Submitted by Santosh555 on 7 June, 2018 - 16:04
अंगावर चरबीच्या गाठी उठत आहेत कशामुळे ?? उपाय सांगा??
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अंगावर चरबीच्या गाठी उठत आहेत कशामुळे ?? उपाय सांगा??
कोल्लापुरात डाग्दर न्हाईत का?
कोल्लापुरात डाग्दर न्हाईत का?
डायट चेंज करून बघा.. नो शुगर
डायट चेंज करून बघा.. नो शुगर ..लेस कर्ब्स, हाय प्रोटीन.
माझा फालतू सल्ला .. मी या विषयातील तज्ञ किंवा डॉक्टर नाही.
माझा नवरा, दीर, सासूबाई
माझा नवरा, दीर, सासूबाई यांच्या अंगावर आहेत. अनुवांशिक आहेत. डॉक्टर म्हणाले काही आजारांवर औषध नसते.
तुमच्या घरात बघा, history पहा. अनुवांशिक नसेल तर होईल इलाज, चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्या.
तुम्ही डॉक्टर गाठला असेलच असे
तुम्ही डॉक्टर गाठला असेलच असे मानते.माझ्या नवर्याच्या अंगावर २-३ गाठी होत्या.बाहेरून दिसत नाहीत. डॉक्टरने मेदाच्या गाठी म्हणून सांगितले होते.औषध वगैरे नाही.आहे तितक्याच आकाराच्या आहेत.गेली ६-७ वर्षे तो कपालभाती प्राणायाम नियमित करतो.तुमचा धागा वाचल्यावर त्या गाठी पाहिल्या तर १ गाठ गायब आहे.
कशामुळे माहित नाही.
म
मला आणि बहिणिला भरपुर आहेत अंगावर. डॉक म्हणाले कि फ़क्त लक्ष ठेवा.
अनुवांशिक नसावे कारण आई वडिल यांच्या पैकी कोणलाच नाहिये.
कधी ऐकले नव्हते याविषयी. थोडे
कधी ऐकले नव्हते याविषयी. थोडे गुगल केले. इंग्रजीत Lipoma म्हणतात म्हणे. अपायकारक नसतो. कारणे नक्की सांगता येत नाहीत. इत्यादी माहिती इथे दिली आहे:
https://www.webmd.com/skin-problems-and-treatments/what-is-a-lipoma#1
माझ्या नवर्याच्या पाठीवर
माझ्या नवर्याच्या पाठीवर भरपूर गाठी आहेत, २०-२२ वर्षापासून आहेत . २-३ डॉक्टरांना दाखविले पण सगळ्यांनी चरबीच्या गाठी असल्याचे निदान केले. औषधे नाही. बरं या कशा येतात कारण नवरा जाड वैगरे नाहीये आणि २०-२२ वर्षापूर्वी तर काडी पेहलवान होता