदल
भन्नाट आहेस मित्रा! शाखा कसा
भन्नाट आहेस मित्रा! शाखा कसा आहे?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>धन्य आहेत लोक.>> +१
>>धन्य आहेत लोक.>> +१
वर्जिनल आयडी तर हा नव्हताच. दुसरा नाही का तो बालखोड्यांची डायरी लिहायचा?
आयडी नवीन आले तरी वृत्ती बदलत नसते. पहा बरं मायबोलीवरचे खंडीभर डु आयडी. तेव्हा लगे रहो. ऋन्मेष या आयडीचं कौतुक करणारे रेग्युलर ‘कष्टमर’ होतेच ते आता इथे येऊन करतील.
कस्टमर पोर्टेबिलिटी प्लॅन आहे
कस्टमर पोर्टेबिलिटी प्लॅन आहे हा धागा म्हणजे.
गेले तीन महिने हळू हळू करत
गेले तीन महिने हळू हळू करत हळू हळू ईथे येण्याचा वेळ कमी होत गेला. धाग्यांचा रतीब केव्हाच आटला >>>> आमच्यासारख्यांना साम्गितले नसते तर हे लक्षातही आले नसते हो. पण फॅन क्लब? शेम ऑन यू!! नोबडी मिस्ड ऋन्मेष ? दुसर्या आयडीने येऊन अहो आपला ऋन्मेष गेला हो असे म्हणेपर्यन्त कुणाला तो नाही हेही कळू नये? परत ये रे लिही रे असे गळे प़ण काढायचे सुचू नये ? कमाल आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
नेमके काय चालू आहे ? ओरिजिनल
नेमके काय चालू आहे ? ओरिजिनल आयडी काय, ड्युआयडी काय, फोन क्लब काय.
ड्युआयडी म्हणजे काय असतं ?
गेले तीन महिने हळू हळू करत
गेले तीन महिने हळू हळू करत हळू हळू ईथे येण्याचा वेळ कमी होत गेला. धाग्यांचा रतीब केव्हाच आटला >>>> आमच्यासारख्यांना साम्गितले नसते तर हे लक्षातही आले नसते हो. पण फॅन क्लब? शेम ऑन यू!! नोबडी मिस्ड ऋन्मेष ? दुसर्या आयडीने येऊन अहो आपला ऋन्मेष गेला हो असे म्हणेपर्यन्त कुणाला तो नाही हेही कळू नये? परत ये रे लिही रे असे गळे प़ण काढायचे सुचू नये ? कमाल आहे! Happy -. +11111111111
अगदी मनातले
गौप्यस्फोट भारी होता.
गौप्यस्फोट भारी होता. ऋन्मेषदाला मिसणार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नवीन आयडी का ते कळले नाही.
नवीन आयडी का ते कळले नाही. रुन्मेष ह्या आयडीनेच (किंवा अभिषेक ह्या सुद्धा) जमेल तेव्हा माबो वर आला असतास तरी चालल असत की. माबो वर असे कितीतरी आयडीज आहेत जे जमत असेल तस माबो वर येत राहातात. एनीवेज हु केअर्स....
ऋन्मेष म्हणजे तुम्हीच हा
ऋन्मेष म्हणजे तुम्हीच हा अंदाज खरा ठरला Happy![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>
वावे, खरे तर यात अंदाज बांधण्यासारखे विशेष काही नव्हते. तीच शैली, तेच विचार, तेच संदर्भ, काही न लपवताच वावरत होतो. काही लोकांना लवकर समजले तर काहींना उशीरा, तर काहींना आज ना उद्या समजले असतेच. पण उगाच ते काहीतरी रहस्य पकडल्यासारखी कुजबूज माझ्या प्रत्येक पोस्टीनंतर जाणवू लागली म्हणून मग म्हटले थांबवून टाकूया ही गॉसिपिंग. आधी बरे वाटायचे लोकं आपल्याबद्दल कुजबूजतात हे, मी ते टीआरपीच्या दृष्टीकोनातून बघायचो. पण आता मलाच ते एंजॉय करायला पुरेसा वेळ मिळणार नसेल तर उगाच कुजबुजणार्यांनाच एकटे एकटे ते सुख का उपभोगू द्यावे या मत्सरी विचारातून स्वतंत्र धागा काढून हे घोषितच केले
पण मग तुमचा अभिषेक म्हणजे ऋन्मेष नाही का? Wink
)
>>>>>
मी आजही अश्या प्रश्नांना उत्तरे देत नाही !
( "मै आज भी फेके हुए पैसे..." स्टाईलमध्ये वाचावे
हे कोण आहे?https://www
हे कोण आहे?
https://www.facebook.com/people/Runmesh-Thakur/100008441297955
>>>
अतुलभाऊ ते मीच आहे. पण कधीच वापरले नाही. मी नवीन असताना लोकं मला फेसबूकवर शोधायचे म्हणून गंमतीच्या हेतूने एक प्रोफाईल बनवून ठेवलेले. आज तर त्याचा पासवर्डही विसरलो आहे.
मग त्या ऋ च्या चाहत्यांचं काय
मग त्या ऋ च्या चाहत्यांचं काय? Happy![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>
हो भावना, याबद्दल दिलगीर आहे
पण मग फेरविचार करू म्हणता. फार काही नाही, ऋन्मेष हा खरा असून भन्नाट भास्कर हा त्याचा ड्यू आय आहे अशी पलटी खावी लागेल बस्स
जोक्स द अपार्ट, ऋन्मेषला त्याच्या धाग्यांसाठी ज्यांनी चाहत्यांच्या लिस्टमध्ये टॅग केलेले त्यांच्यासाठी जर आधीसारखेच वेळ काढून लिखाण करू शकत नसेल तर तिथेच ऋन्मेष असून नसल्यासारखा झाला ना ..
Pages