मायबोलीवर मी लेख , कथा , कविता लिहायला लागलो त्याला १० वर्षे झाली. २००८ /२००९ ला इंटरनेट ब्राॕड बॕंड द्वारा काॕंप्युटरला जोडलेले असायचे.
एखादी कथा रात्री ११ वाजता लिहायची. तेंव्हा कथेचे शौकीन झोपलेले असायचे. सकाळी ७-४५ ला घराच्या बाहेर पडण्या आधी एकदा प्रतिसाद पहायचे. परदेशातील एखादा दुसरा मायबोलीकर ने कथा वाचलेली असायची. बरेच वेळा ती कथा जसा मृतात्मा आणि नातेवाईक कावळा शिवायची वाट पहात असतात तसा मी आणि ती कथा वाचकांची वाट पहात असायचो.
सकाळी ७-४५ला घरातून निघाल्यावर घरात ब्राॕड बॕंड सुरू असला तरी स्मार्ट फोन, मोबाईल इंटरनेट नसल्यामुळे मायबोली, कथा प्रवासात कनेक्शन नसायचे.
१ तासाच्या PMPML प्रवासात कथेला प्रतिसाद मिळावेत यासाठी रिक्षा कुठे कुठे फिरवावी याचे विचार सुरू असायचे.
आॕफिसला पोहोचल्यावर लगेचच मी आॕफिसचा इंटरनेट सर्व्हर चालू करायचो. गरज ही इंटरनेट शिकायचीच नाही तर IT मधले नवनवीन फंडे शिकून वापरायला भाग पाडत होती.
कथा लिहणे ही उर्मी होती पण प्रिंट मिडीयात ते छापून आणण्यासाठी करावा लागणारा सोपस्कार किंवा लेखन न छापता परत आले यामुळे येणारी निराशा यापासून मायबोली खुपच दूर असल्याने मी काही काळ वहावलो आणि प्रतिसाद वाचून सुखावलो सुध्दा .
माझ्या भूतकथांना खुप प्रतिसाद मिळाले. सुर्यकिरण, चिमुरी, अजून एक दोन मित्र मिळाले.
आज आपली मायबोली अॕपवाली मायबोली झाल्याचे सकाळीच चुकून वाचले.
प्रवासात, सिनेमाच्या ब्रेकात, दुरदर्शन पहाताना आता मायबोलणे अजून सहज घडणार आहे यासाठी प्रशासकांना व संयोजकांना मुजरा.
अॕडमीनजी, सवय न राहिल्यामुळे
अॕडमीनजी, सवय न राहिल्यामुळे हे लेखन ज्योतिष विभागात पडलय. तेव्हडे योग्य ठिकाणी सरकवा.